भुजबळ आणि मंत्रिमंडळ : पत्रकार हेमंत जोशी
भीक नको पण कुत्रे आवर अशा पद्धतीने सांगण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर राज्यमंत्र्यांवर येऊन ठेपली आहे झाले असे शपथविधी होण्याआधीपासून संभाव्य मंत्र्यांची राज्यमंत्र्यांनी नावे समजताच अनेक असंख्य बहुसंख्य सरकारी कर्मचारी अधिकारी अक्षरश: एखाद्या भिकाऱ्यासारखे लाचार होत आम्हाला तुमच्याकडे घ्या यासाठी एवढ्या खेपा घालताहेत ओळखीतून किंवा थेट ज्या भिकारड्या पद्धतीने येताहेत कि तमाम मंत्र्यांवर हेच सांगायची वेळ आलेली आहे, भीक नको पण कुत्रा आवर. मंत्र्यांकडे मंत्री आस्थापनेवर रुजू यासाठी होणे कि ऐश करायला मिळते अधिकार गाजवायला मिळतात आणि सर्वाधिक महत्वाचे म्हणजे प्रचंड पैसे ओरबाडायला मिळतात, त्यापुढे त्यांच्या मनात दुसरे तिसरे काहीही नसते. अगदीच बोटावर मोजण्याएवढे असे ज्यांचे अगदी सुरुवातीपासून त्यांच्या मंत्र्यावर प्रेम असते बहुतेकांना फक्त आणि फक्त पैसेच खायचे असतात. गेली अनेक वर्षे मी तेच ते सरकारी कर्मचारी एखाद्या वेश्येसारखे धंदा म्हणून मंत्री आस्थापनेवर काम करतांना बघतोय….
मी तुम्हाला वारंवार हेच सांगतो आहे कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओळखणे तुम्हाला वाटते तसे अजिबात सोपे नाही, माझे हे वाक्य एकतर अधोरेखित करून ठेवा किंवा संग्रही ठेवा कारण या वाक्याची सत्यता तुम्हाला शंभर टक्के पटणार आहे. उद्धव यांच्या कुटुंब सदस्यांव्यतिरिक्त असे सुभाष देसाई अनिल परब मिलिंद नार्वेकर किंवा हर्षल प्रधान यांच्यासारखे जेमतेम आणखी दहा आहेत जे डे टू डे मुख्यमंत्र्यांच्या कानात जाऊन त्यांना नेमके काय हवे आहे सांगू शकतात इतर कोणीही नाही, जे
सांगतात कि मी उद्धवजींच्या फार जवळ आहे ते केवळ वातावरण निर्मिती करतात एवढे लक्षात ठेवा आणि स्वतःची फसवणूक करवून घेऊ नका जशी अलीकडे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःची करवून घेतली आहे. अगदी अलीकडे २२ प्रशासकीय अधिकार्यांच्या मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी बदल्या केल्या, नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार हे नक्की होते आणि तसे घडलेही पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या बदलीमागील अगतिकतेचा गैरफायदा एकाने उचलल्याचे भक्कम पुरावेच माझ्याकडे आलेले आहेत, तो भासवतो कि मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय नजीक नजदिक आहे, मी तुम्हाला हवे ते पोस्टिंग नक्की मिळवून देईल…आणि उद्धव यांच्या आपण जवळ आहोत अशी पद्धतशीर वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरलेल्या या व्यापारी वृत्तीच्या भामट्याने काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आगाऊ रक्कम स्वीकारली, मला कळले आहे. उद्या समजा अशी रक्कम अनिल परब यांनी स्वीकारली तर मी समजू शकतो पण या पद्धतीची चूक अनिल परब यांच्यासारखे उद्धवजींचे विश्वासू कधीही करणार नाहीत मात्र आम्ही उद्धव यांच्या अतिशय जवळचे असे भासवून, एखाद्या परब यांच्यासारख्या काही प्रभावी मंत्र्याच्या केबिनमध्ये बसून काही दलाल यापद्धतीची लुबाडणूक करून थेट उद्धव किंवा आदित्य यांच्या नावे काहींची करोडो रुपयांनी फसवणूक करू शकतात, हास्यास्पद म्हणजे त्या २२ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी केल्या त्यात त्यांनी इतरांचे रेकंमेंडेशन अजिबात विचारात घेतले नाही अशी माझी पक्की खरी माहिती आहे, वास्तविक अशी लुबाडण्याची कामे सर्वाधिक प्रमाणावर उद्धव यांच्यासमवेत सतत सावलीसारखे वावरणारे मिलिंद नार्वेकर सतत करून अधिकाधिक श्रीमंत सहज होऊ शकले असते पण त्यांनी उद्धव यांची शिस्त आणि स्वभाव नेमका अभ्यासल्याने नार्वेकर यांनी कधीही या अशा चुका केल्या नाहीत आणि ते किंवा प्रधान करणारही नाहीत…
www.vikrantjoshi.com
लिहायचे छगन भुजबळ यांच्या कार्यालयीन स्टाफवर होते पण विषय भलतीकडेच भरकटला. हरकत नाही, पुढल्या भागात भुजबळ यांच्या कार्यालयावर असा काही प्रकाशझोत टाकेल कि वाचणारे सारे अवाक होतील आश्चर्यचकित होऊन तोंडात बोटे घालतील. एकच सांगतो, उद्धव प्रसंगी कोणाचेही ऐकत नाहीत ऐकणारही नाहीत अगदी शरद पवारांचे देखील त्यामुळे त्यांच्या नावे कोणी गैरव्यवहार करायला आलाच तर कृपया अशांना धुडकावून लावावे फसवणूक करवून घेऊ नये. ज्यांनी उद्धव यांना अंधारात ठेवून मागल्या मंत्रिमंडळात भरभक्कम मिळविले ते त्यातून यावेळी पद्धतशीर वगळल्या गेले, पवारांना प्रसंगी दचकून राहिले नाही तरी चालते पण उद्धव यांना नक्की वचकून असावे. माणूस एकदम खतरनाक आहे म्हणूनही यशस्वी आहे…
क्रमश: हेमंत जोशी