खळबळजनक ! त्या दोघांविषयी सांगूनच
टाकतो सारे काही :
अनुभवी बाप आणि हाताशी आलेल्या लेकामधे संघर्ष नाही शाब्दिक चकमकी नाहीत वाद नाहीत असे क्वचित घडते, विशेषतः वडील आणि मुलगा कमाईच्या एकाच साधनात एकत्र काम करीत असतील तर उडणाऱ्या संघर्षाला थोपवतांना शमवितांना प्रदीर्घ अनुभवी बापाला नाकीनऊ येतात जसे मी आणि माझा नेमका पत्रकारितेतच उतरलेला मुलगा विक्रांत, माझा या क्षेत्रातला अनुभव दांडगा तर तो उच्चशिक्षित, मग तो वादावादी बाचाबाची आणि त्यातून सुरु झालेला मानसिक संघर्ष माझ्या नजरेसमोर सतत दिलीपकुमार व अमिताभचा शक्ती सिनेमा यायचा, मात्र एक बरे होते तो आणि मी एकमेकांच्या ज्या चुका काढत असू त्यावर एकांतात आजही बसून विचार करतो आणि ज्याची चूक असेल तो दोन पावले मागे येतो, टच वूड त्यामुळे आमच्यातले वादळ हळूहळू खूपच कमी झाले आणि एकमेकांना त्याचे व्यवसायात किंवा एकत्र कुटुंब चालविताना फायदे झाले फायदे होताहेत हे त्या एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यातही खटके उडत होते पण त्यांच्याही घरात नेमके तेच घडले ऐन मोक्याच्या वेळी डॉ श्रीकांत शिंदे यांच्या ते लक्षात आले असावे कि संघर्ष वाढत ठेवला तर त्याचे दूरगामी परिणाम अत्यंत वाईट असतील आपल्यावर देखील जे बाळासाहेबांच्या घरी घडले तसे राजकीय अपयश संघर्षातून पदरी पडेल मग त्यांनी अचानक एकदिवस वडिलांचा हात हाती घेऊन यापुढे मी वेगळा श्रीकांत असेल सांगून टाकले ज्यातून बापसे बेटा सवाई असे सारेच या बापलेकाच्या बाबतीत सांगू लागले. एकनाथजींची मुले एकाचवेळी त्यांच्या डोळ्यादेखत देवाघरी गेली पण बघा देवाची कृपा कशी आज त्यांचा एकटा श्रीकान्त जणू त्यांच्या पोटी दहा कर्तृत्ववान ताकदवान मुले जन्माला येऊन बापाची छाती अभिमानाने फुलावी एवढा महाकाय पर्वतासारखा बलाढ्य निघाला किंबहुना खासदसरकीला पुन्हा निवडून येणे हे त्याचे स्वतःचे काम आणि कर्तृत्व त्यातून त्याला यश मिळाले किंवा मुलाच्या राजकीय यशासाठी एकनाथ यांना कधीही वणवण भटकावे लागलेले नाही. डॉ श्रीकांत स्वतः खासदार असूनही प्रभावी मुख्यमंत्री बापाच्या उगाच पुढे पुढे न करता एकनाथ यांना डॉ श्रीकांत शिंदे विशेषतः पक्ष बांधणीत आणि राजकीय परिघात एकूणच ज्यापद्धतीने सहकार्य करतात, हे त्यांच्या एका कुटुंब सदस्याने मला सांगितले, या दोघा बापलेकांमधला सुरुवातीचा संघर्ष आणि आजचा अत्यंत तल्लख मेहनती चौफेर नजर ठेवून यश खेचून आणणारा हा राजकीय युवा नेता बापाला सतत सहकार्य करणारा, मित्राचे असेही सांगणे कि जर श्रीकांत या क्षेत्रात उतरले नसते तर एकनाथजींचे आयुष्य मोठ्या आकड्याने कमी झाले असते. आज ते दोघे ज्यापद्धतीने एकमेकांना घट्ट पकडून बिलगून आहेत, समोर एकाचवेळी शंभर बलवान राजकीय शत्रू आणि हजारो कठीण प्रसंग उभे ठाकले तरी ते अगदी सहज त्यातून बाहेर पडतांना दिसतील किंवा दिसतात…
www.vikrantjoshi.com
