थापाड्या अनिल थत्तेंचा खांदा,
एकनाथ खडसेंचा गंदा धंदा :
याठिकाणी निवृत्त झालेल्या मेधा गाडगीळ पद्धतीच्या बहुसंख्य आदर्श महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मला लिहिणे बोलणे जागेअभावी शक्य होणार नाही पण विद्यमान महिला प्रशासकीय अधिकारी माझ्या दृष्टीतून अत्यंत अभिमानाचा कौतुकाचा विषय कायम ठरल्या आहेत किंबहुना मला त्या साऱ्याच महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी रक्षणकर्ता मोठा भाऊ या नात्याने कायम उभे राहायला आवडते, चुकून त्यांच्यावर एखादे संकट आलेच तर मी तेथे सर्वात आधी जाऊन उभा असतो असेल, सारेच विषय अतिशय गुप्त ठेवायचे असल्याने त्यावर लिहिणे बोलणे मी टाळतो. अगदी सुजाता सौनिक यांच्या पासून तर अश्विनी भिडे वल्सा नायर सिंग अश्विनी जोशी मनीषा म्हैसकर रुबल अग्रवाल आभा शुक्ल निधी पांडे निधी चौधरी विनिता वेद सिंगल इडझेस कुंदन स्वाती म्हसे अंशू सिंह पाटणे अशा कितीतरी राज्याच्या प्रशासनातल्या महिला अधिकारी, घर संसार अतिशय व्यवस्थित सांभाळून त्यांची ज्या पद्धतीने राज्याच्या प्रशासनावर पकड आहे असते कारण त्या आपल्या नोकरीकडे देखील पोटच्या मुलांसारखे सतत बघत असल्याने एकाचवेळी आई आणि मूल म्हणजे त्या स्वतः आणि हे राज्य बदनामीच्या खाईत अडकणार नाहीत याची त्या सतत काळजी घेतात हे मी अतिशय जवळून न्याहाळत असतो त्याचवेळी जर ओवाळून टाकलेले अनिल थत्ते कुठल्याशा हव्यासापोटी एखाद्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्याच्या खाजगी आयुष्यात तेही दूरदूरपर्यंत काहीही घडलेले नसतांना गिरीश महाजन यांच्याशी वाईट संबंध जोडण्यात विकृत आनंद घेणार असतील तर याक्षणी थत्ते तुमचे ऐकतांना भलेही काहींचे मनोरंजन होत असेल पण एका पवित्र नात्याला असा कलंक लावणे योग्य नाही तुम्हाला त्याची नक्कीच पुन्हा एकदा मोठी किंमत मोजावी लागणार आहे.ज्या महिला प्रशासकीय अधिकाऱयांवर तुम्ही शिंतोडे उडविले आहेत त्यांचे सुखी खाजगी वैवाहिक आयुष्यही मला नेमके माहित आहे पण त्या दोघांमधले पती पत्नीचे घट्ट नाते मला वाटते या अशा आरोपांमुळे नक्कीच अधिक गडद होणार आहे…
www.vikrantjoshi.com
पत्रकार अनिल थत्ते एक नंबरचे थापाडे आणि वाया गेलेले पत्रकार, व्यक्तिमत्व आहे हे मी तुम्हाला शेकडो वेळा सांगून झाले, उचलली जीभ लावली टाळूला त्यापलिकडे काहीही नाही, एकनाथ खडसेंनी सांगायचे त्यावर अनिल थत्तेंनी बोलायचे त्यावर अनिल थत्तेंच्या नावाचा वाक्यावाक्यातून आधार घेत खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर चिखलफेक करायची त्यांना बदनाम करायचे बदमाश ठरवायचे राजकारणातून त्यांचे महत्व संपविण्या असे या पद्धतीचे केविलवाणे प्रयोग राबवायचे त्यापलीकडे काहीही नाही, एक विदारक सत्य तुम्हाला सांगतो, थापाड्या अनिल थत्तेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाजनांना बदनाम करण्याचा हा शेवटचा प्रयोग, यानंतर अत्यंत घाबरट वृत्रीच्या अनिल थत्तेची यापद्धतीने खोटी बदनामी करण्याची पुन्हा कधीही हिम्मत होणार नाही, थत्तेंना त्यांची जागा दाखविण्याची पूर्ण तयारी आता नक्की केल्या गेली आहे कारण यापद्धतीने खोटी बदनामी यापुढे खपवून घ्यायची नाही त्यांना न्यायालयाचा हिसका दाखवायचा त्यांच्यावर हात उगारून त्यांचे महत्व वाढवायचे नाही किंवा खडसे पद्धतीच्या माकडचाळे करणार्या राजकीय विरोधकांच्या हाती कोलीत न देता थत्ते नेमके कसे आणि किती खोटारडे हे महाजनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ठरविले असल्याने तसेही थत्ते यांना मी आतबाहेर नेमके ओळखत असल्याने महाजनांची बदनामी करण्याचा हा थत्तेंचा शेवटचा प्रयत्न, खोटी बातमी क्षणिक एखाद्याला कदाचित बदनाम करू शकते त्यावर सामाजिक तहलका देखील माजू शकतो पण खोटे फार काळ टिकत आणि पचत नसते मिस्टर थत्ते, बादरायण संबंध लावून तेही तुम्ही ज्यापद्धतीने महाजन आणि त्या प्रशासकीय महिला अधिकाऱ्याच्या अत्यंत पवित्र नात्यात संशय निर्माण केला आहे, थत्ते तुम्हाला शंभर टक्के त्याची मोठी किंमत यापुढे मोजावी लागणार आहे…
विकृती हा तुमच्या लिखाणाचा आणि प्रत्यक्ष जीवनात त्यापद्धतीने वागण्याचा महत्वाचा भाग आहे हे नव्या पिढीला कदाचित माहित नसेल पण माझ्यासारखे जुने जाणते अनुभवी तुमच्या, बलात्कार कसा करावा असा करावा ज्या तुम्ही लिहिलेल्या पुस्तकात थेट पत्नीचा उल्लेख करण्यात ज्याला धन्यता वाटते असा विकृत पत्रकार एखाद्याच्या पवित्र नात्याची बदनामी करतांना मागेपुढे पाहत नाही हा तुमचा इतिहास मी संजय राऊत भाऊ तोरसेकर इत्यादींना कसा तोंडपाठ आहे हे तुम्हाला नेमके आणि नक्की माहित आहे. तुमच्या व्हिडिओचा आधार घेत गिरीश महाजनांवर हताश निराश नाराज झालेल्या एकनाथ खडसे यांचा देखील पुढल्या भागात मी समाचार घेणार आहे आणि तेही कसे खोटारडे पराभूत नेतृत्व नेमके पुरावे आणि संदर्भ मांडून लोकांसमोर सारेच सत्य मी नक्की मांडणार आहे. अनेक महिला प्रशासकीय अधिकाऱ्याचे व्यक्तिगत जीवन मी अगदी जवळून बघत न्याहाळत आलो आहे त्या आपले जोडीदार, पती आणि मुलांसहित त्याचवेळी अत्यंत पारदर्शी तसेच कडक शिस्तीने प्रशासकीय पद सांभाळतांना कुठेही आर्थिक आणि चारित्र्याला कलंक आणि गालबोट लागणार नाही याची मोठी काळजी घेत असतांना खालच्या पातळीवर येऊन तुम्ही ज्यापद्धतीने अधिकाऱ्यांवर विनाकारण कलंकित करून विष कालवले आहे, यापुढे अशी खोटी बदनामी तेही समाजातल्या दोन महत्वाच्या घटकांवर मंत्री व महिला सनदी अधिकाऱ्यांवर तुम्ही ज्या पद्धतीने केलेली आहे, नक्कीच महाजनांचे कार्यकर्ते त्यावर जेव्हा न्यायालयात दाद मागतील, अनिल जर तुम्ही खर्या बापाची पैदास असाल तर नक्कीच लोटांगण घालून माफी मागायची नाही प्रसंगी खडी फोडायला जायची वेळ आली तरी….
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी