उरतील अवशेष, राज्यातली काँग्रेस नामशेष :
मी त्या पत्रकाराचे येथे नाव सांगत नाही, त्याचे नाव मोठे होते पण त्याला दारूचे व्यसन होते. एक दिवस हाच पत्रकार खिशात मोठी रक्कम घेऊन गावच्या जत्रेला गेला, जत्रेत गेल्या गेल्या एका अड्ड्यावर दारू प्यायला बसला, आधी झिंगला नंतर रस्त्याने मुक्कामाच्या ठिकाणी जायला निघाला पण आधीच चढलेली, त्यामुळे तो रस्त्याच्या कडेला झिंगून पडला, येणाऱ्या जाणार्या वाटसरूंनी त्याच्या अंगावर साधी अंडरवेअर देखील ठेवली नाही, कोणी पैसे काढून घेतले तर कोणी बोटातली अंगठी, कोणी कपडे तर कोण खिशातले किमती पेन, कोणी हातातले घड्याळ तर कोणी पायातले किमती बूट, ऐन थंडीच्या दिवसात त्याला लोकांनी पार नागडे करून सोडले, हा कुडकुडत पडलेला एका दयाळू वाटसरूला दिसला, त्याला याची किंव आली म्हणून त्याने या बेवड्याचे लिंग झाकण्या स्वतःकडला रुमाल पांघरला. राज्यातल्या एकेकाळच्या सर्वाधिक बलाढ्य अशा काँग्रेसची नेमकी अवस्था विशेषतः लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ज्या एकत्र घेतल्या जाणार आहेत, पार पडल्यानंतर त्या बेवड्यासारखी नक्की होणार आहे, पुढल्या काही दिवसात काँग्रेस मध्ये जे बदल घडून येणार आहेत, त्याची कल्पना अनेकांना नसल्याने त्यांना तेवढी कल्पना नाही पण वस्तुस्थिती अशी कि लोकसभा विधानसभा निवडणुकांआधीच महाराष्ट्रातल्या काँग्रेसला नक्कीच क्षय रोगाची लागण होणार आहे. उन्हाळ्यात जशी झाडाची पाने एक एक करून गळून पडतात, राज्यातली भाजपा त्या काँग्रेसची अवस्था हि अशी पानझडी सारखी करून सोडणार आहे, काल पर्वा ज्या भाजपाने अशोक चव्हाणांना मोठी ताकद देऊन मराठवाड्यातली काँग्रेस नेस्तनाबूत करून सोडली आहे तेच राज्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात काँग्रेसचे होणार आहे, नाना पटोले यांना काढा अन्यथा आम्हीच रस्त्यावर येऊ, हे सांगायला मी हे लिखाण करीत असतांना राज्यातले विविध महत्वाचे काँग्रेस नेते खर्गे दरबारी दाखल झाले आहेत…
www.vikrantjoshi.com
राज्यातल्या महायुतीला अनिल देशमुख, नाना पटोले, नितीन राऊत असे काही अगदीच चार दोन नेते नको आहेत केवळ त्यांनाच महायुतीने, भाजपाने, फडणवीसांनी चार हात लांब ठेवलेले आहे पण अमित देशमुख, विश्व्जीत कदम, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, दिलीप सानंदा, शिवाजीराव मोघे, विविध विद्यमान आमदार खासदार पद्धतीचे असेही अनेक असंख्य बहुसंख्य काँग्रेस नेते महायुतीकडे येण्यास उत्सुक आहेत पण थांबा आणि वाट पहा, पद्धतीच्या सूचना त्यांना फडणवीसांनी देऊन ठेवलेल्या असल्याने, काँग्रेसची होणारी गळती सध्या काहीशी थांबलेली आहे ज्याची संपूर्ण कल्पना त्यांच्या श्रेष्ठींना आहे. काँग्रेस विरहित राष्ट्र ज्याची सुरुवात नक्कीच महाराष्ट्रापासून होणार आहे. देवेंद्र फडणवीसांची त्यांच्याकडे येणाऱ्या कुठल्याही नेत्यांबाबत नेहमी नेमकी हीच भूमिका असते कि जो त्यांच्याकडे येतो त्याने फडणवीस किंवा भाजपावर संपूर्ण विश्वास टाकलेला असतो त्यामुळे अमुक एखाद्याच्या प्रवेश करण्याने त्या त्या नेत्याचे किंवा त्याच्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक असते, त्यांना वाऱ्यावर सोडून देता येत नाही, शरद पवारांची हि पद्धत भाजपाला अजिबात मान्य नाही कि अमुक एखादा डोईजड ठरलेला नेता आपल्या पक्षात आधी वाजत गाजत आणायचा नंतर मात्र त्या नेत्याला पार अडगळीत टाकून त्याचा मामा करून सोडायचा त्याला उध्वस्त करून सोडायचे, राजकारणात नॉव्हेअर करून सोडायचे, फडणवीसांच्या किंवा भाजपाच्या याच वृत्तीवर विश्वास टाकत राज्यातले बहुसंख्य उरले सुरले नेते त्यांच्याकडे कोणत्याही क्षणी येण्यास उत्सुक आहेत, अधीर आहेत, आतुर आहेत. राज्यातल्या महायुतीसमोर किंवा नरेंद्र मोदी यांच्यासमोर आजची काँग्रेस म्हणजे वार्धक्यातला भगवान दादा आठवतो किंवा बलाढ्य भारतीय क्रिकेट चमूसमोर नेपाळची टीम खेळविण्यासारखे हे घडतांना दिसते आहे किंवा हत्तिणीशी सेक्स करण्याची मनीषा एखाद्या उंदराने उराशी बाळगण्यासारखे हे घडते आहे…
एकेकाळी याच काँग्रेसला राज्यात देशात पाशवी मतदान व्हायचे आणि भाजपाच्या बहुतेक उमेदवारांची अगदी अनामत रक्कम देखील हमखास जप्त व्हायची, एकट्या मोदी यांनी केवढी हि काँग्रेसची घडी पार विस्कटवून ठेवलेली आहे, एखाद्या एकट्या खवळलेल्या वाघाने जमावाचा पाठलाग करावा आणि जमावाने जिवाच्या आकांताने जिकडे वाट सापडेल तिकडे धावत सुटावे, हे असे पळत सुटलेले मला ते काँग्रेसवाले दिसताहेत कारण एकटा नरेंद्र मोदी नावाचा वाघोबा त्यांच्या मागे धावत सुटलेला आहे. महात्मा गांधी यांचे नेहरू यांनी ऐकले असते म्हणजे ब्रिटिश विरोधात लढणारी काँग्रेस संघटना स्वातंत्र्य मिळताच गांधी यांच्या सांगण्यावरून सूचनेवरून त्याचवेळी बरखास्त केली असती तर आज त्यांची हि दुरावस्था नक्कीच पाहायला मिळाली नसती पण महात्मा गांधींच्या सूचना त्यावेळी नेहरू किंवा इतरांनी ऐकल्या नाहीत, आणि काँग्रेस संघटनेचे त्यांनी राजकीय पक्षात रूपांतर केले थोडक्यात तेथेच माती खाल्ली, आधी देशाचे आणि आज त्याच काँग्रेसने स्वतःचे वाटोळे करून घेतले. काँग्रेसच्या हे कधी लक्षातच आले नाही कि देशातल्या हिंदूंना सर्वधसर्मभाव मान्य नाही किंवा त्यांना हिंदुतर मंडळींनी केलेला छळ पुनःपुन्हा करवून घ्यायचा नाही, काँग्रेस नेते आपल्या मस्तीत जगत होते, इकडे हिंदू हळूहळू एकत्र येत होते जरी ते चारीबाजूंनी कमकुवत होते तरी, शेवटी तो दिवस उजाडला आणि हिंदूंनी आपली ताकद देशातल्या काँग्रेसला दाखवून दिली, हिंदुत्व सत्तेवर आले आणि हिंदूंना कस्पटासमान वागविणारे सारेच्या सारे रस्त्यावर आले. उरल्या सुरल्या काँग्रेससाठी हि शेवटची निवडणूक आहे, देश काँग्रेसविरहित वाटचाल करणार आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी