अस्वस्थ करून सोडणारा संघ,
न कळणारा न कळलेला संघ :
संघाची व्याप्ती संघाचे विचार संघाचे कार्य संघाची भूमिका संघाचे स्वप्न जेथे संघात आयुष्य घालविणार्या संपूर्ण जीवन संघासाठी वेचणाऱ्या स्वयंसेवकाला किंवा पूर्ण वेळ प्रचारकाला संघ नेमका कसा कळलेला नसतो तेथे संघाबाहेर राहणारे तुमच्या माझ्यासारखे कितीतरी कडवे हिंदू भलेही, पण नेमका संघ आपल्याला तर नक्कीच समजलेला नसतो समजणे तसेही अशक्य आहे. मी स्वतः कडवा जहाल हिंदू आहे आणि केवळ रा स्व संघ एकमेव या देशातले हिंदुत्व अबाधित ठेवू शकतो एवढे मात्र मला नेमके समजलेले असल्याने माझा संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायम सकारात्मक असतो, संघाचे महत्व आणखी वाढावे अस्तित्व आणखी आणखी वाढावे असे मला किंवा ज्यांना हिंदुत्व मान्य आहे जगातल्या अशा साऱ्यांनाच संघाविषयी सतत वाटत असते आणि ते स्वाभाविक आहे. या देशातला संघ विचार आणि काँग्रेस विचारसरणी कधीही लोप पावणार नाही असे मला याआधी कायम वाटत आलेले पण काँग्रेसकडे असलेल्या उत्तम नेतृत्वाची सतत वानवा त्यातून काँग्रेस विचारसरणीचे देखील या देशातून उच्चाटन होऊ शकते असे अलीकडे नक्की वाटायला लागलेले आहे. संघापासून फारकत म्हणजे संघ आचार विचारांपासून फारकत या भूमिकेवर अलीकडे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेले वादग्रस्त विधान त्यावर मी अस्वस्थ होऊन याआधीचा लेख आणि व्हिडीओ केला त्यावर केवळ दिवसभरात आलेल्या व्यापक स्पष्ट प्रतिक्रिया किंवा अनेक अभ्यासू मान्यवरांचे आलेले फोन कॉल्स त्यातून मी निश्चिन्त झालो आणि त्यांचे वक्तव्य तो केवळ एक राजकारणाचा भाग हे त्यातून जेव्हा माझ्या लक्षात आले, मी अधिक निश्चिन्त झालो…
www.vikrantjoshi.com
संघ आणि भाजपाशी संबंधित एका फार मोठ्या नेत्याने जे सांगितले ते तर प्रत्येकाने पाठ करून ठेवावे असे वाक्य आहे, संघाच्या ध्वजासमोर ( ज्याचा निर्बुद्ध उद्धव ठाकरे यांनी अलीकडे फडके असा उल्लेख करून स्वतःचे आणखी वाटोळे करून घेतले आहे ) त्यानंतर त्या त्यावेळेच्या सरसंघचालकांसमोर मग ते मोदी शाह फडणवीस गडकरी अडवाणी किंवा अन्य कोणीही ते केवळ एक सर्वसामान्य सामान्य स्वयंसेवक असतात आणि त्यांना तीच भूमिका मान्य असते, केवळ स्वयंसेवकाच्या भूमिकेतूनच ते जगत असतात त्यामुळे नड्डा यांचे वक्तव्य म्हणजे तो केवळ राजकीय भूमिकेचा खुबीने केलेला वापर त्यापलीकडे त्याला अजिबात महत्व नाही किंबहुना अगदीच स्पष्ट भाषेत सांगायचे झाल्यास नड्डा नावाच्या स्वयंसेवकाला मोदी यांनी असे बोलण्याचे आदेश अजिबात दिले नाहीत, आदेश कोणाकडून आले पुढले तुम्हीच समजून घ्यावे. भाजपा स्वतंत्र आहे आणि स्वयंपूर्ण आहे आमची त्यात लुडबुड नाही नेमके हे सुचविण्यासाठी संघाने केलेली हि सूचना ज्याची नड्डा यांनी मुद्दाम जाहीर वाच्यता केलेली असावी असे आता वाटते आहे. रा स्व संघ पुढल्या वर्षी शताब्दी वर्षात पदार्पण करतो आहे आणि संघाला आपले प्रचारक फक्त संघाच्याच कामात हवे आहेत, पूर्णवेळ प्रचारक आजन्म अविवाहित असतात ज्यांचे उद्दिष्ट केवळ संघाची सेवा हे एकमेव असते पण अलीकडे हेच प्रचारक जेव्हा संघापेक्षा भाजपाच्या राजकारणात अधिक रस घेऊ लागल्याचे जेव्हा संघाच्या लक्षात आले, भाजपाची बाजू हिरिरीने अगदी उघड मांडू लागले, थोडक्यात संघ विचारांपासून भरकटणे संघाला अस्वस्थ करणारे ठरले असावे त्यातून मूळ उद्देशांवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने हि पावले उचलली असावीत याचीच दाट शक्यता वाटते. स्वयंपूर्ण भाजपा मध्ये यापद्धतीने संघाची लुडबुड ती भाजपापेक्षा संघाला अधिक विचलित करणारी त्यामुळे कठोर शिस्तीच्या संघाने राजकारण दूर ठेवण्याचा घेतलेला हा कडक निर्णय…
अतिशय महत्वाचे म्हणजे भाजपा आणि संघ हे एकच आहेत असे चित्र निर्माण झालेले आहे जे संघाला अजीबात रुचणारे नाही किंबहुना ते संघ भूमिका आणि कार्याच्या दृष्टीने अतिशय घातक ठरत चालले असावे विशेष म्हणजे संघ भाजपासहित साऱ्याच राजकीय पक्षांना एकाच पट्टीने मोजतो हेही संघाला दाखवायचे होते आणि महत्वाचा आणखी एक मुद्दा असा कि भाजपा राजकीय पक्ष असल्याने त्यांच्या निर्णयात होणाऱ्या चुका ज्याचे खापर प्रसंगी संघावर फोडले जाऊ शकते म्हणून आमचा भाजपाशी संबंध नाही उलट हेच नड्डा यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठ्या खुबीने इतरांना सांगण्यात आलेले आहे. हिंदुस्थान हिंदू राष्ट्र हि संघाची संकल्पना, त्यातून ते प्रखर देशप्रेम कसे करावे बोलण्यातून नव्हे तर कृतीतून सिद्ध करतात, त्यांना हे करतांना कोणाही एका पक्षाचे लेबल लावून घेणे ना परवडणारे आहे ना आवडणारे आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी