नागड्या पत्रकारितेला ऊत,
धूत ! अनिल थत्ते नावाचे भूत :
आपण काय बोलतोय हेच अनेकदा अनिल थत्तेंना कळत नाही पण सर्वसामान्य जनतेच्या राजकीय अज्ञानाचा जसा अनेक पत्रकार अनेकदा किंवा सतत गैरफायदा घेतात त्यातले एक अनिल थत्ते, जे पत्रकार किंवा वाहिन्या वृत्तपत्रे सांगतात तेच नेमके सत्य आहे असते असा समाज लोकांनी करवून घेतला असल्याने अनेकांची त्यामुळे मोठी चलती आहे त्यांच्या बोलण्याला लिखाणाला मोठी मागणी आहे त्यामुळे हे असे अनेक थापाडे जे सांगतात लिहितात त्यातली नेमकी सत्यता लोकांसमोर आणणाऱ्या मीडियाची वास्तविक आता मोठी गरज आहे, अगदी काल पर्वा अनिल थत्ते असे म्हणाले कि एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे आपापसात परंपरागत गेल्या काही पिढ्या राजकीय वैमनस्य राजकीय दुश्मनी आहे, ज्यांना महाजन खडसे यांचा राजकीय इतिहासच अजिबात ठाऊक नाही, जळगाव जिल्ह्यांव्यतिरिक्त जगात असे कितीतरी मराठी माणसे असल्याने अनिल थत्ते किंवा त्या पद्धतीच्या मीडियाच्या अनेक थापा सहज सहज खपतात बेमालूमपणे पचतात. केवळ या एका मुद्द्यावर थापाड्या थत्तेला नागडे करायचे झाल्यास, जळगाव जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींचा नेमका उहापोह करायचा झाल्यास, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांच्याही घराण्याला कोणतीही कुठलीही अजिबात राजकीय पार्शवभूमी नाही, किंबहुना जेव्हा मी स्वतः जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सहभागी होतो त्या 1980 दरम्यान खडसे आणि महाजन दूरदूरपर्यंत कुठेही राजकारणात नव्हते त्यानंतर खडसे हे अकोला सोडून त्यावेळेचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख आजचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बोट पकडून हळूच भाजपाच्या राजकीय प्रवाहात सामील झाले…
www.vikrantjoshi.com
विविध आंदोलने आणि पूर्ण वेळ पक्षाचे काम त्यातून हा लेवा पाटेदार समाजाचा तरुण जेव्हा त्याच्या तडफदार आणि निधड्या वृत्तीमुळे काँग्रेसच्या बाळासाहेब चौधरी यांच्या मनात भरला,त्यावेळेचे अत्यंत वरचढ आणि टॉपमोस्ट नेते सुरेशदादा जैन यांच्याशी राजकीय सामना करण्यास खडसे एकदम तोडीचे हे विधानसभा सभापती बाळासाहेब चौधरी यांच्या चाणाक्ष नजरेने ताडले आणि तेथपासून बाळासाहेबांनी मोठी ताकद खडसेंच्या पाठीशी उभी केली, खडसे जेव्हा राजकारणात यापद्धतीने मोठे होत होते तेव्हा गिरीश महाजन कुठेही नव्हते नंतर काही वर्षांनी महाजन देखील भाजपाच्या राजकीय प्रवाहात सामील झाले व्यस्त झाले आणि बोलक्या मेहनती दिलदार स्वभावाच्या महाजन यांनी देखील जिल्ह्याच्या राजकारणावर पकड घेतली, सुरुवातीला अनेक वर्षे अगदी 2014 पर्यंत खडसे महाजन एकत्र होते, एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे, सुरेशदादा जैन यांना पुरून उरायचे किंबहुना खडसे आमदार झाले नामदार झाले त्या प्रत्येक यशात अर्थातच त्यांचा विश्वासू सहकारी या नात्याने गिरीश महाजन यांचा मोठा सहभाग होता आणि खडसे देखील महाजन यांना दरवेळी राजकीय ताकद देताना अजिबात मागेपुढे पाहायचे नाही पण जेव्हा महाजन आमदार झाले तेव्हा मात्र हा तरुण आपल्या मार्गातला राजकीय अडसर ठरू शकतो हे खडसेंच्या लक्षात आले आणि तेथपासून त्यादोघांत कुरबुरी सुरु झाल्या, 2014 नंतर खडसे विरुद्ध फडणवीस असा जेव्हा उघड पक्षांतर्गत संघर्ष सुरु झाला तेव्हापासून खडसे विरुद्ध फडणवीस आणि त्यांच्या साथीला गिरीश महाजन हे नवे समीकरण दृढ झाले आणि तेथूनच खडसेंचा पाय खोलात जाऊ लागला, खडसे संपले म्हटल्यापेक्षा त्यांनी केलेल्या घातक चुकांमुळे आणि फडणवीस महाजन यांच्याशी घेतलेल्या पन्ग्यामुळे त्यांच्या राजकारणाला झपाट्याने मोठी घरघर लागली….
मिस्टर थत्ते हा खरा त्या दोघांचा राजकीय इतिहास, दरवेळी थापा मारणे अजिबात योग्य नाही. बंडोपंत बायकोला म्हणाले, यापुढे माझे काही खरे नाही त्यावर बायको म्हणाली मग यावर्षी तुमच्या आवडीचे लिंबाचे गोड लोणचे घालू कि नाही ? थत्ते तुमच्या व्हिडीओचे हे असे आहे, तुमचे बोलणे थापा मारणे काही केल्या थांबत नाही, उद्या तुमच्यानंतर ते वाचायला कोणी धजावेल कि नाही ? एक सत्य प्रसंग सांगतो. मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी सतत 23 वर्षे मंत्री होते पण पायउतार झाल्यानंतर जेव्हा सतत 20 वर्षे त्यांना कोणीही विचारात नव्हते तेव्हा मला कायम हेच वाटायचे कि बाळासाहेब आता राजकारणात पूर्णतः संपले आहेत पण पुढे चमत्कार घडला, सुरेशदादा जैन यांना राजकारणातून बाजूला करण्यासाठी अचानक त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांना सभापती करण्याचे ठरविले आणि केले, चौधरी पुन्हा सत्तेच्या राजकारणात उफाळून वर आले पण जे त्यांचे घडले तसे एकनाथ खडसेंबाबत नक्कीच काहीही घडणार नाही अगदी राज्यपालपद देखील त्यांना मिळणार नाही, खडसेंच्या चुकांची व्याप्ती मोठी आहे आणि गंभीर आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी