देवेंद्र फडणवीस पायउतार होतील
शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री असतील :
तुम्हाला मी याआधी देखील सांगितले होते कि अलीकडे मी वृत्तपत्रे वाचत नाही, बातम्या देखील फारशा बघत नाही कारण त्यात सत्यता अभावाने आढळते पण अमुक एखादा व्हिडीओ तुम्हाला आलटून पालटून सतत चार आठ दिवस सोशल मीडियातुन मुद्दाम पाठविल्या जात असेल तर आपसूकच तो बघण्याचा मोह होतो जो मला अलीकडे एक व्हिडीओ बघण्याचा मोह झाला, विशेष म्हणजे या पद्धतीच्या व्हिडिओतून काहीही तथ्य समोर येत नसतांना तद्दन थापा, हवेतल्या हवेत विरणार्या राजकीय बातम्या किंवा माहितीवर देखील दर्शक तुटून पडतात तेव्हा दर्शकांची मानसिकता किती दुबळी असू शकते यापद्धतीने अनिल थत्ते छाप व्हिडीओज बघताना त्याची हमखास प्रचिती येते. ‘ महाराष्ट्र में कुछ बडा होने जा रहा ‘ या मथळ्याखाली अलीकडे मी दिल्लीतले एक वरिष्ठ पत्रकार दीपक शर्मा यांचा असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओ बघितला त्याला हसावे कि रडावे किंवा दीपक शर्मा यांना शंभर मारून एक मोजावी त्याचे कोडे मला पडले. महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी हा व्हिडीओ एखाद्याने शर्मांकडून मुद्दाम तयार करवून घेतला असावा एवढा तो उथळ किंवा फडणवीसांच्या राजकीय असूयेपोटी तयार करण्यात आल्याचे जाणवते कारण जे घडलेले नाही जे नजीकच्या काळात काहीही झाले तरी घडणार नाही त्यावर कपोकल्पित व्हिडीओ केवळ सुपारी देऊन एखादा राजकीय प्रतिस्पर्धी तयार करवून घेऊ शकतो हे नक्की आहे, नेमकी या व्हिडिओमध्ये संजय राऊत यांची मुलाखत दाखवत त्यांना मोठे कारण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतो कारण संजय राऊत आणि शरद पवार जे बोलतात त्याउलट सारे काही घडत असते हे राज्यात नेमके साऱ्यांनाच माहित आहे…
www.vikrantjoshi.com
शर्मा सांगतात तसे कोणतेही राजकीय स्थित्यंतर बदल राज्यात घडणार नाही किंवा काहीही झाले तरी फडणवीसांची खुर्ची अडचणीत येणार नाही आलेली नाही किंवा तसे कोणतेही डील अलिकडल्या दिल्ली भेटीत शिंदे आणि शाह यांच्यामध्ये अजिबात झालेले नाही, एक नक्की आहे कि यादिवसात फडणवीसांच्या भूमिकेवर त्यांच्या कडक वर्तनावर बारीक लक्ष ठेवण्यावर केवळ एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री नाराज नाहीत तर भाजपा आणि राष्ट्रवादीचे देखील अनेक मंत्री अस्वस्थ आहेत पण यावेळी मुख्यमंत्री झाल्या झाल्या फडणवीसांनी जी अतिशय कणखर आणि कडक भूमिका घेतलेली आहे, भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत बुडालेली महाराष्ट्राची गाडी त्या चिखलातून बाहेर काढण्यासाठी हे जे कडक धोरण त्यांनी अवलंबिले आहे त्यातला प्रत्येक शब्द आणि भूमिका त्यांनी नरेंद्र मोदींच्या कानावर घालून त्यांच्या परवानगीनेच फडणवीस हे असे एकेकाळच्या मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण किंवा गुजराथच्या एकेकाळच्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पद्धतीने कडक पारदर्शी आणि दलाल विरहित धोरण राबवितांना दिसताहेत ज्याचे स्वागत कारण्याऐवजी जर काही उथळ नेते त्यांची गादी हलविण्याचा प्रयत्न करणार असतील तर अशांचे मग नक्कीच काही खरे नाही. मिस्टर दीपक शर्मा त्या फडणवीसांनंतर वरकरणी अत्यंत साधा भोळा दिसणारा मात्र प्रत्यक्षात अतिशय सावध व चाणाक्ष असलेले एकनाथ शिंदे तुम्ही सांगताहेत तसे अजिबात त्यांची शिवसेना भाजपामध्ये विलीन करण्याचा कुठलंही मूर्खपणा कधीही करणार नाहीत, भाजपामध्ये विलीनीकरण करीत ते स्वतःला संपविणार नाहीत त्याचवेळी उद्धव ठाकरेंना मोठे करण्याचा मूर्खपणा भाजपा अजिबातच करणार नाहीआणि हे घडले, शिंदे सेनेसहित भाजपात गेले तर मी आजन्म पत्रकारिता सोडून तुमचे दररोज खरखटे ढुंगण धुण्यासाठी दिल्लीत निघून येईन, बावळटपणाची शर्मा तुम्ही कमाल केली आहे किंवा हि नक्की एक सुपारी आहे. राजकारणातल्या प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावेसे वाटते अगदी प्रमोद हिंदुराव देखील असे स्वप्न बघतो त्यामुळे शिंदेंची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा जिद्द महत्वाकांक्षा नक्की आहे असू शकते पण आज ती वेळ नाही, डिट्टो मोदी फडणवीस यांना महाराष्ट्रात आमूलाग्र बदल आणि प्रगती साधून पुढे नक्की दिल्लीत निघून जायचे आहे त्यामुळे उगाच याक्षणी शिंदे यांनी घाई करून चुकीचे पाऊल उचलून स्वतःच्याच राजकीय आयुष्यात अडचणी निर्माण करवून ठेऊ नयेत असे मला वाटते, उद्या नक्की त्यांचाच आहे. मला काल पर्वा एक ज्येष्ठ मंत्री जे म्हणाले ते मात्र फडणवीसांनी देखील ध्यान ठेऊन आचरणात आणावे म्हणजे इतरांमध्ये बदल घडवून आणत भ्रष्टाचारावर वचक निर्माण करतांना आपल्याही जवळपास स्वच्छ आणि शुद्ध गंगा वाहते याची खात्री दरदिवशी करवून घ्यावी, अर्थात हे त्यांना जाहीर सांगणे मला स्वतःला देखील योग्य वाटले…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी