खतरनाक ! जे मी बघितले तेच येथे सांगितले :
गेले काही दिवस लिखाण आणि व्हिडीओज केले नाहीत कारण पायाला भिंगरी लागल्यागत उभा महाराष्ट्र थेट सर्वसामान्यांत मिसळून त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून पिंजून काढतो आहे,तसेही येथे मुंबईत बसून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मला भेटणारे त्यांच्या भागातली नेमकी राजकीय स्थिती कशी एकतर भेटून सांगतात किंवा फोनवर बोलणे होते त्यामुळे इतर काही बाबा आमटे पद्धतीने पहुडल्या पहुडल्या पत्रकारिता करणे आजवर तसेही कधी जमले नाही आणि केलेही नाही. विक्रांत मुंबई ठाणे जिल्ह्यात पायाला भिंगरी लागल्यागत फिरतो आहे त्यामुळे नेमकी कोणाची सत्ता येणार आहे हे जवळपास आत्ताच लक्षात आले आहे पण नक्की निकाल आणि परिणाम मतदानाच्या चार पाच दिवस आधी सांगेल आणि नेमके तेच जसेच्या तसे घडेल. वास्तविक व्यवसायात ज्यातून यश मिळते अशी गुपिते फोडायची नसतात पण तरीही येथे सांगून मोकळे होतो. काही वर्षांपूर्वी एक दिवस अगदी सहजच मी WWF म्हणजे World wide friends या नावाने व्हाट्सअप ग्रुप सुरु केला आणि बघता बघता त्याला मोठा रिस्पॉन्स मिळाला, माझे व्यक्तिगत आता या भल्या मोठ्या ग्रुपकडे फारसे लक्ष नसते पण रात्री उशिरा जेव्हा त्यावर विविध सदस्यांनी टाकलेली माहिती वाचतो ऐकतो, अवाक होतो, एवढी प्रचंड आणि सखोल माहिती त्यात असते आणि समस्त सदस्यांची ज्या उच्चतम बौद्धिक पातळीवर आपापसात चर्चा सुरु असते फार वेगळी आणि अत्यावश्यक माहिती त्यातून मला अनेकदा मिळते त्यानंतर मुंबईतले संजय भिडे नागपुरातले रवी वाघमारे जळगावचे पत्रकार शेखर पाटील पद्धतीच्या अनेक मान्यवर समाजसेवी किंवा मीडियामधल्या मंडळींचे याच पद्धतीने राज्याच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय असे लाखो ग्रुप्स आहेत ज्यावर जनतेची झुंबड असते आणि या पद्धतीचे राज्यातले जे ग्रुप्स आहेत ते यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान प्रसिद्धीचे सर्वाधिक प्रभावी माध्यम ठरले आहेत असे माझे ठाम मत झाले आहे म्हणजे लोकांनी वृत्तपत्रे वाचणे केव्हाच बंद केले आहे, वृत्तपत्रांच्या खपाची आकडेवारी केवळ शासकीय जाहिराती लुटण्यासाठी लाटण्यासाठी सर्हास खोटी असते पण या पद्धतीच्या व्हाट्सअप ग्रुपमुळे विविध बातम्या देणार्या वाहिन्यांची देखील लोकप्रियता घसरत चालली आहे असे मला स्पष्ट लक्षात आले आहे, अतिशय महत्वाचे म्हणजे हे ग्रुप्स ज्यापद्धतीने मुसलमान द्वेष पुराव्यानिशी मांडतात आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ज्या प्रखर पद्धतीने पटवून सांगतात त्यातून मोठे समाजप्रबोधन होते किंबहुना मतदानासाठी बाहेर पडणे कसे अत्यावश्यक आहे हे या अशा पद्धतीच्या ग्रुप्समुळे विशेषतः हिंदू मतदारांना मनापासून पटले आहे किंवा महाआघाडी आणि महायुती यात नेमकी कोणाची सत्ता यावी हा प्रचार देखील अतिशय माहितीपूर्ण असतो थोडक्यात या विधानसभा निवडणुकीत एकही रुपया खर्च न करता विविध राजकीय पक्षांची आपोआप फार मोठी जाहिरात झाली आहे होते आहे, सर्वाधिक समाधानाची बाब म्हणजे जे स्थानिक उमेदवार मग ते आघाडीचे असतील अथवा युतीचे पण जे हिंदू धार्जिणे आहेत अशा उमेदवारांना व्हाट्सअप ग्रुपवर निवडून येण्यासाठी मोठी मदत होणार आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी