अजितदादा, फडणवीस आणि शिंदे नेमके कोणाचे वांदे :
27 मे रोजी नेमके जे घडणार होते ते घडले नाही म्हणजे राज्याबाहेरच्या काही फुटकळ नेत्यांनी नाही म्हणायला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पण सिनेमात कोरस मध्ये नाचणाऱ्यांची जशी दखल घेतल्या जात नाही त्यापद्धतीचे प्रवेश करणारे नेते असल्याने त्यावर ना खळबळ माजली ना चर्चा झाली. वास्तविक 27 तारखेला वेगळ्या पद्धतीने अजितदादांची भारताला ओळख झाली असती कारण भाजपाने किंवा मोदी शहा यांनीच तो निर्णय घेतल्याने अजित पवार मोठे झाले असते पण ते का घडले नाही माशी नेमकी कुठे शिंकली कळत नाही पण अजित पवारांचे मोठे होणे पोस्टपोन झाले हे नक्की आहे कारण वरुण गांधींसहित अनेक नेते दादांच्या पक्षात प्रवेश करणार होते ज्यातून फार मोठा धक्का विशेषतः शरद पवार यांना बसला असता कारण राष्ट्रीय स्तरावरच्या नामवंत नेत्यांनी अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश करणे म्हणजे अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा देत भविष्यात थेट शरद पवार यांना आव्हान, हेच नेमके भाजपा श्रेष्ठींना घडवून आणायचे असल्याने शरदरावांसाठी तो धक्का आणि धोका तर अजितदादांना मोका आणि मुका हेच त्यातून सूचित होते. तटकरे यांनी प्रवेशाची बातमी विनाकारण फोडली असेही आता कानावसर येते आहे. वास्तविक प्रवेशाची तयारी झालेली असतांना दोन दिवस आधीच हि बातमी थेट पक्षातर्फे जाहीर सांगण्यात आलेली असतांना माशी नेमकी कुठे शिंकली लक्षात येत नाही किंवा काडी केल्या गेली कि काय असेही मनाला वाटते आहे…
www.vikrantjoshi.com
मित्रांनो, पार पडलेली लोकसभा निवडणूक अनुक्रमे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे राजकीय बदल आणि भवितव्य घडविणारी आहे, त्यामुळे संजय राऊतांनी जो आरोप केला कि अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदेंनी त्यांच्या विरोधकांना आर्थिक मदत आणि राजकीय पाठबळ दिले त्यात फारसा अर्थ नाही, शिवाय शिंदे यांना स्वतःला मशीत आहे कि लोकसभा निवडणुकीत जर त्यांच्या उमेदवारांचा मोठा पराभव झाला तर त्यांना फार मोठी राजकी किंमत नक्की मोजावी लागणार आहेकिंबहुना काहीही गरज नसतांना एकनाथ शिंदे यांनी वाजवीपेक्षा जे अनेक कमकुवत बदनाम उमेदवार विनाकारण उभे केले त्यांना निवडून आणण्यासाठी आणि मुख्यमंत्री या नात्याने त्यांना करावा लागणारा प्रचार त्यातून यापद्धतीच्या काड्या करण्यात त्यांनी नक्कीच वेळ घालविला नाही, राऊत यांनी आपापसात भडकविण्यासाठी सोडलेली ती एक पुडी आहे होती. एक मात्र नक्की कि मोदी यांचे फडणवीसांवर पुत्रवत प्रेम आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान ज्यांनी फडणवीसांना त्रास दिला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर मोदी जाम भडकलेले आहेत, काड्या करणाऱ्यांना मोदी नक्की सोडणार नाहीत…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी