ये क्या हो रहा है :
या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना एकाचवेळी अनेकांना घायाळ करायचे आहे त्यातल्या काहींना तर कायमस्वरूपी संपवायचे आहे त्यांना सर्वप्रथम भाजपाला जमिनीवर आणून ठेवायचे आहे, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला कडेवर घेत त्यांचा मोठ्या खुबीने उपयोग करून घ्यायचा आहे त्याना सत्तेत सामील करून घ्यायचे आहे महाआघाडीत स्थान द्यायचे आहे त्याचवेळी उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंबीय त्यात राज ठाकरे हेही ओघाने आलेत आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला राज यांच्या मनसेला देखील पार रसातळाला नेत त्याचवेळी काँग्रेस त्यांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेला जवळ घेत फक्त आणि फक्त सुप्रिया सुळे यांना सुरुवातीचे किमान अडीच वर्षे काहीही करून तिला मुख्यमंत्री करून स्वतः राजकीय निवृत्ती घेण्यापूर्वी राज्याच्या राजकारणात आणि सत्तेच्या वर्तुळात कायमस्वरूपी सुप्रियाला स्थान मिळवून द्यायचे आहे, जे मी गेल्या सहा महिन्यांपासून तुम्हाला ओरडून सांगतो आहे कि शरद पवारांची तिरकी राजकीय चाल यावेळी एकाचवेळी अनेकांना गारद करेल आणि सुप्रियाला मुख्यमंत्री करण्यासाठी हेच शरद पवार आकाश पातळ एक करतील, शरद पवारांनी राज्यातल्या मराठा कुणबी मुस्लिम आणि अशा आणखी उभे केलेले हे चक्रव्यूह विशेषतः भाजपा आणि देवेंद फडणवीस कसे भेदतात त्यावर त्यांचे कसब अवलंबून आहे….
www.vikrantjoshi.com
विधानसभा निवडणुकांची त्या त्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे त्यात पुन्हा तेच अत्यंत खुबीने मोठ्या संख्यने निवडून येणारे उमेदवार निवडलेत ते शरद पवार यांनी त्या खालोखाल कदाचित नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण उत्तम यादी आहे ती वंचितची अर्थात प्रकाश आंबेडकरांची त्यानंतर उमेदवार निवडण्यात एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपा, उमेदवार ठरवितांना या दोघांना विशेषतः भाजपाला मोठी कसरत करावी लागली असल्याने फडणवीस नक्कीच विवंचनेत असतील त्यांना फार मोठी मेहनत या उमेदवारांना निवडून आणताना घ्यावी लागणार आहे सर्वाधिक रिस्की आणि कच्च्या लिंबूची यादी ती अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी यादी तयार करतांना फार मोठ्या खुबीने शरद पवारांचा हात होता, आणखी एक धक्कादायक कटू सत्य असे कि अजित पवार यांचे जे उमेदवार निवडून येतील त्यातले 90 टक्के निवडून आल्यानंतर लगेच तेही अजित पवारांशिवाय त्या शरद पवार यांनी जाऊन मिळणार नाहीत त्याची मोठी दक्षता अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी लागणार आहे, जे अजितदादांना सोडून गेले नाहीत किंवा शरद पवार यांना जाऊन मिळाले नाहीत याचा सरळ अर्थ ते केवळ शरद पवार यांच्याच सांगण्यावरून सोडून न गेलेले उमेदवार केवळ शरदरावांच्या राजकीय सोयीसाठी ते अजितदादांकडून विधानसभा लढवताहेत, विशेषतः जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून नेते भाजपाला येऊन मिळाले होते ती एक तात्पुरती सूज होती कारण भाजपा बाहेरच्या लबाड नेत्यांना भाजपा संघाचे संस्कार कधीच रुचणार नाहीत हे निदान यापुढे तरी भाजपाने ध्यानात ठेवावे. एक मात्र नक्की यापुढे काहीही झाले तरी अख्य्या पवार कुटुंबीयांनी अगदी कायमस्वरूपी अजितदादा आणि कुटुंबाशी संबंध तोडले आहेत हे तर उघड आहे कि अगदी सख्खा भाऊ देखील दादांपासून कायमस्वरूपी दुरावला आहे यात मोठी चूक अर्थात अजितदादा यांचीच, त्यांनी सत्तेचा कायम उपयोग केवळ स्वतःसाठीच करवून घेतला त्यामुळे निमित्त हवे होते ते मिळाले आणि अजितदादांपासून आता कायमचे सारेच आधी दुखावले नंतर दुरावले…
मित्रहो, वयाच्या केवळ बाविसाव्या वर्षी फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली, साधा नगरसेवक ते महापौर मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्री असा त्यांचा सत्तेतला किंवा विरोधातला सततचा संघर्षमय कार्यकाळ, जेव्हा मालमत्तेची वाटणी होते तेव्हा त्यातल्या एखाद्या भावाच्या वाट्याला अगदी पडीक नापीक जमीन येते तरीही तो निराश न होता त्या जमिनीवर देखील नंदनवन फुलवतो, आत्ताही तेच घडणार आहे येथेही ज्या दोघात संघर्ष आहे त्यातला एक शरद नावाचा नाठाळ लब्बाड नेता विरुद्ध केवळ योजना आणि कर्तृत्वाच्या भरवशावर पुढे जाणारा देवेंद्र आणि येथेही तेच, निवडणूक निकालानंतर अगदी शंभर टक्के अजितदादा किंवा उद्धव ठाकरे यांच्यासारखी नापीक पडीक जमीन फडणवीसांच्या वाट्याला आणि जे काही छान छान ते शरदरावांनी केव्हाच आपल्या ताब्यात जवळपास घेतले आहे, दिवार सिनेमात जशी आई शशी कपूरच्या बाजूला असते आणि गुंडगिरी अमिताभच्या बाजूला असली तरी शेवटी त्याचा जसा खात्मा होतो, आजही तेच, फडणवीसांच्या परीक्षेचा हा काळ, पण ज्या जनतेने फडणवीसांच्या हातून बदललेला महाराष्ट्र बघितला आहे ते प्रामाणिक मतदार मात्र त्या आईसारखे भरभक्कमपणे फडणवीसांच्या पाठीशी नक्की उभे असतील. एकनाथ शिंदे महत्वाकांक्षी आहेत मेहनती आहेत जात त्यांच्या बाजूने आहे यश त्यांना सतत मिळते आहे पण जर त्यांना याच शरद पवारांच्या मोहाला फसून, त्यांच्या जाळ्यात अकून स्वतःचा उद्धव ठाकरे करवून घ्यायचा नसेल तर त्यांनी पवारांच्या भुलथापांना काहीही झाले तरी बळी पडता कामा नये, शरद पवार कधीही पुढे जाणार्या जाऊ पाहणाऱ्या नेत्याचे होत नाहीत जे मला फार पूर्वी विलासराव देशमुख म्हणाले होते….
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी