एमएसआरडीसीचे अनिल गायकवाड,
अमेरिकेला का कसे केव्हा जाऊन आले :
सरकारी नोकरी करतांना सामाजिक भान जपणारे काही अधिकारी कायम माझ्या स्मरणातले मला मनापासून आवडणारे त्यातलेच एक नाव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अनिलकुमार गायकवाड, रस्ते विकास महामंडळाचे बॉस म्हणून प्रचंड व्यस्त असतानाही सतत दरदिवशी कायम स्वतःच्या जातीपलीकडे सामाजिक भान जपणारा असा अवलिया अधिकारी ना मी आजतागायत पाहिलेला ना अनुभवलेला. स्वतःच्या बौद्ध धर्माविषयी प्रचंड आदर त्याचवेळी कुठल्याही टीकेची अजिबात चिंता पर्वा काळजी न करता थेट रा स्व संघाच्या कार्यक्रमांना अगदी सरसंघचालक मोहन भागवतांच्या नजरेत भरलेला हा उच्च सरकारी अधिकारी अर्थात अख्खे गायकवाड कुटुंबीय अगदी सुरुवातीपासून भाजपाच्या सेवेत रमलेले, बंधुराज सुनील गायकवाड तर लातूर मधून भाजपाचे खासदार म्हणून निवडून आलेले. मला मनापासून वाटते एकाचवेळी बौद्ध आणि हिंदू धर्माचे महत्व जाणणारे राखणारे गायकवाड पद्धतीचे कुटुंब अगदी विरळे. अलीकडे अनिल गायकवाडांना सहजच मी फोन केला, बंद होता, कानावर पडले कि ते परदेशात गेले आहेत, असे वाटले कि ते नक्कीच मुख्यमंत्र्यांसंगे दावोसला निघून गेले असावेत, परदेशातून परतल्यानंतर माझा मिस कॉल बघून त्यांचा फोन आला, मी दावोस ला गेलो नव्हतो ते म्हणाले पण त्यांचे पुढे वाक्य माझ्या कानावर पडले ते ऐकून मी चक्क उडालो कारण कुठेही गाजावाजा न करता ते परदेशात निघून गेलेले त्यामुळे नेमके कुठे गेले होते, त्यांच्या अफाट मित्रमंडळींची उत्सुकता शिगेला पोहोचलेली, मला अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीला आमंत्रण होते, त्यांनी नेहमीप्रमाणे शांततेने सांगितले इकडे मी मात्र जागच्या जागी उंचच उंच उडालो…
www.vikrantjoshi.com
राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ सोहळा तोही अमेरिकेतला, सतत चार दिवस विविध वेगवेगळ्या कार्यक्रमांनी मढलेला, प्रत्यक्ष शपथविधी व्यतिरिक्त विविध कार्यक्रम त्यात जगभरातले अत्युच्च मान्यवर सहभागी आणि त्यांच्यातला एक आमचा आमच्या राज्यातला हा समाजसेवी सरकारी अधिकारी, त्यांनी जे काय वर्णन केले, ऐकून डोळ्यात आनंदाश्रू दाटले. शपथविधी आणि व्हीआयपी डिनर विथ प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, हे दोन कार्यक्रम तर डोळ्यांचे पारणे फेडणारे, गायकवाड म्हणाले. विशेष म्हणजे अख्ख्या हिंदुस्थानातून देखील अगदी मोजक्या टॉपच्या मान्यवरांना ट्रंम्फ यांच्या अतिशय देखण्या भव्यदिव्य अशा शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण त्यातले एक राज्यातले कदाचित शासकीय नोकरीतले एकमेव अनिल गायकवाड थेट जगातल्या मान्यवरांसोबतीने विविध कार्यक्रमांना उपस्थिती, विशेष म्हणजे राहण्याची खाण्यापिण्याची सारीच व्यवस्था थेट व्हाईट हाऊस तर्फे सभोवताली सतत प्रचंड सुरक्षा व्यवस्था, क्वचित एखादा मुकेश अंबानी पद्धतीचा भारतीय नजरेत पडत होता त्यामुळे भारतीय अनिल गायकवाड जगभरतल्या जमलेल्या मान्यवरांचे कौतुक आणि कुतूहलाचे विषय ठरलेले, जगातले टॉपचे सारे जवळून अनुभवताना अनिल गायकवाडांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, आजवरचा अविस्मरणीय प्रसंग, अजूनही अनिलकुमार त्या स्वप्नातून बाहेर पडलेले नाहीत. मिस्टर कौस्तुभ धवसे, देवेंद्र फडणवीसांचे किंवा शासनाचे तुम्ही परदेशी व्यावसायिक संबंध जोडणारे आणि जोपासणारे, एकदा तरी गायकवाडांच्या या अमेरिकेन टॉपर्सच्या व्यक्तिगत संबंधाचा उपयोग तुम्ही करवून घ्यावा मला मनापासून वाटते जे राज्याच्या रस्ते दळणवळणाच्या बाबतीत नक्कीच फायदेशीर ठरेल. असूया हा शब्द माझ्या शब्दकोशात अजिबात नाही त्यामुळे जेव्हा केव्हा जवळचे मित्र आप्त थेट गगनाला गवसणी घालतात, छाती अभिमानाने फुलून येते. अनिल गायकवाड आम्हाला तुमचा अभिमान वाटतो…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी