ब्राम्हणांशी वैर ब्राम्हणांचा वध
ब्राम्हण सावध ब्राम्हण गारद :
आपल्या या समाजात काही हलकट भावना भडकविण्यात उगाच स्वतःला धन्य समजतात.सुरुवात मी माझ्या घरापासून करतो, माझ्याच घरात किंवा माझ्या काही नातेवाईकांत विशेषतः माझ्या नंतरच्या पुढल्या पिढीत, आजच्या पिढीत माझ्याविषयी माझ्या कुटुंब सदस्यांविषयी माझ्या पिढीतल्या काही मान्यवर सदस्यांनी द्वेषाची बदल्याची अपमानित करण्याची बीजे खोलवर रोवून रुजवून ठेवली आहेत, वास्तविक माझा किंवा माझ्या मुलांचा अगदी दूरदूरपर्यंत आजतागायत आजच्या पिढीशी कधीही किंवा अजिबात संबंध आला नाही, आम्ही एकदाही कधीच कुठल्या प्रसंगी अमुक एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात एकत्रयेऊन भेटलो राहिलो बोललो नाही तरीही आमच्याविषयी आमच्या नातेवाईकांत अतिशय राग द्वेष शत्रुत्व नफरत आहे कारण आमच्याविषयी चुकीची माहिती पुरवून बिंबवून नव्या पिढीची माथी भडकविण्यात नातेवाइकातले बुजुर्ग किंवा मान्यवर यशस्वी ठरले आहेत, जे त्यांनी केले तेच मला देखील नक्की नेमके करता आले असते म्हणजे मला देखील माझ्या पुढल्या पिढीत द्वेषाची बीजे रोवून काही विघ्नसंतोषी नातेवाईकांविषयी आमच्या या घरात त्यांच्याविषयी बदल्याची भावना निर्माण करता आली असती पण मी ते कधीही केले नाही किंवा कुठल्याही गैरसमज करवून घेतलेल्या नातेवाईकांविषयी अजिबात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ दिलेले नाही, त्यामुळे ज्यांना आमच्याविषयी राग द्वेष बदल्याची भावना आहे नेमके त्या सर्वांना आजही माझ्या घरात आदराचे मानसन्मानाचे मोठे स्थान आहे कारण त्यांच्यातले जे चांगले तेवढेच मी माझ्या मुलांना पुढल्या पिढीला मुद्दाम वारंवार सांगितले आहे आणि हेच महाराष्ट्रात आज ब्राह्मणांविषयी नेमके घडतांना दिसते आहे. म्हणजे योगेश सावंत किंवा किंचक नवले सारख्या मराठ्यांमधल्या आजच्या पिढीची माथी शरद पवार यांच्यासारख्या ज्या काही चार दोन माथेफिरूंनी भडकवलेली आहेत त्यातून ब्राम्हणांविषयी काही मराठा तरुणांच्या मनात विशेषतः राज्यातल्या ब्राम्हणांविषयी किंवा देवेंद्र फडणवीसांविषयी बदल्याची भावना खोलवर रुजत चालली असतांना दिसते पण त्याचवेळी मला दाखवून द्या कि याचपद्धतीने एकही ब्राम्हणाच्या घरात मराठा समाजाविषयी किंवा इतर कुठल्याही जाती धर्माविषयी वाईट बोलले किंवा शिकविले जाते का, अपवाद फक्त देशातले जे पाक धार्जिणे मुसलमान आहेत, याउलट कुठल्याही ब्राम्हण कुटुंबात दिवसभरात जर शंभर वाक्ये बोलल्या जात असतील तर त्यातले किमान पन्नास वाक्ये हे समाजसेवा आणि देशसेवेविषयी असतात कारण प्रत्येक ब्राम्हणांच्या डोक्यात देशभक्ती राष्ट्रप्रगती व कडवे हिंदुत्व याशिवाय दुसरे काहीही नसते…
www.vikrantjoshi.com
शरद पवारांची हि एखाद्या सिनेमासारखी लोकसभा निवडणुकीपूर्वीची शेवटची घनघोर लढाई सुरु आहे, सिनेमातल्या खलनायकांच्याही दोन पावले पुढे शरद पवार द्वेषाचे आणि बदलाघेण्याचे वातावरण पेटविण्यात पुढाकार घेताहेत आणि या घनघोर लढाईत त्यांना सतत पुरून उरलेला नायक म्हणजे देवेंद्र फडणवीस, चारित्र्य आणि भ्रष्टाचार या भानगडीत फडणवीस कुठेही अडकतांना न दिसल्याने पवारांनी किंवा जे त्यांच्या समाजाचे चार दोन माथे भडकविण्यात पटाईत समजले जातात त्यांनी मग शेवटचे हत्यार जातीचे ते बाहेर काढले असून एरव्ही मराठा आणि ब्राम्हण एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे, पण फडणवीस आणि ब्राम्हण हे समस्त मरठ्यांचे शत्रू कसे, तरुणाईची माथी भडकावून देण्यात आणि आंदोलने पेटवून देण्यात काहीसे यशस्वी ठरताना दिसताहेत जे या राज्याचे मोठे दुर्दैव आहे. 1948 च्या दंगलीत ब्राम्हण त्यांच्या मालमत्ता टाकून थेट शहरात पळाले किंवा देशाबाहेर निघून गेले, खेड्यात आता औषधाला देखील ब्राम्हण उरलेला नाही त्याची अवस्था देखील थेट दलितांसारखी झालेली आहे म्हणजे दलित जशी खेड्यातून घाबरून शहरात पळाले तेच ब्राम्हणांचे झाले, येथवर ठीक होते कारण शहरात महानगरात किंवा परदेशात जाऊन ब्राम्हण पुन्हा स्थिरावले पुन्हा देश्प्रेमात आकंठ बुडाले पण आता पूर्वीच्याच संकटांचे ढग आकाशात जमा होऊ लागले आहेत ज्यामुळे शरद पवारांसारख्या काही नेत्यांना गालातल्या गालात हसू फुटते आहे मात्र राज्यातला ब्राम्हण पुन्हा काळजीत पडलेला आहे कारण ज्यांच्यावर आपण मनापासून सतत प्रेम करीत आलो आहे त्यांनीच पुन्हा केवळ तीन मिनिटात ब्राम्हणांना संपविण्याची भाषा वापरली आहे, आता आपण पुन्हा जायचे कुठे, अशा आशयाचे कितीतरी फोन मला विचारू लागले आहेत कारण समस्त ब्राम्हण कुटुंब त्यांच्या आयाबहिणी पुन्हा धास्तावले आहेत, किंबहुना महाराष्ट्र सोडून इतर कुठल्या राज्यात ब्राम्हण कायमस्वरूपी भयमुक्त राहू शकतील, हा विचार आता आम्हा ब्राम्हणांच्या डोक्यात घोंघावू लागला आहे. प्रखर देशसेवा आणि कणखर हिंदुत्व ज्याच्या नसानसात भिनलेले आहे तेच ब्राम्हण जर माथी भडकलेल्या तरुणांना नकोसे झालेले असतील तर दुसरीकडे निघून जाणे आणि पुन्हा अस्तित्वासाठी लढणे झगडणे हे जे काही दुष्ट नेत्यांनी आमच्यावर संकट लादले आहे, आम्ही काळजीत पडलो आहोत. छातीवर हात ठेवून मराठा समाजातिल मान्यवरांनी हे सांगावे कि मराठा समाजाविषयी ब्राम्हणांना कुठेही रागाची किंवा द्वेषाची भावना आहे का, उगाच का म्हणून असे गढूळ वातावरण काही समाजविघातक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण करताहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी