अकोला विधानसभा निवडणूक, शिंदे
फडणवीसांची घोर फसवणूक :
हेच ते विद्यमान आमदार नितीन देशमुख, अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघातून उद्धव सेनेतर्फे महाआघाडीचे उमेदवार आहेत ज्यांनी आधी एकनाथ शिंदे यांच्या बंडा दरम्यान आपणहून आधी समस्त आमदारांची जुळवाजुळव केली त्यानंतर बायकोची आठवण काढत अचानक हंबरडा फोडला पळ काढला पुन्हा आपला मोर्चाचे उद्धव ठाकरेंकडे वळवून त्या बंडादरम्यान विशेषतः एकनाथ शिंदे आणि महायुतीची प्रचंड बदनामी केली ज्या देशमुख यांनी त्यांच्या जमिनीच्या अनेक वादग्रस्त व्यवहारात शिंदे मंत्री असतांना त्यांचा अनेकदा गैरफायदा घेतला त्यांनाच हे देशमुख फसवून बदनाम करू मोकळे झाले. जेवढी टिंगल ठाकरे कुटुंबाने शिंदेंची केली नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने ज्या देशमुख यांनी शिंदे यांना फसविले गंडविले आणि टिंगलटवाळी केली आज त्याच देशमुखांची विशेषतः जातीयवादी भूमिकेतून प्रसंगी महायुतीचे नेते देखील आतून मोठी मदत करत असल्याची माझी नेमकी माहिती आहे त्यातूनच मोठ्या खुबीने अकोला जिल्ह्यातील महायुतीच्या प्रभावी नेत्यांनी केवळ महाआघाडीच्या नितीन देशमुख यांना निवडून आणण्यासाठी जातीची मोठी खेळी खेळत देशमुख यांच्यासमोर कच्चे लिंबू माळी समाजाचे बळीराम शिरस्कार यांना उमेदवारी मिळवून देत आजच केवळ जातियवादी भूमिका आणि जमिनीच्या गैरव्यवहारात सामील असलेला हा त्यांचा साथीदार नितीन देशमुख यांचा विजय सोपा करून ठेवला आहे. मिस्टर शिंदे अँड मिस्टर फडणवीस, या क्षणाला अनुप धोत्रे भावना गवळी रणधीर सावरकर प्रताप जाधव यांच्यासहित समस्तमहायुतीच्या नेत्यांना हाग्या दम भरून जर या सार्या महायुतीच्या ताकदवान नेत्यांनी जर देशमुखांसमोर मुद्दाम दिलेल्या कमकुवत शिरस्कार यांना निवडून आणले नाही तर गाठ आमच्याशी आहे हे लगेच सांगून मोकळे व्हा कारण ज्या खुबीने मराठा कुणबी समाजाच्या अकोला बुलढाणा वाशीम यवतमाळ जिल्ह्यातील या बेरकी नेत्यांनी लोकसभा निवडणुकीला केवळ जातीच्या लोकांना सहकार्य करून महायुतीवर मोठ्या पराभवाची नामुष्की ओढवून आणली, तेच हलकट राजकारण हे त्या भागातले जातीचे कार्ड खेळतांना आतून मोठ्या खुबीने शरद पवार यांना सहकार्य करणारे आणि आपल्याच महायुतीला खड्ड्यात टाकणारे नेते या विधान सभा निवडणुकीत देखील मोठे संकट शिंदे फडणवीसांच्या महायुतीवर आणण्यात आघाडीवर आहेत. वास्तविक नितीन देशमुख यांच्या विरोधात कुणबी मराठा समाजाचा नारायण गव्हाणकर पद्धतीचा पुरून उरणारा उमेदवार उभा करणे गरजेचे असतांना दगाबाजीचे राजकारण खेळत महायुतीला फसविण्याचा डाव जणू त्यांच्याच नेत्यांनी टाकला आहे. अकोला परिसरातील महागड्या जमिनी स्वस्तात बळकाविणारे जे भूमाफिया नेते या नितीन देशमुख पद्धतीचे त्या महायुती मध्ये देखील आहे तेच नेते जर व्यवसाय आणि जातीच्या प्रेमापोटी शिंदे फडणवीसांची घोर फसवणूक करून नितीन देशमुखांचा विजय सुकर करीत असतील तर अशा नालायक नेत्यांच्या ढुंगणावर शंभर फटके मारून एक मोजावा त्यांना हाग्या दम देण्यात यावा…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी