भाजपाला धक्का मराठ्यांना धोका विरोधकांना मोका :
अलीकडे माझे अत्यंत आवडते थोर विचारवंत स्पष्टवक्ते प्रा. सदानंद मोरे अर्थातच जे बोलले ते पूर्ण विचाराअंती बोलले त्यांनी नेमके सत्य सांगितले कि या राज्यात जे समस्त ब्राम्हणांच्या बाबतीत घडले तेच राज्यातल्या मराठ्यांच्या बाबतीत नक्की घडू शकते, मराठे देखील या जातीपातीच्या लढाईत इतरांच्या मनातून कायमचे उतरणार आहेत, मी त्यावर पुढे जाऊन असे म्हणेन कि उतरणार आहेत असे नव्हे तर उतरले आहेत, म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. हीच वस्तुस्थिती अशे कि ज्या मराठ्यांकडे मुस्लिम बौद्ध आणि ब्राम्हणांसहित इतर साऱ्याच जाती धर्माचे आपल्या या राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱयातले ‘ आपला राजा ‘ या नजरेने बघायचे पाहायचे आधी हुकूमशाही असतांना त्यानंतर अगदी लोकशाहीतही ज्या मराठ्यांकडे राज्याचा प्रमुख किंवा राज्याचा राजा म्हणून बघायचे त्याच पद्धतीने गावागावातल्या राज्यातल्या समस्त मराठ्यांना मानसन्मान द्यायचे, ज्या चुका मनातून उतरण्या ब्राह्मणांनी केल्या त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी विशेषतः शरद पवार पद्धतीच्या विचारांच्या म्होरक्यांच्या नेत्यांच्या विषारी जातीयवादी प्रचाराला प्रसाराला भुलून राज्यातल्या समस्त मराठ्यांनी केल्या ज्यात भलेहि शरद पवारांचा किंवा त्यांच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या काही नेत्यांचा राजकीय आर्थिक फायदा झाला असेल पण फार मोठे नुकसान त्यातून संपूर्ण मराठा समाजाचे झालेले आहे, मराठेतर जनतेच्या मनातून मराठे आमचे राजे साफ उतरले आहेत अगदी मुस्लिम आणि बौद्ध धर्मियांच्याही ते अगदी बुडापासून मनातून उतरले आहेत, तीच वस्तुस्थिती आहे…
www.vikrantjoshi.com
मी जे काय सांगतो आहे त्यातले प्रत्येक वाक्य कदाचित जहरी बोचरे ठरेल पण खरे तेच सांगतो आहे कि पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विशेषतः जे घडले ज्यातून भाजपावर जी मोठी नामुष्की ओढवली आहे नेमके तेच पुन्हा विधानसभा निवडणुकीला घडेल जर राज्यातली भाजपा अशीच गाफील राहणार असेल तर किंवा भाजपामधले जे संघ स्वयंसेवक आहेत त्यांच्या मनातले नैराश्य आलेली मरगळ दूर होणार नसेल तर !! संघ विचारातून लहानाचा मोठा झालेला मराठा किंवा कुणबी हा शरद पवार पद्धतीच्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या चिथावणीला कधीही भुलणारा नसतो आजही भुललेला नाही तो हिंदुत्वावर ठाम असतो पण त्याचेही यापुढे पाऊल वाकडे पडू शकते, पवारांच्या विचारांशी जरी त्याची फारकत असली तरी, तो भलेहि पवारांच्या बाजूने झुकून पवारांच्या राज्यातल्या महाआघाडीला मतदान करणार नाही पण जे नेमके लोकसभेला घडले तेच त्याच्या हातून विधानसभेला नक्की घडू शकते तो मतदानाच्या दिवशी इतरत्र सहलीला निघून जाईल म्हणजे महाआघाडीला मतदान करणार नाही पण मतदान न केल्यामुळे भाजपाचे कदाचित त्यांच्या महायुतीचेही मोठे नुकसान करून मोकळा होईल. भाजपाच्या गाफील नेत्यांना आणखी एक धक्कादायक बातमी अशी कि आलेल्या निराशेतून राज्यातल्या ज्या मराठा मतदारांनी त्यांना मानणार्या असंख्य मतदारांनी जेथे भाजपा उमेदवार उभे होते तेथे मतदान अजिबात केले नाही पण याच विचारांच्या समस्त मराठ्यांनी जेथे जेथे महायुतीच्या एकनाथ शिंदे गटाचे पक्षाचे शिवसेनेचे उमेदवार उभे होते त्यांना हटकून हमखास मतदान केले त्यातून शिंदे यांच्या लोकसभा उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सहज सुकर झाला…
मराठ्यांचा देखील ब्राम्हण होता काम नये इतर ज्ञातींनी त्यांना जर दूर ढकलू नये असे वाटत असेल तर जातीय तेढ निर्माण होईल असे जे वातावरण अलीकडे आपल्या या राज्यात फार मोठ्या प्रमाणात विशेषतः मराठ्यांच्या काही चतुर संधीसाधू नेत्यांनी निर्माण केलेले आहे त्याला वैचारिक भूमिका घेणाऱ्या सुशिक्षित मराठ्यांनीच, आपले हे वागणे अजीबात योग्य नाही हे जातबांधवांना निक्षून सांगण्याची हीच ती वेळ आहे अन्यथा भविष्यात ब्राम्हण पद्धतीने आजच्या ताकदवान मराठ्यांना देखील वाईट परिणामांना नक्की सामोरे जावे लागणार आहे. जे मराठे आज स्वतःला दादा किंवा पराक्रमी समजतात, आमचे काहीही होणार नाही असे जे आज त्यांना वाटते पूर्वी हुबेहूब तेच ब्राम्हणांना देखील वाटायचे आणि त्यांचे पुढे जसे ब्राम्हणेतर मंडळींनी एकत्र येऊन गर्वहरण केले तेच नजीकच्या काळात मराठ्यांचे देखील नक्की होऊ शकते. फार पूर्वी जे उदाहरण मी सांगितले लिहिले होते ते आज पुन्हा सांगतो कि मराठ्यांपासून विशेषतः त्यांचे आवडते ब्राम्हण किंवा मराठेतर कसे झपाट्याने दूर गेले आहेत त्यावर शिवाजी महाराज हे अत्योत्तम उदाहरण ठरावे. आज नाही पण जोपर्यंत मराठेतर किंवा ब्राम्हण राज्यातल्या समस्त मराठ्यांपासून दूर गेले नव्हते मराठ्यांच्या आकंठ प्रेमात होते तोपर्यंत विशेषतः ब्राम्हणांचे किंवा मराठेतर हिंदूंचे प्रत्येक घर प्रत्येक कुटुंब त्यांची संध्याकाळ राजा शिवाजी संभाजी जिजाबाई किंवा शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण किंवा मराठा पराक्रमी सरदार, राजे पद्धतीचे जे जे महापराक्रमी मराठे राजे संत किंवा नेते महाराष्ट्रात होऊन गेले त्या साऱ्यांच्या घटना सत्य कथा सांगण्यात शिकण्यात ऐकण्यात घालवीत असे पण जेव्हा याच महापराक्रमी मराठ्यांची आजची पिढी आपल्याला सतत पाण्यात पाहते आहे, मोठा शत्रू मानते आहे, पाक विचारांच्या मुसलमानांना वठणीवर न आणता वरून आपल्यातल्याच समस्त हिंदूंना मानसिक शारीरिक बौद्धिक दरदिवशी प्रचंड त्रास देते आहे हे लक्षात आल्यानंतर अलिकडल्या काही वर्षात घराघरातून एरवी ओसंडून वाहणारे मराठा प्रेम ज्याला आधी कुलूप घातल्या गेले त्यानंतर पराक्रमी मराठा नेते आणि राजांची उजळणी करणे बंद करण्यात आलेले आहे. मराठ्यांचा पराक्रमी इतिहास मराठेतर मंडळींच्या डोक्यातून दूर होता कामा नये. सरतेशेवटी प्रा. मोरे मुलाखतीमध्ये जे म्हणताहेत ते घडेल का म्हणजे शरद पवार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना जर जनतेने सत्तेवर आणले तर ते मराठा आरक्षण देऊन मोकळे होतील का, स्वतः जरांगे यांनीच या तिघांना लेखी विचारून आठ दिवसात काय ते नक्की कळवा, विचारावे. मला खात्री आहे कि हे तिघेही आरक्षणाचा त्यांनीच भडकवलेला मुद्दा ते नजरेआड करून नेहमीप्रमाणे मोकळे होतील, नक्कीच समस्त मराठ्यांच्या समस्या अडचणी त्यांना यातना देणार्या आहेत पण इतर जातींना नाहक त्रास देत किंवा वेठीस धरून आमच्या राजाने राजकारण करू नये. जातीचा विषय येथेच संपत नाही…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी