पवारांची धूर्त खेळी फडणवीस सुडाचे बळी :
होय, आज या क्षणाला नेमके तेच झाले जे अभिमन्यूचे किंवा कर्णाचे झाले होते म्हणजे कर्णासारखे दानशूर आणि अभिमन्यूसासारखे महापराक्रमी देवेंद्र फडणवीसांचे आज त्या कर्णाच्या रथासारखे चाक नक्कीच युद्धभूमीवर रुतले फसले आहे किंवा एकट्याने हल्ला करीत अभिमन्यू देवेंद्र नक्कीच शत्रूंच्या घोळक्यात घुसले आणि आज ते फसल्या सारखे तुम्हा आम्हाला तसे वाटते आहे तसे वाटणे स्वाभाविक आहे पण माझे वाक्य येथे अधोरेखित करून ठेवा, शरद पवार किंवा एकाचवेळी अनेक धूर्त दुष्ट हितशत्रूंच्या राजकीय खेळीला फडणवीस बळी पडल्यासारखे दिसते आहे पण फडणवीसांचा कर्ण किंवा अभिमन्यू नक्की होणार नाही, ते या जीवघेण्या निर्दयी जुलमी प्रखर दुष्ट राजकीय खेळीतून नक्कीच सहीसलामत बाहेर पडतील आणि पुन्हा एकवार येथे स्वतःचा आणि त्यांच्या भाजपाचा गरुड करून सोडतील. वास्तविक काही राजकीय गुपिते माझ्यासारख्या विश्वासू मीडियाने बाहेर फोडायची काढायची नसतात पण आता राहवत नाही, तुमच्यासमोर निदान काही गुपिते उघड करणे मी येथे आवश्यक समजतो. संघ आणि भाजपाची त्याबळासाहेब ठाकरे पद्धतीची अगदी सुरुवातीपासूनची भूमिका कि ज्या मुसलमानांचे राष्ट्रावर प्रेम नाही त्यांच्यासमोर झुकायचे नाही किंवा त्यांच्या क्रूर खेळींना अजिबात न घाबरता त्यांच्याशिवाय हे राष्ट्र ताब्यात घ्यायचे पुढे न्यायचे, फडणवीसांनी बाळासाहेब संघ भाजपाची भूमिका पुढे नेली आणि उद्धव ठाकरे नेमके मुस्लिमधार्जिणी भूमिका घेत पवारांच्या पुतना मावशी प्रेमाला बळी पडले आणि येथेच देवेन्द्रजी मनातून अतिशय अस्वस्थ होते पण त्याचवेळी त्यांच्यापासून भाजपापासून महायुतीपासून विशेषतः राज्यातले दलित आणि मराठा कुणबी ज्यांच्यावर ते मनापासून प्रेम करतात ज्यांच्या भल्याचा त्यांच्या डोक्यात कायम विचार असतो ते या लोकसभा निवडणुकीत आपल्यापासून दूर गेल्याचे फडणवीसांच्या केव्हाच लक्षात आले होते, दलित मुस्लिम आणि मराठ्यांना भाजपापासून दूर नेण्याची पवारांची विशेषतः देशातल्या विरोधकांची खेळी यशस्वी ठरत चालल्याचे त्यांच्या ते सर्वप्रथम लक्षात आले त्यांनी लगेचच हे मोदींच्या कानावर टाकले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती ज्याचा फार मोठा फटका मोदी आणि फडणवीसांना बसला, राज्यातल्या दलित आणि मराठ्यांना पुन्हा कसे आपल्याकडे आणता येईल त्यांच्या मनातला द्वेष भीती शंका राग गैरसमज कसा दूर केल्या जाईल यासाठी म्हणूनच यादिवसात फडणवीस जिवाच्या आकांताने प्रयत्न करताहेत पण घरचे आणि बाहेरचे विरोधक थेट मधमाशांसारखे त्यांना बिलगून सतत डंख मारताहेत त्यागून बाहेर पडण्यासाठी फडणवीस धडपडताहेत आणि फडणवीसांना दलित व मराठा कुणब्याना जवळ करण्या विलंब होतो आहे…
www.vikrantjoshi.com
आता आणखी एक महाभयानक गुपित उघड करतो, जरी अजित पवार मोठ्या लावाजम्यासहित पवारांना सोडून महायुतीमध्ये सामील झालेले असले तरी अजित पवार किंवा सुनील तटकरे पद्धतीचे एक दोन नेते वगळता त्यातल्या एकही नेत्याने काकांपासून फारकत अजिबात घेतलेली नाही आणि महायुतीमध्ये अजितदादांचे केवळ नेते सामील झाले कार्यकर्ते फारसे फिरकलेले नाहीत ते आजही काकांना चिपकून चिटकून बिलगून आहेत ज्याचे पितळ पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्णतः उघडे पडले. देवेंद फडणवीस यांची अजित पवारांशी असलेली मैत्री एकदम मान्य पण ज्यांच्यावर आर्थिक गुन्ह्यांवर आधारित अनेक आरोप विविध पुरावे त्यांना सत्तेत सामील करवून घेण्यासाठी फडणवीसांपेक्षा तिकडे दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांनीच फार मोठी फिल्डिंग लावली होती जी यशस्वी ठरली, सारेच्या सारे तुरुंगात जाण्याऐवजी थेट सत्तेत तेही भाजपाच्या मांडीवर येऊन बसले पण त्यातल्या एकही नेत्याचे आणि कोणत्याही कार्यकर्त्याचे भाजपा महायुतीवर अजिबात प्रेम नाही, भाजपाचे भले व्हावे त्यातल्या एकालाही वाटत नाही किंबहुना कार्यकार्ते केव्हाच शरद पवारांना येऊन मिळाले आहेत आणि बाहेर पडलेले सारे नेते सतत थेट शरद पवारांच्या संपर्कात आहेत असतात. अगदी बारामती लोकसभा मतदार संघात देखील अजिबात वेगळे घडलेले नाही, स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकार्त्यांनी अजित पवारांच्या दादागिरीला न जुमानता थेट सुप्रिया यांचाच प्रचार केला आणि अजितदादांना आजच्या तारखेला स्थानिक राजकारणातून पूर्णत: बाहेर फेकले आहे ज्याचा मोठा फटका याच अजितदादांना शंभर टक्के विधानसभा निवडणुकीत बसणार आहे. महायुतीमध्ये सामील होऊन अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे पद्धतीच्या बहुसंख्य नेत्यांचा तुरुंगवास टळला त्यांचा पैसा जप्त झाला नाही आर्थिक नुकसान अजिबात झाले नाही काळा पैसा पांढरा झाला थोडेफार राजकीय नुकसान झाले पण ते तात्पुरते आहे हे या नेत्यांना नेमके माहित असल्याने त्यांना त्याचे दुःख नाही मात्र राज्यातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समस्त गुन्हेगार नेत्यांना पाठीशी घातल्याने भले मोठे नुकसान फक्त आणि फक्त भाजपाचे झाले आहे, जी चूक फडणवीसांकडून नाही तर थेट मोदी शाह पद्धतीच्या भाजपा श्रेष्ठींकडून झालेली आहे. आणखी एक गुपित सांगतो, अगदी आजच्या तारखेला विशेषतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे परतण्याची इच्छा व तयारी असणसर्या नेत्यांची यादी ठाकरे पवारांच्या अगदी वरच्या खिशात आहे पण ठाकरे व पवार भाजपा युतीचे आणखी नुकसान आधी घडवून आणतील त्यानंतर या इच्छुकांना आपल्याकडे घेतील आणि हे नेमके माहित असल्याने फडणवीस अस्वस्थ आहेत, त्यांना आता ढासळलेल्या भाजपाला या संकातून बाहेर काढायचे आहे म्हणून ते सांगताहेत, मला सत्तेतून मुक्त करा, मला पक्ष सांभाळायचा वाचवायचा आहे…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी