संकटमोचक स्वतःच संकटात,
भाजपाचा पाय खोलात !!
दिवंगत सुधाकरराव नाईक जे जाहीर सांगायचे तेच मला एकट्यात समजावून सांगायचे पण स्वतः मात्र तीच चूक करायचे, ते सांगायचे कि सत्ता पैसा यश मिळविताना कधीही प्रतिस्पर्धी बाबत अस्वस्थ होत त्याला संपवायला व्यर्थ वेळ खर्च करायचा नाही पण एकदा का शिकार टप्प्यात आली कि मागला पुढला कसलाही विचार न करता क्षणार्धात शिकार करून मोकळे व्हायचे, पुढे काय घडेल सांगता येत नाही पण आजही मी वयापेक्षा अधिक तरुण तुम्हाला वाटतो कारण जे मी माझ्या घरात सांगतो तसेच वागतो,डोक्यात सुडाचे बदला घेण्याचे विचार कधीही नकोत, आपण पत्रकार आहोत,अनेकांच्या वागण्या बोलण्याचा वृत्तीचा आपल्याला व्यक्तिगत देखील त्रास होत असतो पण त्यासाठी अस्वस्थ अजिबात व्हायचे नाही, त्यातला डोक्यात बसलेला प्रत्येक माणूस पुन्हा कुठेतरी जेव्हा तावडीत सापडतो तेव्हा मात्र आपल्या लेखणीतून बोलण्यातून क्षणार्धात त्याच्यावर तुटून पडत त्याला त्याची जागा दाखवून द्यायची असते, सतत डोक्यात काहीही न ठेवता फक्त सकारात्मक भूमिका घेत हसत खेळत काम करीत राहायचे असते…
www.vikrantjoshi.com
फडणवीसांचा हनुमान, भाजपा व सभोवतालच्या प्रत्येकासाठी संकटमोचक गिरीश महाजन आजचा फुटकळ व संपलेल्या नेत्याने म्हणजे सतत सुडाने पेटलेल्या एकनाथ खडसेंनी महाजनांना केवळ पाण्यासारखा बुडबुडा हाती घेत म्हणजे कोणतेही पुरावे नसतांना केवळ महाजनांच्या सवयी टिपत त्यावर नेमका प्रहार करत त्यांना विनाकारण जेरीस एवढे आणले आहे कि शेवटी खडसेंना कायम चूप बसविण्यासाठी सतत ज्यांच्यासाठी गिरीश महाजन संकटमोचक ठरले, त्यांनाच आता पुढे करून खडसे यांचे नेमके व सत्य वाभाडे काढायला सुरुवात केली आहे, ज्या पद्धतीने भुसावळचे नामदार संजय सावकारे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण कधी नव्हे ते खडसे पाठी एवढे हात धुवून मागे लागले आहेत कि जर खडसे यांची अक्कल ठिकाणावर असेल तर निदान यापुढे तरी त्यांनी सततचे सुडाचे राजकारण क्षणार्धात थांबवत निदान कुटुंबाच्या आणि स्वतःच्या राजकीय भल्यासाठी शांत बसावे, व्यसने वाममार्गाचे पैसे सत्तेसाठी वाट्टेल ते व सुडाचे सतत राजकारण, खडसे तुमचे नेतृत्व आणि घर तयातून पूर्णतः उध्वस्त होतांना दिसते आहे. हसून खेळून परत पूर्वीचे राजकीय संबंध जोडता येतील का त्यामागे धावावे अन्यथा एकनाथ आणि रोहिणी दोघेही राजकीय वनवासात लवकरच निघून गेल्याचे तुमच्या कानावर पडेल. खडसेजी, आज जळगाव जिल्हा असेल, तुमच्या पाठीशी एकेकाळी भरभक्कम उभा असलेला तुमचा लेवा समाज असेल किंवा थेट मुक्ताईनगरचा मतदार जो तुमच्या हातून चंद्रकांत पाटलांसारख्या एकेकाळच्या सर्वसामान्य शिवसैनिकाने आज तुमच्या हातून हिसकावून घेतला आहे, थोडक्यात सुनेपासून तर पारोळ्याच्या बॉर्डर पर्यंत आता कोणीही तुमच्या पाठीशी नाही आणि पाठीशी असलेली लेक व जावई पूर्णतः स्वतःच्या व लोकांच्या नजरेतून उतरले आहेत. सिनेमातला खलनायक इतरांना ठार मारण्याच्या नादात शेवटी पिस्तुलाची गोळी जशी स्वतःच्या डोक्यात घालून घेतो तसे तुमचे झाले आहे किंवा होणार आहे, डोक्यात असलेल्या सततच्या वाईट विचारातून हे घडलेले आहे…
खडसेजी, जिल्ह्याच्या राजकारणात आणि एकंदर राज्याच्याही राजकारणात तुम्हाला आर्थिक व राजकीय ताकद अगदी सुरुवातीला दिली ती लेवा समाजाचे दिवंगत माजी मंत्री बाळासाहेब चौधरी आणि जे टी महाजन यांनी पण ज्यांच्या खांद्यावर पाय ठेवून तुम्ही मोठी झेप घेतली त्यांनाच त्यानंतर तुम्ही अडचणीत टाकले किंवा धोका दिला.महान माणूस बाळासाहेब चौधरी आणि चोपड्याचे व्याही बोरोले यांना तर थेट त्यांच्या घरातून तुम्ही उध्वस्त केले तसे मोठे प्रयत्न झाले, पोरी पटविण्यात पटाईत प्रांजलने शिरीष मधुकरराव चौधरी यांना थेट रस्त्यावर आणले तिकडे त्याचवेळी रोहिणी व तुम्ही दोघांनी रोहिणीच्या सासरी बोरोलेंकडे गोंधळ घालत त्यांना नॉव्हेअर केले त्यानंतर बालपणीचा मित्र प्रांजल व रोहिणीने इतरांना सोडत चक्क लग्न केले, आज तोच प्रांजल जुन्या वाईट सवयीतून जणू परमेश्वर तुम्हा बाप लेकीचा बदला घेतो आहे, अर्थात तुमचे किस्से असे कितीतरी, त्यावर न बोलणे बरे. थांबवा सारे आणि गिरीश महाजन यांनी देखील काळजी घेणे बरे….
तूर्त एवढेच : हेमंत सुशीला श्रीराम जोशी