पुन्हा एकवार महायुती सरकार :
एकाचवेळी एक काम हे आयुष्याचे धोरण असावे पण आमच्या मीडियात असलेले बहुतांश एकाचवेळी दोन दोन जबाबदाऱ्या उचलतात म्हणजे मीडियात काम करतांना आमच्यातले बहुतेक दलालीत उतरलेले आहेत असतात खोऱ्याने पैसे मिळवितात, आम्हाला ते जमणार नाही म्हणून मी अलीकडे कुटुंबात गप्पा मारण्याच्या ओघात तेच म्हणालो कि आपण आता पत्रकारिता आटोपती घ्यायला हवी आणि आपणही केवळ शासकीय व राजकीय दलाली करायला हवी ज्यात कष्ट कमी भांडवल नाही आणि खोऱ्याने पैसे मिळण्याची हमी, राजकीय आणि शासकीय वर्तुळात जेथे तेथे फक्त आणि फक्त दलालांचे साम्राज्य आणि दलालांना विकल्या गेलेले शासन प्रशासन आणि राजकीय नेते क्वचित एखादाच शासनातील किंवा राजकारणातील प्रामाणिक माणूस, राज्याच्या हिताची कोणालाही काळजी नाही, सरकार मग ते युतीचे असो वा आघाडीचे सारेच्या सारे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले ज्यांना कसलीही कोणाचीही कधीही अजिबात भीती वाटत नाही, ज्याच्या हाती सत्तेची दोरी त्याला शरण गेले कि संकट टळते हे प्रत्येकाला तोंडपाठ त्यामुळे उत्तम संस्कार केव्हाच इतिहासजमा झाले आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर त्यात महाराष्ट्रात लोकसभेला महायुती अपयशी आणि शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या महाआघाडीला चांगले यश मिळाल्याने विधानसभेला देखील पवार त्या उद्धव यांचा खुबीने वापर करीत महाआघाडीला यश मिळवून देत सत्तेवर आणतील असे अनेकांना वाटते आहे ज्याला फारसा अर्थ नाही किंबहुना पुन्हा एकदा सत्तेत महायुतीचा वरचष्मा जनतेला नक्की बघायला मिळणार आहे पण या महायुतीमध्ये यावेळी अजित पवारांना फारसे स्थान नसेल जागावाटपात त्यांच्या पक्षाच्या वाट्याला फारशा जागा येतील असेही अजिबात वाटत नाही…
www.vikrantjoshi.com
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीत यादिवसात राज्यातल्या समस्त मान्यवर नेत्यांचे, छगन भुजबळ कोणती भूमिका घेतात त्याकडे लक्ष लागलेले आहे, नेमकी कोणती भूमिका घ्यावी त्यावर स्वतः भुजबळ देखील काहीसे गोंधळलेले आहेत. रस्त्याने एखाद्याला जोराची लघवी लागली कि नेमके कुठे उभे राहून लघवी करावी या गोंधळात जसे अनेक पुरुष असतात तेच भुजबळांचे झालेले आहे म्हणजे वाकुल्या दाखविणार्या इशारे करणाऱ्या मधूनच डोळा मारून खुणावणार्या शरद पवारांकडे जावे कि उद्धव ठाकरेंना जाऊन बिलगावे कि भाजपाच्या कडेवर जाऊन बसावे या गोंधळात नक्कीच भुजबळ अडकले आहेत सापडले आहेत तसेही ते शरदरावांची राष्ट्रवादी सोडतांना डोळ्यात पाणी आणून, मला तुरुंगात खितपत पडण्याचा कंटाळा आलाय आता मला पुन्हा तुरुंगात जायचे नाही म्हणून अजिबात इच्छा नसतांना मी अजितदादासंगे बाहेर पडतोय केवळ संकटातून मुक्त होण्यासाठी पण मनापासून मी तुमच्यावर प्रेम करतो हेही ते सांगून बाहेर पडले होते मात्र यादिवसात भुजबळ यासाठी अस्वस्थ आहेत कि तसेही त्यांचे आणि अजित पवारांचे फारसे सौख्य कधीही नव्हते जे जयंत पाटलांचे तेच छगन भुजबळांचे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ यांनी थेट उद्धव आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबियांशी प्रस्थापित केलेले संबंध, त्यात उद्धव यांना लोकसभेला मिळालेले घवघवीत यश, पक्ष सोडतांना भुजबळांचे प्राधान्य जरी उद्धव ठाकरे यांना असले त्यानंतर त्यांचा कल शरद पवारांकडे असला तरीही भुजबळांनी राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पेक्षा ज्या नरेंद्र मोदींच्या मनात बरयापैकी स्थान निर्माण केलेले आहे त्या मोदी यांच्या भाजपामध्ये प्रवेश करणे त्यांच्या आणि पुतण्या समीर यांच्याही दृष्टीने अधिक हितकारी ठरेल…
अजित पवार महायुतीमधून आपणहून बाहेर पडले तर भाजपाच्या दृष्टीने त्यांचा निर्णय म्हणजे सुंठेवाचून खोकला गेला, पण बाहेर पडून जायचे कुठे हा नेमका प्रश्न अजित पवारांना पडला आहे कारण महाआघाडीने त्यांच्यासाठी केव्हाच दोर कापले आहेत आणि अजित पवारांच्या संगतीने राज्यातले जे नेते बाहेर पडले आहेत ते आता कुठल्याही क्षणी पुन्हा शरद पवारांकडे परत येतील हे नक्की आहे किंबहुना यापद्धतीच्या नेत्यांच्या आमदार नामदारांच्या शरद पवार यांच्याशी गाठीभेटी नक्कीच अजितदादांपासून लपून राहिलेल्या नाहीत तिकडे प्रफुल पटेल देखील भाजपामध्ये जाणार असल्याची माहिती उघड झालेली असल्याने अजितदादांना सतत आम्ल्पित्ताचा त्रास होतो आहे तसेही शिंदे फडणवीस युतीला विधानसभा निवडणूक शक्यतो अजित पवारांशिवाय लढवायची आहे कारण त्यांना पुढली विधानसभा जिंकायची आहे, अजित पवारांची काकांशी केलेली बेईमानी त्यांच्या चांगलीच अंगलट आलेली दिसते दादा रडकुंडीला आलेले आहेत त्यातून ते कसे बाहेर पडतात, त्यांचे राजकीय कौशल्य थोडक्यात पणाला लागले आहे. शेवटचा मुद्दा अधिक महत्वाचा, ज्याला लाडाने कडेवर घ्यावे त्यानेच कानात मुतून ठेवावे तसे राज्यातल्या भाजपाचे त्या एकनाथ शिंदेंबाबत झालेले आहे, ज्याला भाजपा अडाणी समजली त्यानेच आता भाजपाला बऱ्यापैकी गुंडाळून ठेवलेले आहे, शशी प्रशासन आणि राज्यातल्या राजकीय वर्तुळात शिंदेंची पकड आता घट्ट बसलेली आहे, यापुढे शिंदे यांच्याशिवाय किंवा त्यांना महत्व आणि प्राधान्य दिल्याशिवाय काहीही झाले तरी भाजपाला सत्तेत बसणे अशक्य झालेले आहे, आता शिंदे हे भाजपाच्या मागेपुढे नव्हे तर भाजपा शिंदे यांच्या पुढे पुढे करतांना दिसते आहे जे दृश्य अत्यंत वाईट आहे भाजपाच्या दृष्टीने घातक आहे त्यावर पुन्हा एकवार उद्धव ठाकरे शिवसेना आणि राज्यातिल भाजपा यांची पुन्हा एकवार युती, त्यावर रामबाण औषध ठरू शकते, बघूया काय घडते ते….
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी