अशोभनीय राजकारण : पत्रकार हेमंत जोशी
ज्यांना तीन चार मुले आहेत असे मायबाप त्यांच्यासाठी एखादे खेळणे जत्रेतून आणतात उद्देश हा कि साऱ्यांनी आळीपाळीने ते वापरावे पण असे होत नाही घरात जे ताकदवान मूल असते असे मूल ते खेळणे आपल्याकडे हिसकावून घेते इतरांना खेळायला काय बघायला देखील देत नाही मला हे उदाहरण त्या बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांवरून आठवले. वास्तविक या दोघांचेही आपल्यावर आपल्या देशावर विशेषतः आपल्या राज्यावर अनंत उपकार, आपले हे भाग्य कि शिवाजी
महाराज आणि बाबासाहेबांनी येथे या राज्यात जन्म घेतला पण या दोघांच्या बाबतीत त्यांच्या पश्चात घडले असे कि नवबौद्धांनी बाबासाहेब आंबेडकरांना आणि काही संकुचित हलकट कमकुवत विचारांच्या मूठभर कणभर मराठ्यांनी महान अशा शिवाजी महाराजांना जे आपापल्यापुरते करून ठेवले आहे त्यांचे ते मोठे पाप आहे, जाती जातींमध्ये या मंडळींनी नेत्यांनी त्यातून मोठी तेढ दरी विनाकारण निर्माण करून ठेवलेली आहे. अहो, घटनाकार बाबासाहेब हे केवळ नवबौद्धांचेच देव असूच शकत नाहीत त्यांचे या राष्ट्रावर मोठे उपकार असल्याने त्यांच्या लिखाणाला, भाषणांना विचारांना मानणारा मोठा बौद्धेतर वर्ग त्यात ब्राम्हण देखील आलेत या राज्यात या राष्ट्रात आहे पण नागपुरात आणि मुंबईत त्यांच्या जन्म तिथीला किंवा पुण्य तिथीला इतरांची समाधी स्थळी दर्शन स्थळी जाण्याची देखील हिम्मत होत नाही एवढा घट्ट त्या बाबासाहेबांना नवबौद्धांनी आपल्या हाती धरून ठेवलेला आहे, बाबासाहेबांना संकुचित करण्याचे मोठे पाप त्यांचा धर्म स्वीकारलेल्यांनी करून ठेवले आहे, करताहेत…
www.vikrantjoshi.com
शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर हे असे वातावरण अगदी आता आत्तापर्यंत नव्हते अगदी आजही संघस्थानावर संघ परिवारात सर्वाधिक महत्व फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांनाच सर्वात आधी दिले जाते त्यांच्या स्फुर्तीगानातुन हिंदू आणि शिवाजी महाराज यांचे सतत महत्व विशद करण्यात येते. पण काही स्वार्थी संधीसाधू मराठा नेत्यांनी आणि संघटनांनी शिवाजी महाराज हे केवळ आपले दैवत पद्धतीने जो विषारी आणि विखारी प्रचार व प्रसार सूरु ठेवला आहे केला आहे त्यातून हेच स्पष्ट होते आहे कि बाबासाहेब जसे कायम त्यांच्या धर्मातील लोकांपुरते त्यांच्याच अनुयायांनी मर्यादित ठेवले पुढे म्हणजे अगदी नजीकच्या काळात तेच शिवाजी महाराजांच्या बाबतीत होणार आहे. ज्यांनी या देशावर मुलींचे स्त्रियांचे शिक्षण कसे अत्यावश्यक पद्धतीने उपकार करून ठेवले त्या जोतिबा आणि सावित्रीला समस्त माळी ज्ञातीने संकुचित केले आणि तीच चूक तेच पाप काही मूठभर ताकदवान प्रभावी मराठे आता या महान राज्यात करताहेत. यापुढे इतरांना विशेषतः ब्राम्हणांना तर शिवाजी महाराजांच्या तसबिरीकडे बघण्यास देखील भीती वाटावी यापद्धतीने विखारी विषारी प्रचार व टीका सतत सर्वांवर हॅमर होते आहे, सामान्य माणसे त्यातून पार गोंधळले आहेत एकमेकांच्या जातीकडे धर्माकडे संशयाने आणि रागाने बघताहेत ज्याचे पाप केवळ सत्ता आपल्याकडे ठेवण्याच्या नादातून काही थर्डग्रेड नेते यांच्या हातून घडते आहे विशेष म्हणजे अप्रत्यक्ष आपले मुख्यमंत्री त्यावर टाळ्या वाजवताहेत त्या मूठभर टीचभर मंडळींना शांत राहा असे सांगण्यापेक्षा…
शिवाजी महाराज केवळ आपले या विषारी जहाल प्रचारातून या राज्यातले ब्राम्हण तर अतिशय अस्वस्थ झाले आहेत त्यांच्याबाबतीत त्यांच्या घरात गांधी वधानंतर जशी अनेक वर्षे एकप्रकारे दहशत निर्माण झालेली होती ज्यामुळे अनेक ब्राम्हण परदेशात त्यावेळी निघून गेले आज पुन्हा तेच वातावरण निर्माण झालेले आहे म्हणजे या राज्यात राहावे किंवा नाही अशी चिंता त्यांना सतत भेडसावते आहे आणि कारण काय तर त्या देवेंद्र फडणवीस यांनी जे मराठा आरक्षण मुख्यमंत्री या नात्याने करवून घेतले त्यामुळे काही मूठभर विरोधी मराठा नेत्यांच्या तोंडात जे त्यांच्याच समाजाने शेण घातले, त्यातून काही हे असे हलकट फडणवीस यांच्यामागे हात धुवून लागले आहेत आणि जातीचे विष पेरण्यात त्यांचा सतत कल आहे, त्यांचा तो तेवढाच आता उद्देश आहे. अत्यंत लाजिरवाणे जर काही घडले असेल तर शेवटी छत्रपतींचे वंशज आमदार शिवेंद्र राजे भोसले यांना जाहीर पत्रक काढावे लागले आहे कि महाराजांचे आणि रामदास स्वामी यांचे संबंध कसे गुरु शिष्याचे होते….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.