नेमके वेगळे देवेंद्र फडणवीस, त्यांची आजतागायत एकाकी लढत, वास्तविक त्यांचाही बाप एकनाथजीपद्धतीने राजकीय वर्तुळातला, त्याकाळी म्हणजे भाजपाच्या संघर्षाच्या कालखंडात देखील आमदार झालेला यशस्वी ठरलेला बाप गंगाधरपंत पण ते फार लवकर गेले आणि अगदी 15-16 वर्षांचे असतांना देवेन्द्रजी एवढ्या लहान वयात फार मोठी स्वप्ने तेही पाठीशी पैसा आणि राजकारणात कुटुंब सदस्य नसतांना एकटे एकट्याच्या भरवशावर बघत होते आजतागायत तेच घडते आहे, उगाच एका ब्राम्हणांवर पुन्हा एका विषयावर जहरी टीका नको म्हणून कुटुंबाला राजकारणापासून कोसो दूर ठेवत दरदिवशी म्हणाल तर एकाकी आणि म्हणाल तर बॉर्न संघ स्वयंसेवक असल्याने त्यातून मिळालेल्या संघटनात्मक संस्कारातून कुटुंबाबाहेरचे देखील काही उत्तम मित्र कसे आधी जोडायचे नंतर त्यांना कट्टर मावळ्यांसारखे प्रत्येक प्रसंगात कसे त्या शिवबासारखे कामाला लावायचे, हे फडणवीसांनी कायम बेरजेचे राजकारण आणि समाजकारण केले. मित्रांनो मला वाटते त्यावर शैलेश जोगळेकर हे एकमेव उदाहरण पुरेसे आहे कि आपल्या या मावळ्याच्या मित्राच्या भरवंशावर देवेंद्र यांनी कँसर हॉस्पिटल नागपूर हे जगासमोर उत्तम उदाहरण घालून दिले. विरोधकांनी तर नसलेल्या व्यसनांत देखील देवेंद्र कसे आकंठ बुडाले असतात, पद्धतीने नक्की बदनाम केले असते,सुदैवाने भल्या पहाटे तयार झाल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हेच देवेन्द्रजी कायम कार्यकर्ते नेते आणि मावळ्यांच्या घोळक्यात तुम्हाला उठबैस करतांना दिसतात तेवढे बाथरूमला मात्र एकटे जातात त्यात हाडाचे संघ स्वयंसेवक त्यामुळे निवासस्थानी चार दोन संघ स्वयंसेवक किंवा मित्र परिवारातले हमखास मुक्कामाला आणि जेवढी फुरसत मिळेल तेव्हा एक नागपूरकर या नात्याने अघळपघळ हमखास गप्पा मारायला, माणूस आपोआप त्यामुळे वाईट मार्गापासून दूर असतो म्हणूनच मी फडणवीसांना एक उत्तम आणि राज्याला आवश्यक नेतृत्व असे संबोधतो. आणखी एक गुपित आज तुमच्यासमोर उघड करतो, राजकीय स्पर्धेतून अनेकदा त्यांनी काही जवळच्या मंडळींना दूर केले असेल पण ते क्षणिक असते, देवेन्द्रजी पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेतात. आपल्या या आवडत्या लाडक्या अभिमन्यूला या विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मनापासून मोठे सहकार्य करायचे आहे आणि तुम्ही जे त्यांच्यासाठी यावेळी केले ते मला लेखी कळवायचे आहे, मी नक्की त्यांना तुम्ही पार पाडलेली जबाबदारी तुमचे लिखाण तुमच्या नावासहित वाचून दाखविणार आहे आणि तसेही हा लेख तुम्हाला तुमच्या जवळच्या मंडळींना फॉरवर्ड करायचा आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हि जोडगळी राष्ट्रात महाराष्ट्र पुढे नेणारी कशी हेही ज्याला त्याला तुम्हालाच पटवून समजावून सांगायचे आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी