ज्याचे काम उठावदार असेल त्याचेच मंत्रिपद टिकेल :
श्री श्री देवेंद्र फडणवीसांनी सारे काही ठरवून ठेवलेले व ठरवून केलेले असते. हिवाळी अधिवेशनादरम्यान मला नको त्या कटकटींना सामोरे जायचे नाही, अधिवेशन संपले कि खातेवाटप जाहीर करावे, एकनाथ शिंदेंची हि सूचना आणि विनंती फडणवीसांनी विचारात घेतली, अधिवेशन समाप्तीच्या रात्री मंत्रिमंडळ खातेवाटप त्यांनी जाहीर केले.एकाचवेळी तिघांचाही लाडका तिघांनाही जवळचा त्या साऱ्यांचा आवडता मंत्री अर्थात उदय सामंत राज्याचे पुन्हा एकदा उद्योग मंत्री. अगदीच गंमतीने सांगतो या उदय सामंत यांचे त्या धनंजय मुंडे यांच्याच सारखे हुबेहूब म्हणजे करुणा ज्याला त्याला सांगते कि धनंजय एकेकाळी एकाचवेळी मला घट्ट बिलगून असायचे, जयश्रीताईंवर मनापासून प्रेम करायचे त्याचवेळी बाहेर देखील काहींना, केवळ मी तुमचाच, सांगून मोकळे व्हायचे, राजकारणातल्या उदय सामंत यांचे मुंडे पद्धतीचे हुबेहूब वागणे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा ते उजवा हात जणू दिवंगत विलासरावांचा ते उल्हास पवार त्याचवेळी त्यांना कायम लाडाने कडेवर घेऊन पटापट मुके देणारे फडणवीस आणि अजितदादा देखील, त्यातून सामंत यांना मनासारखे उद्योग खाते अगदी सहज मिळाले यावेळी त्यांनी या खात्याचा विशेषतः राज्याच्या औद्योगिक भल्यासाठी उपयोग करवून घेतला विशेषतः या खात्यात गेली 7-8 वर्षे धुडगूस घालणार्या एकाच कुटुंबातल्या निखिल लटके आणि गिरीश पवार या दोन्ही दरोडेखोर वृत्तीच्या दलालांना दूर ठेवले त्याचवेळी फडणवीस आणि शिंदे या दोन्ही मान्यवरांनी या दोघांवर करडी नजर रोखून त्यांना हुसकावून लावले तरच यावेळी उद्योग खात्याची भरभराट होणे शक्य आहे, सुभाष देसाई उद्योग मंत्री होते तेव्हापासून लटके पवार हि जोडगळी आणि त्यांनी संपूर्ण राज्यातील उद्योग खात्यात पोसलेले अधिकारी पुन्हा यावेळी देखील नेहमीप्रमाणे धुडगूस घालून मोकळे होतील, लटके पवार यावेळीही जर उद्योग खात्याने सांभाळले पोसले तर या दोघांचे आणि त्यांना डोक्यावर बसविणाऱ्या उद्योग खात्यातील समस्त शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हादरवून थरारून सोडणारे थक्क करणारे कारनामे मी जनतेसमोर पुराव्यांसहित मांडून मोकळा होईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यालयात काम करणाऱ्यांनी देखील या पद्धतीच्या साऱ्याच अतिरेकी वृत्तीच्या राज्य बुडव्या दलालांना चार हात दूर ठेवावे. नामदार उदय सामंत आणि बंधुराज आमदार किरण सामंत कर्तव्य आणि लोकोपयोगी कामें पार पाडण्यात कमालीचे कसलेले प्रचंड मेहनती अतिप्रचंड राजकीय अनुभवी असे कोकणातले विकास पुरुष आणि उत्तम असे पक्ष संघटक त्यांच्या संगतीने तिकडे ते नामदार नितेश आणि आमदार निलेश राणे निवडून आलेले, केवळ राज्याच्या हिताचा जर या चौघांनी काही काळ विचार केला तर उरले सुरले विरोधक त्या कोकणातून भुईसपाट झाल्याचे चित्र हे चौघे अगदी सहज निर्माण करतील अगदी सहज महायुतीचे महत्व अख्य्या कोकणात वाढलेले असेल…
www.vikrantjoshi.com
पुन्हा तेच माझे नेहमीचे उदाहरण तुम्हाला देतो विशेषतः अख्य्या मंत्र्यांना येथे सांगून ठेवतो कि कामकाजाच्या बाबतीत आपले आदर्श नितीन गडकरी हे असावेत म्हणजे राजकीय व सार्वजनिक जीवनात टिकून राहण्यासाठी किंवा कुटुंबाच्या आर्थिक भल्यासाठी चार पैसे गाठीशी ठेवण्यात अलीकडे अजिबात निषिद्ध मानल्या जात नाही त्यामुळे गडकरी जेव्हा 1995 दरम्यान राज्याच्या बांधकाम खात्याचे मंत्री झाले तेव्हापासून आजतागायत त्यांना खात्यातील देशातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत माझ्यासहित कधीही कोणीही टोकले नाही, समस्त मंत्र्यांनी गडकरी असावे गडकरीच व्हावे म्हणजे ज्या खात्याचे आपण मंत्री त्या खात्यात भरारी घेऊनही उलट चार पैसे तेही बेमालूम आणि जनतेचे आशीर्वाद घेत सन्मानाने मिळतात, मिळविता येतात, यापुढे अब्दुल सत्तर पद्धतीचे मंत्री निदान फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत टिकणे अशक्य आहे त्याऐवजी आधी उत्कृष्ट काम तयातून सहज मिळते उत्तम दाम हा गडकरी फॉर्म्यूला प्रत्येक मंत्री आणि राज्यमंत्र्याला नाव आणि पैसे मिळवून तर देईलच पण केवळ उत्तम कामगिरीतूनच त्यांचा सत्तेत दीर्घकाळ टिकाव लागेल हे ज्याने त्याने प्रत्येक मंत्रिमंडळ सदस्याने नेमके पाठ करून ठेवावे. ज्या सार्वजनिक बांधकाम खात्याने नितीन गडकरी यांना देशभरात आदराने बघितल्या जाते ते खाते फडणवीसांनी अत्यंत विश्वासाने शिवाजी महारजांच्या थेट वंशाला शिवेंद्र राजे भोसले यांना बहाल केले आहे विशेष म्हणजे एकेकाळी शिवेंद्र राजे महाराज यांचे पिताश्री जंटलमन अभयसिंह राजे भोसले याच बांधकाम खात्याचे राज्यमंत्री होते, शिवेंद्रराजे तुम्हाला अत्युत्तम खाते मिळाले आहे, बापसे बेटा सवाई होत तुम्ही या राज्याचे नितीन गडकरी होण्यासाठी यापुढे सतत झटले पाहिजे, सर्वप्रथम या खात्यातली घाण झपाट्याने उपसून काढली पाहिजे साफ केली पाहिजे, तुम्हाला हे राज्य त्या फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रात प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवायचे आहे. या खात्यातले सारेच भ्रष्ट अभियंते अगदी सहज थेट राज्यातल्या न्यायालयांना कसे हाताशी ठेवून प्रचंड धुडगूस घालतात, सारे प्रकार अतिधक्कादायक आहेत, उत्तम कामाला हात घाला, नेमकी माहिती देणे आम्हा पत्रकारांचे ते काम आहे, काळजी नसावी…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी