विरोधक कासावीस, एकला चलो रे फडणवीस :
लग्नाआधीच शारीरिक ओढाताणीत तरुणीला दिवस जावेत त्यातून जन्माला आलेल्या बाळाला ज्याच्या पायरीवर सोडून दयावे त्याचा त्या बाळाशी काहीही संबंध नसतांना केवळ सहानुभूती भावनाप्रधान स्वभावातून ज्यांच्या पायरीवर बाळ सोडले होते त्या घर मालकांनी त्यासी घरात आणावे जोपासावे मोठे करावे त्या उदार मनाच्या घर मालकासारखे देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी केवळ व्यक्तिगत स्वार्थातून ते बाळ आधी जन्माला घालून नंतर त्याला रस्त्यावर आणून सोडले त्यापद्धतीचे हुबेहूब याच फडणवीस यांच्या भाजपामधले त्यांचे छुपे बेजाबदार हलकट खुजे हरामखोर विरोधक. सारे काही सुरळीत वातावरण ऐनवेळी भाजपच्या फडणवीसांच्या हितशत्रूंनी विनाकारण गढूळ करून ठेवले आहे. प्रियकरापासून दिवस गेलेल्या तरुणीला तिच्या नवऱ्याने उदार अंतःकरणाने आधी सांभाळून घ्यावे त्यानंतर त्या बाळाला विशाल मनाने बाप म्हणून आपले नाव द्यावे, फडणवीसांची हि अशीच दिलेर वृत्ती आणि पक्षातले त्यांचे बदमाश विरोधक त्या अनौरस पोर जन्माला घालणाऱ्या चालू मायबापासारखे. तुम्हाला याआधीही नेमके जे मी सांगितले आहे तीच वस्तुस्थिती आहे कि एकनाथ शिंदे ऐवजी त्याचवेळी जर फडणवीसांना मुख्यमंत्री नेमले असते तर याच फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून आलेल्या एकनाथ शिंदे यांना देखील उत्तमोत्तम सदस्य मंत्रिमंडळात घेण्यास नक्की भाग पाडले असते. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे याची काकणभर देखील शिंदे यांना कल्पना नव्हती किंबहुना त्यांचा आणि भाजपाचा राजकीय सौदा केवळ उपमुख्यमंत्री म्हणूनच अंतिम होता पण झारीतल्या शुक्राचार्यांनी मुद्दाम किंवा केवळ जेलसीतून नको ते घडवून आणले, देवेंद्र फडणवीसांना अपमानित करीत त्या शिंदे यांची लॉटरी काढून सत्तेतल्या राजकारणाचा पुरता बट्ट्याबोळ केला….
www.vikrantjoshi.com
देवेंद्र फडणवीसांना यावेळी मुख्यमंत्रीपद अजिबात नवखे नव्हते त्यांना यशस्वी प्रभावी मुख्यमंत्री म्हणून तब्बल पाच वर्षांचा अनुभव होता, विरोधकांना कसे सुतासारखे सरळ ठेवायचे आणि निवडणूक मग ती कोणतीही कुठलीही असो कशी जिंकायची याची नेमकी कला त्यांना मुख्यमंत्री या नात्याने अवगत झालेली असतांना, भाजपा अंतर्गतमूठभर विरोधकांनी सुमधुर बासुंदीत आपणहून माशी मिसळली आणि राजकीय वातावरण जे भाजपा आणि महायुतीसाठी अत्यंत पोषक होते, गढूळ करून टाकले. ऐनवेळी पंख त्या फडणवीसांचे छाटले, पण जेवढे राजकीय नुकसान फडणवीसांचे झाले त्यापेक्षा शतपटीने अधिक नुकसान भाजपा महायुतीचे झाले, आधी जे उद्धव किंवा शरद पवार यांच्यासारखे विरोधक ज्या फडणवीसांनी काबूत ठेवले, फडणवीसांना बाजूला सारल्याने त्याच विरोधकांचे आज फावले जे ऐन लोकसभा निवडणुकीत डोईजोड ठरले डोकेदुखी ठरले. राजकीय चुका फडणवीसांच्या झाल्या नाहीत असा माझा अजिबात दावा नाही पण फडणवीस आणि इतर नेत्यांमधला मोठा फरक असा कि तुम्ही अमुक मुद्द्यावर चुकता आहात हे एखाद्याने सांगायचा अवकाश, फडणवीस आपली चूक लगेच दुरुस्त करून मोकळे होतात, हट्टाला पेटून पक्षाला रस्त्यावर आणणारे ते अक्कलशून्य नेते नाहीत. पण वडीलकीच्या नात्याने फडणवीसांना त्यांची अमुक एखादी चुकलेली भूमिका लक्षात आणून देण्यापेक्षा केवळ इगो म्हणून वेगळेच डाव रचल्या गेले आणि आज जेव्हा महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपा महायुती काही ठिकाणी हेलकावे खात असतांना पुन्हा एकवार याच बदमाषांनी त्या फडणवीसांच्या हाती तलवार सोपवून स्वतः कपडे सांभाळत बसले आहेत…
देवेंद्र फडणवीस आधी संघ स्वयंसेवक आहेत त्यानंतर ते भाजपा नेते आहेत त्यामुळे अचानक उद्भवलेल्या संकटात डगमगून न जाता किंवा नकार घंटा न वाजवता निवडणूक जाहीर झाल्यापासून ते पायाला भिंगरी लागल्यागत उभा महाराष्ट्र पिंजून काढताहेत, ठिकठिकाणी त्यांचे सामान्य जनतेकडून एखाद्या हिरोसारखे स्वागत केल्या जाते आहे, संकटातून कसा पद्धतीशीर मार्ग काढायचा त्यांना ते तोंडपाठ आहे, ते मार्ग काढताहेत आणि लोकसभा उमेदवार नक्कीच ठरल्या आकड्याप्रमाणे निवडून येतील, राज्यातून मोठी ताकद महायुती मोदी यांच्या पाठीशी उभी करेल यात शंका नाही. आता एक अत्यंत अत्यंत महत्वाचा मुद्दा त्या एकनाथ खडसे यांच्या भाजपा पुनर्प्रवेशाचा, भाजपातले नारदमुनी गेल्या दोन महिन्यापासून खडसे यांच्या भाजपा प्रवेशासाठी सतत प्रयत्न करताहेत पण जर खडसे त्या नारायण राणे पद्धतीने आपला शब्द पाळणार असतील तर पुढल्या चोवीस तासात त्यांचा प्रवेश होईल, मी पक्षांतर्गत वाद अजिबात कधीही निर्माण करणार नाही हा शब्द जेव्हा मुलांची शपथ घेत राणे यांनी फडणवीसांना दिला त्याक्षणी राणे यांचा केवळ भाजपा प्रवेश झाला नाही तर त्यांचे त्यांच्या कुटुंबाचे मोठे राजकीय पुनःसर्वसन करण्यात आले, खडसे यांनी देखील दिवंगत निखिलची शपथ घ्यावी त्यांचे राजकीय उतारवय नक्की सुखात जाईल…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी