एकनाथजी, दाग अच्छे है,
सारे के सारे क्यो परेशान है :
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासारखे तगडे प्रतिस्पर्धी वरून वाममार्गाने येणारा सततचा काळ्या पैशांचा महापूर, रा स्व संघाचे मोहन भागवत खंबीरपणे पाठीशी असूनही गडकरींना पंतप्रधान पदाने हुलकावणी दिली शिवाय पडलेल्या धाडींमुळे भाजपाचे अध्यक्षपद देखील गमवावे लागले पुढे भाजपा सत्तेत आल्यानंतर त्यांना मोदींनी कसेबसे मंत्रिमंडळात घेतले, आजतागायत मंत्री या नात्याने मन मोठे करून मोदींनी गडकरींना मोठी मोकळीक दिली पण त्यातही सतत संशयास्पद वागणे निर्णय घेणे किंवा पैशांच्या मागे सतत धावणे, न खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणाऱ्या मोदींनी काल पर्वा पुन्हा एकदा गडकरींच्या बाबतीत कडक धोरण अवलंबिले गडकरींचे आर्थिक अधिकार स्वतःकडे घेतले, बरे झाले त्यामुळे यापुढे गडकरींच्या खात्यात अधिक पारदर्शकता येईल. फडणवीसांचे मात्र तसे नाही म्हणजे एकाचवेळी त्यांच्या पाठीशी रा स्व संघ आणि स्वतः मोदीजी भरभक्कमपणे उभे आहेत, तुम्हाला कदाचित हे माहित नसेल कि ज्या अमित शहांना देवेंद्र नाव काढताच उगाच मळमळायला होते किंवा पोटदुखी वाढते त्यांनी देखील स्वतःचा नितीन गडकरी करवून घेऊ नये उगाच देवेंद्रजींच्या एकनाथ शिंदे विनोद तावडे पद्धतीच्या राजकीय विरोधकांना जवळ बसवून घेत आमच्या राज्यात आणि त्यांच्या पक्षात खळबळ माजवीत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. याउलट पुढल्या काही महिन्यात स्वतः शहा यांचे जे राजकीय महत्व स्वतः मोदी कमी करणार आहेत त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे, मोदींच्या झालेल्या वाकड्या नजरेला गैरसमज दूर करीत ती नजर सरळ करावी….
www.vikrantjoshi.com
एखादा बेरकी नवरा मारक्या म्हशीसारख्या बायकोला वठणीवर आणण्याच्या भानगडीत पडत नाही तो उफाड्या शेजारणीचे महत्व वाढवतो, हुशार बायको लगेच ताळ्यावर येते. अमित शहा डोक्यावर बसताहेत बघून मोदींनी शहा यांना कायम पुरून उरणाऱ्या गुजराथ भाजपा प्रदशाध्यक्ष खान्देशी मराठी सी आर पाटलांचे महत्व वाढविले आधी त्यांना खासदार केले आणि शहा सतत नाही नाही म्हणत असतानाही यावेळी केंद्रीय मंत्री तर केलेच वरून अत्यंत महत्वाचे जलशक्ती मंत्रालय दिले. अजूनही सी आर पाटील प्रदेशाध्यक्ष असल्याने ते शहा यांना तेथेही पक्षांतर्गत फारशी लुडबुड करू देत नाहीत, महत्वाचे म्हणजे गुजराथच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या आहेत त्यामुळे पुढल्या काही दिवसात जो नवा प्रदेशाध्यक्ष नेमल्या जाणारा आहे तो देखील शहा यांनी पुरून उरेल याची काळजी मोदी घेताहेत घेणार आहेत. त्या दीपक शर्माने थाप मारली आह कि अलीकडे शाह आणि शिंदे यांची अनेकदा भेट झाली आहे, एकदम चुकीचे, केवळ एकदाच ते भेटले हेच शिंदे यांचे नेमके चुकले कारण शहा ऐवजी शिंदे यांनी थेट मोदींना भेटून आपली नाराजी व्यक्त करणे अधिक चांगले झाले असते, फडणवीसांनंतर शिंदे मोदींचे अतिशय लाडके आवडते आहेत त्यांनी या दोघात लगेच समेट घडवून आणली असती, पुन्हा तेच सांगतो नरेंद्र नंतर देवेंद्र हेच पंतप्रधान पदाचे दावेदार, संघ आणि मोदी शंभर टक्के घडवून आणणार आहेत म्हणून देवेंद्र नंतर शिंदे हे समीकरण जर अगदी सहज एकनाथजींना घडवून आणायचे असेल तर एखादा बावनकुळे पद्धतीचा मध्यस्थी ठेवत दोघात अजिबात कटुता येणार नाही याची स्वतः शिंदे यांनी डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी. अजूनही अजिबात वेळ गेलेली नाही, सारे काही सुरळीत होऊन त्याचा मोठा फायदा शंभर टक्के एकनाथजींनी होईल. भाजपा संघात एखादा शहा पाठीशी असून फारसे फायद्याचे नसते, पाठीशी मोदी आणि संघ भरभक्कमपणे उभे ठाकणे गरजेचे आहे असते हे शिंदेंनी लक्षात घ्यावे, त्यांनी भागवतांना देखील विश्वासात घेत, मी कसा उत्तम नेता, पटवून द्यावे….
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी