उद्याचा निकाल आज, त्यांचा नक्की उतरेल माज :
मतदार बंधू भगिनींनो, यावेळी भारताची फाळणी होणार नाही तर अवघ्या हिंदुस्थनांवर जर आम्ही हिंदू एकवटलो नाही तर बाटण्याचा बाका प्रसंग सार्यांवरच ओढवेल आणि हो,यावेळी महाराष्ट्रात महत्वाच्या खात्याचे मंत्री कदाचित मुख्यमंत्रीही मुसलमान नको असतील तर आपण सारेच्या सारे झुंडीने बाहेर पडूया, मतदान करूया. असो, मोठ्या खुबीने त्या बारामतीमध्ये सत्तेच्या किल्ल्या फक्त आणि फक्त पवार घराण्याकडेच असल्या पाहिजेत हा शरद पवारांचा हट्ट जणू हक्क असतो त्यामुळे बारामतीच्या स्थानिक मतदारांच्या आणि समस्त इतर नेत्यांच्या भावनेचा खेळखंडोबा तेथे सतत सर्हास सहज केल्या जातो, यावेळीही तेच, युगेंद्र कि अजितदादा, तर अजित पवार हेच निवडून येतील त्याशिवाय सर्व श्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन हे आमदार होतील, तुम्हाला सांगणे म्हणजे अमिताभला अभिनय येतो किंवा बोलतांना विशेषतः संध्याकाळनंतर नाना पटोले किंवा एकनाथ खडसेंचा तोल जातो हे तुम्हाला सांगण्यासारखे. ज्यांच्या निवडून येण्यावर शंका नको, अशी नावे तुम्हाला सांगतो म्हणजे अमळनेर मधून निवडून येणारा नक्कीच युतीचा उमेदवार असेल मग ते अनिल पाटील असतील किंवा शिरीष चौधरी. मुंबईतून आशिष शेलार पराग आळवणी मनीषा चौधरी अतुल भातखळकर संजय उपाध्ये अमित साटम राहुल नार्वेकर तिकडे ठाण्यातून प्रताप सरनाईक भुसावळ मधून संजय सावकारे चाळीसगाव येथून मंगेश चव्हाण आर्वीतून सुमित वानखेडे हिंगणा नागपूरमधून समीर मेघे बल्लारपूरातून सुधीर मुनगंटीवार भोकरमधून श्रीजया अशोक चव्हाण किंवा जिंतूर मधून मेघना साकोरे बोर्डीकर किंवा तिकडे कोकणातून आदिती तटकरे किरण सामंत उदय सामंत चारकोप मुंबईतून योगेश सागर गोरेगावातून विद्या ठाकूर यांच्या निवडून येण्याविषयी साधी शंका देखील घेणे म्हणजे खाली मान घालून सरळ रस्त्याने चालणार्या प्रेयसीच्या चारित्र्यावर तिच्या प्रियकराने संशय घेणयासारखे….
www.vikrantjoshi.com
अत्यंत महत्वाचा मुद्दा जळगावातून सतत 9 वेळा निवडून येणाऱ्या आणि एकनाथ खडसे यांच्या हलकट वृत्तीचे बळी सुरेशदादा जैन यांच्याकडे गिरीश महाजन आणि कदाचित त्यांच्या सल्ल्यावरून देवेंद्र फडणवीस यांनीही दुर्लक्ष करण्याचा, अजूनही वेळ गेली नाही, आयुष्याच्या रम्य संध्याकाळी ज्या एकनाथ खडसे यांनीच अफाट नेते सुरेशदादा जैन यांना तुरुंगात पाठविण्याचे मोठे पाप केले ज्याचे शाप लगेच खडसे यांना भोगावे लागले, त्या एकनाथ खडसे यांच्या महाआघाडीला दुखावलेले सुरेशदादा काहीही झाले तरी नक्कीच जवळ घेणार नाहीत आणि भविष्यात गिरीश महाजन यांच्या यशस्वी नेतृत्वाला ते आव्हान देतील असे देखील नक्कीच घडणार नाही पण याच सुरेशदादांना जर याक्षणी महाजन फडणवीसांनी विश्वासाचे नाते निर्माण करीत जवळ घेतले तर मला वाटते केवळ चार दोन रात्रीतून हेच सुरेशदादा महायुतीला पोषक वातावरण निर्माण करून जळगावातून ते हमखास लाडक्या जयश्री महाजन यांच्याविरुद्ध सुरेश मामा भोळे यांना निवडून आणतील कारण आजही सुरेशदादांच्या राजकीय प्रभावाला आदराला फारसे ग्रहण लागलेले नाही, महाजन फडणवीस यांनी तातडीने पावले उचलावीत. दुसरा महत्वाचा मुद्दा असा कि ज्यांना भविष्यात आमदार व्हायचे आहे त्यांनी आत्ता याक्षणी उठावे आणि देवेंद्र फडणवीसांकडे चाकरी करावी म्हणजे पुढल्या काही दिवसात जशा विद्याधर महाल्ले यांच्या पत्नी श्वेता, औसा मधून अभिमन्यू पवार आणि आर्वीतून सुमित वानखेडे हमखास आमदार म्हणून निवडून येणार आहेत, पुढल्यावेळी तुमचेही नाव असेल किंवा ज्यांना वाटते जवळ असलेला पैसा राजकारणावर उडवायचा आहे त्यांनी उद्धव सेनेची उमेदवारी त्या सिद्धार्थ खरात किंवा सिद्धार्थ देवळे पद्धतीने मिळवून मोकळे व्हावे म्हणजे उमेदवारी मिळविण्यापासून तर निवडणूक निकाल लागेपर्यंत आपोआप तुमचे खिसे बऱ्यापकी खाली होतील…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी