उदय सामंत भाजपामय होतील,
मग एकनाथ शिंदे काय करतील :
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत म्हणण्याला फारसा अर्थ नाही मात्र शिंदे मनातून मनापासून यादिवसात अस्वस्थ आहेत हे नक्की आहे, सरकारात काही निर्णय त्यांच्या मनासारखे होत नसल्याने ते अस्वस्थ आहेत, पण शिंदे यांच्याकडे फडणवीसांचे दुर्लक्ष होते असा समज खुद्द शिंदे यांनी करवून घेऊ नये जर दुर्लक्ष करायचे असते तर तिकडे दावोस मध्ये अतिशय व्यस्त असतांना त्यांनी गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांच्या पालक मंत्री नियुक्तीला नक्कीच स्थगिती दिली नसती किंवा मी परतल्यावर भरत गोगावले यांना रायगडचे आणि दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्री करेल हा शब्द त्यांनी शिंदेंना फोनवरून नक्की दिला नसता. दुसरा मुद्दा असा कि एकनाथ शिंदेंबाबत भाजपाची फडणवीसांची गरज संपली आहे का त्यावरही उत्तर असे कि भाजपाला शिंदे आजही महायुतीमध्ये हवे आहेत, शिंदे बाहेर पडतील एकाकी होतील त्यांच्या शिवसेनेचे आणखी तुकडे होतील या म्हणण्याला आज तरी नक्की काही अर्थ नाही कारण या पाच वर्षात ज्या वेगाने फडणवीसांना फार मोठी राजकीय झेप घ्यायची आहे ती घेतांना आपला शरद पवार, फडणवीस नक्कीच करून घेणार नाहीत, माझे हे वाक्य आजच याठिकाणी लिहून घ्या, शरद पवार पद्धतीने आपण राज्यातल्या नेत्यांच्या आणि मतदारांच्या मनातून एक लबाड पाठीत खंजीर खुपसणारे दगाबाज आणि संधीसाधू नेतृत्व म्हणून नाव घालवायचे नाही हेही त्यांनी ठरविलेले आहे, विश्वासू आणि शब्द पाळणारा केलेले सहकार्य न विसरणारा नेता हीच प्रतिमा ते याही पुढे जपणार आहेत मात्र हेडमास्तर मुख्यमंत्री या नात्याने त्यांना बिघडलेले वातावरण बदलून गटारगंगा वेगाने साफ कारायची असल्याने जे तानाजी सावंत पद्धतीने वागतील तुटून पडतील खात सुटतील मग तो महायुतीतला किंवा प्रशासनातला प्रसंगीबलाढ्य मोपलवार किंवा कुठलाही कितीही ताकदवान नेता जरी असला तरी ते यापद्धतीच्या राज्यबुडव्या खादाड महाभागाच्या ढुंगणावर क्षणार्धात लाथ घालून त्याला बाहेर काढतील हे एक कटू सत्य आहे लक्षात ठेवा आणि हे असे मोदी पद्धतीने ते वागले नाहीत तर त्यांना जी राष्ट्रीय राजकारणात आणि देशसेवी कार्यात फारच मोठी राजकीय झेप घ्यायची ती घेणे त्यांना अजिबात शक्य होणार नाही, फडणवीस बदलताहेत आणखी आणखी कठोर ते वागणार आहेत जे मला नक्की माहित आहे…
www.vikrantjoshi.com
शरद पवार एखाद्याचा वेश्येसारखा उपयोग करून नंतर त्यालाच संपवून मोकळे होतात हे जसे साऱ्यांच्या लोकधा आल्यानेच विशेषतः सर्व पक्षीय नेत्यांनी पवारांऐवजी फडणवीसांचे नेतृत्व मोठ्या विश्वासाने मान्य केले तेव्हा फडणवीस देखील पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वतःचे महत्व तेवत ठेवतील असे नक्की घडणार नाही, विश्वासाहर्तेचे दुसरे नाव देवेंद्र फडणवीस हेच तुम्हाला सदैव पाहायला मिळेल. आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा त्या फडणवीसांच्या नेमक्या वृत्तीचा आणि स्वभावाचा कि त्यांच्या पाठीशी उभे असणाऱ्यांची ते आठवण नक्की ठेवतात पवार पद्धतीने मदत सहकार्य करणाऱ्यालाच संपविणारे देवेंद्र शंभर टक्के नाहीत मात्र केलेल्या सहकार्यातून जर त्यातले काही फडणवीसांचा त्यांच्या नावाचा गैरफायदा जर काही घेत असतील तर मात्र मोदी पद्धतीने अशा दगाबाज किंवा दुकानदार वृत्तीच्या मित्रांची ते हयगय न करता त्याचा ललित टेकचंदानी करून मोकळे होतात, हे असेच यादिवसात किंवा मागल्या काही वर्षात त्यांच्या प्रसंगी कठोर भूमिकेतून बघायला मिळते माझ्या या वाक्याची नोंद महायुतीच्या समस्त नेत्यांनी आणि ज्यांना वाटते कि आपण त्यांच्या जवळ आहोत आणि आपल्याला त्यांच्या बाबतीत सहज धूळफेक करता येते त्या समस्त मंडळींनी आपल्या डायरीत आजच करून ठेवावी. तो केवळ एक योगायोग कि राज्याचे उद्योग मंत्री या नात्याने उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस एकत्र दावोसला जाऊन आले आणि हे पहिल्यांदा घडलेले नाही, मागेही जेव्हा फडणवीस दावोसला गेले होते तेव्हा त्यावेळेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई त्यांच्या संगतीने होते. फडणवीस पद्धतीने उदय सामंत यांना देखील आपली प्रतिमा यापुढे आणखी आणखी जपावी लागणार आहे त्यामुळे गरज सरो वैद्य मरो असे सामंत वागणार नाहीत किंबहुना केवळ फडणवीसांचा सांगण्यावरून सामंत यांनी थेट दावोस वरून ते आमदार घेऊन बाहेर पडणार आहेत त्यात तथ्य नसल्याचा खुलासा केला आहे किंबहुना उदय सामंत हे जसे गेल्या काही वर्षांपासून शिंदेंचे उजवे हात समजले जायचे तेच त्यांचे आजही तेवढेच घनिष्ठ संबंध आहेत किंबहुना फडणवीसांच्या नाराजीचा प्रसंगी अजिबात विचार न करता त्यांनी नेमके सांगून टाकले कि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढल्या काही दिवसात कोणत्या पद्धतीने बळकट केल्या जाणार आहे. आंटीच्या अड्ड्यावर जाणारा जसा बेवडा असतोच असे नाही तसे दावोसला फडणवीसांच्या संगे जाणे म्हणजे सामंत शिंदेंना सोडून फडणवीसमय झाले असे अजिबात घडणारे नाही. मिस्टर राऊत तुम्ही पसरविलेल्या अफवेमुळे सामंत यांचेच अधिक राजकीय नुकसान होऊ शकते, देवेन्द्रजी त्या एकनाथ शिंदेंना अंतर देणार नाहीत पण शिंदे यांनी देखील उठसुठ नाराज न होता आपली राजकीय रेषा अधिक मोठी करावी…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी