शेकाप संपली रे : गीते कि तटकरे :
उद्धव शिवसेनेच्या अनंत गीते यांना रायगड लोकसभा मतदार संघात शेतकरी कामकरी पक्षाने पाठिंबा देणे म्हणजे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची जबाबदारी वडगाव बुद्रुकच्या महिला सरपंचाने अंगावर घेण्यासारखी किंवा एखाद्या चिडलेल्या उंदराने, मी अमुक एखाद्या हत्तीणीला गर्भवती करून सोडेल हे इतर उंदरांसमोर मिशीवर ताव देत सांगण्यासारखे. एकेकाळच्या रायगड शेकाप मधल्या रणरागिणी मीनाक्षी पाटील अलीकडे देवाघरी जरी गेल्या असल्या तरी त्या तशा गेल्या दहा वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकीय दृष्ट्या पूर्णतः निष्क्रिय ठरल्या होत्या त्यांचे आक्रमक बंधू पंडित पाटील देखील प्रकृतीच्या कारणास्तव असून अडचण नसून खोळंबा पद्धतीने कसेबसे दिवस पुढे ढकलताहेत, जयंत पाटील आणि पंडित पाटील दोन्ही सख्ख्या भावंडांच्या बायका सख्ख्या बहिणी त्यामुळे त्या दोघांचाही मेहुणा कॉमन श्रीमान प्रशांत नाईक, याच प्रशांत यांच्या मुलीने पाटील घराणे तसेच शेकापचे परंपरागत कट्टर शत्रू शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलाशी लगीन उरकल्याने, शेकापचा धाक आता केव्हाच इतिहासजमा झालेला किंबहुना पाटील कुटुंबाला शासकीय कामकाज करताना किंवा कंत्राटे मिळविताना केवळ शेकापचा उपयोग होतो, हेच यादिवसातले विशेषतः शेकाप कार्यकर्त्यांचे खाजगीत कुरबुर करणे त्यात माजी आमदार विवेक पाटील नेमके शेतकऱ्यांना फसवून लुबाडून ठकवून आर्थिक अडचणीत ढकलून तिकडे तुरुंगात खितपत पडलेले वरून त्यांची प्रकृती सध्या अगदीच तोळामासा, थोडक्यात ज्या शेकापपासून पूर्वीचे स्थानिक नेते दूर गेलेले आणि कार्यकर्ते रुसलेले त्या शेकापने उद्धव सेनेच्या अनंत गीते यांना पाठिंबा देणे म्हणजे तेच कि एखाद्या सशाने थेट आवडलेल्या वाघिणीला करकचून डोळा मारण्यासारखे, लव्ह यु म्हणण्यासारखे….
www.vikrantjoshi.com
त्यात सुनील तटकरे यांचे वागणे एखाद्या बेरकी नेत्यासारखे म्हणजे अमुक एखादा नेता भर दिवसा थेट फडात नाचणाऱ्या बायकांशी देखील बहिणीचे नाते सांगतो आणि रात्री त्याच तरुणीला, तू तर माझ्या मामाच्या मुलीसारखी सांगून जसे जवळ घेऊन मोकळा होतो, तटकरे हे असेच कायम वागत आलेले म्हणजे जे दिवस ढवळ्या त्यांचे मोठे राजकीय शत्रू आहोत असे भासवतात तेच नेते स्वतः आणि कार्यकर्त्यांना सुनील तटकरेंना मतदान करा, सांगून मोकळे होतात, थोडक्यात यावेळी सुनील तटकरे यांच्यासाठी हि लोकसभा जिंकणे फारसे कटकटीचे नाही कठीण नाही, विशेषतः शेकापची आजवरची भूमिका सतत बदलत जाणारी अतिशय चंचल वृत्तीची, कधी ते तटकरेंना जवळ घेतात तर कधी शेकापवाले थेट बॅरिस्टर अंतुले यांना बिलगून मोकळे व्हायचे, आज हेच शेकाप नेते त्या उद्धव यांच्या उमेदवाराला जवळ ओढून मोकळे झालेले आहेत, नेमक्या याच धरसोड वृत्तीला रायगड लोकसभा मतदार संघातले जवळपास सारेच कार्यकर्ते एकतर शेकापला कंटाळून इतरत्र निघून गेले आहेत चालले आहेत किंवा ज्या सुनील तटकरे यांना भेटल्यानंतर झटक्यात काम होते त्या सुनील तटकरे यांना मतदान करण्यात अधिक उत्सुक व उत्साही आहेत. महत्वाचे असे कि सुनील तटकरे म्हणजे एकेकाळचे सिनेमातले मेहमूद म्हणजे जुन्याकाळी प्रत्येक सिनेमा मेहमूद शिवाय पूर्ण होत नसे तेच तटकरे यांचे, एकतर ते सतत सत्तेत असतात किंवा सत्तेतल्या प्रमुखांशी त्यांची मोठ्या खुबीने जवळीक असते त्यातून स्थानिक नेत्यांचे कार्यकर्त्यांचे कामे पटापट होतात त्यामुळे सामान्य कार्यकर्ते कायम तटकरे कुटुंबाभोवताली मोठा घोळका करून असतात, तरीही तटकरे हि लोकसभा जिंकतील कि नाही नेमके नक्की काय घडणार आहे, पुढल्या भागात तुम्ही ते वाचायलाच हवे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी