मतदारांनो करा राडा, मोदींना पाडा हिंदुत्वाला गाढा !!
सिने अभिनेता गोविंदा इतरांची बेमालूम नक्कल करून हे महाशय हिंदी चित्रपट सृष्टी जसे गाजवून मोकळे झाले म्हणजे दिलीपकुमार राजेश खन्ना अमिताभ पासून तर थेट मेहमूद पर्यंत कित्येकांच्या अभिनयाची नृत्याची बोलण्याची संवादफेकीची नक्कल करून अभिनेता गोविंदाने जसे चौफेर यश मिळविले, प्रसिद्धी आणि पैसे मिळविले, राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील नेत्यांमधल्या त्या गोविंदाने आजतागायत अनेकांच्या वागण्या बोलण्यात भाषणातून किंवा कामगिरीतून हुबेहूब नकला केल्या आणि केवळ नकलांच्या माध्यमातून हे महाशय गगनाला भिडले, कधी या नेत्याने आपल्याच बापाची थेट नक्कल केली तर कधी नितीन गडकरींच्या नकळत त्यांचीच नक्कल केली, भाषणातून कधी हे महाशय मुंडे महाजन अटलजींची खूपवेळा नक्कल करतात तर वागण्या बोलण्यात अनेकदा मला त्यांच्यात दीनदयाळ यांचाही भास होतो, कित्येकदा त्यांची तिरकस राजकीय चाल किंवा कठोर कणखर भूमिका, असे वाटते अमित शाह आपल्या राज्याभोवताली सतत घुटमळताहेत, त्यांची प्रशासनावर असलेली पकड बघून म्हणावे वाटते, हा महाशयांनी त्या शरद पवारांना देखील सोडले नाही त्यांचीही ते नक्कल करून मोकळे होतात, त्यांचे सुसंस्कृत वागणे बोलणे वाचन जनसंपर्क त्यातून यशवंतराव चव्हाणांची आठवण होते अर्थात नरेंद्र मोदी त्यांच्या जिव्हाळ्याचा आदराचा विषय, या नेत्याचे थेट जाहीर आश्वासक बोल किंवा एकाचवेळी अनेक बदमाशांना अंगावर घेण्याची हिम्मत ताकद हे महाशय मोदी यांचे डुप्लिकेट असावेत, बघणार्याला वाटते, राजकारणातले हे गोविंदा अर्थातच देवेंद्र फडणवीस, ते लक्षात आलेच असेल, महायुतीची त्यांना साथ आहे किंबहुना अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्या तिघांचे एकमेकांना घट्ट बिलगत लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणे, जनतेला मनापासून भावले आहे आणि विरोधकांना अस्वस्थ करून सोडले आहे…
www.vikrantjoshi.com
एक महत्वाचे गुपित येथे उघड करतो. यादिवसात मी राज्यातल्या प्रत्येक लोकसभा मतदार संघाचा स्थानिक जाणकारांकडून आढावा घेत असतांना एक वेगळीच गम्मत सतत कानावर पडते आहे म्हणजे रावेर लोकसभा मतदार संघात जर विचारले तर जाणकार सांगतात रक्षा खडसे यांचा विजय नक्की आहे पण शेजारच्या जळगाव लोकसभा मतदार संघात स्मिता वाघ अडचणीत आहेत तेच जर जळगावात विचारले तर हेच उत्तर कि स्मिता वाघ जवळपास जिंकल्यात जमा आहे पण रक्षा खडसे अडचणीत आहे. हुबेहूब तेच नगर जिल्ह्यात म्हणजे नगर मधून सुजय विखे नक्की विजयी होतील पण शेजारच्या शिर्डीतले सदाशिव लोखंडे अडचणीत आहेत तेच बुलढाण्यात विचारले तर प्रताप जाधव जिंकून येण्यावर ते पैज जाधव यांच्या बाजूने पैज लावतात तिकडे अमरावतिच्या नवनीत राणा अडचणीत आहेत, सांगतात आणि अमरावती मध्ये दबक्या आवाजात राणा विरोधक हेच सांगतात कि आपण हि जागा आजच गमावलेली आहे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ नक्की पण बारामतीच्या सुनेत्रा पवार यांच्या विजयावर पुणेकर साशंक असतात तेच बारामती लोकसभा मतदार संघात सट्टा खेळणारे मात्र सुप्रिया सुळे यांच्या पराभवावर बिनधास्त पैसे लावतात असे कळते, थोडक्यात राज्यातल्या प्रत्येक मतदार संघात महायुतीचा उमेदवार निवडून येईल याची त्या मतदार संघातल्या प्रत्येक मतदाराला हमखास खात्री असतांना शेजारच्या मतदार संघाविषयी त्या प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल का सतत चुकचुकते निदान मला तरी हे कोडे न उलगडणारे आहे किंबहुना जे लोकसभा मतदार संघ ग्रामीण जनतेच्या भरवंशावर निवडून येतात तेथे मला स्वतःला देखील महायुतीच्या यशाची धागधुग अनेकदा वाटत राहते, शहरी भागातून मात्र शंभर टक्के महायुतीचे उमेदवार निवडून येतीलच असे सतत वाटते…
तरीही मला वाटते यावेळी मोदी आणि भाजपा सत्तेतून बाहेर जावी त्यामुळे अलिकडल्या दहा वर्षात अतिशय झपाट्याने जो विकास साधला, विकास कामे ठप्प होतील, बुद्धिमान किंवा उत्तम व्यावसायिक भारतीय पटापट बाहेर पडतील. हिंदू पुन्हा दहशतीखाली वावरतील आणि गोमातांची खुलेआम कत्तल सुरु होईल वरून लव्ह जिहाद मान वर काढेल. हिंदू मुलींचा एकाचवेळी अनेक मुसलमान शारीरिक विकृत व शहारे आणणारा आनंद घेतील, चिनी हल्ले वाढतील, पाकिस्थान बांगला देश पुन्हा बंगाल काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी करतांना स्थानिक काश्मिरी किंवा पश्चिम बंगालचे काफर स्थानिक मुसलमान त्यांना मदत करतील. त्यांना मनापासून सहकार्य करतील. देशद्रोह्यांचे उत्पन्न वाढेल कारण मोदी सत्तेत नसतांना त्यांना ड्रग्स किंवा शस्त्रास्त्रे इत्यादींची स्मगलिंग करणे अगदीच सोपे जाते. एकदा का सैन्याचे अधिकार मर्यादित केले कि शेजारच्या राष्ट्रातून अगदी सहज घुसखोरी होते जे ममता बॅनर्जी किंवा देशातल्या जात्यंध मुसलमान नेत्यांना आवडते, हवेहवेसे वाटते. वक्फ बोर्ड अनेक जमिनींवर हक्क सांगेल आणि धर्मांतर देखील मोठ्या प्रमाणात घडून येईल. मित्रांनो, आपण मतदार कसे विक्षिप्त आहोत कि जेव्हा केव्हा हिंदुत्व अडचणीत संकटात सापडते तेव्हाच आपल्याला नेमकी आणि नक्की त्या संघ भाजपाची हमखास आठवण होते, पण नको ते कडवे हिंदुत्व नको ते प्रगत राष्ट्र, नको ती प्रगती आणि नको ती सुरक्षितता, आपण सारे महाराष्ट्राची नक्कल करूया, सारे हिंदू एकमेकात भांडूया आणि हे राष्ट्र हे राज्य खड्यात गाढूया, नको ते मोदी नको ती महायुती…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी