ज्याच्या हाती कुबड्या तो तर अट्टल घरफोड्या :
जे घर आडवे आले ते घर किंवा घराणे शरद पवार फोडून मोकळे झाले हा इतिहास आहे, रोहा माणगाव च्या तटकरे घराण्यातले अनिल तटकरे गेले काही महिने भाजपात येण्या प्रयत्न करीत होते पण एका म्यानात दोन तलवारी, उगाच भविष्यात डोकेदुखी नको, देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीला इच्छा असूनही अनिल तटकरे यांना यासाठी भाजपात घेतले नाही कारण तोपर्यंत अजित पवारांसोबत महायुती करण्याचे ठरले होते आणि दादासंगे त्यांचा हनुमान सुनील तटकरे सोबतीला असेल हेही नक्की असल्याने फडणवीसांनी अनिल तटकरे यांना आपल्या पक्षात घेणे टाळले, मित्राचे त्याच्या प्रेयसीशी ठरलेले लग्न मोडावे त्याचा फायदा आधीपासून घारीसारखी नजर ठेवून असणाऱ्या लबाड मित्राने घ्यावा तेच नेमके अनिल तटकरे बाबत घडले, राजकारणातले अट्टल घरफोड्या करणाऱ्या शरद पवार यांनी मग अनिल तटकरे यांच्यावर झडप घातली, याला बायको मिळत नव्हती तिला नवरा मिळत नव्हता थोडक्यात शरदराव व अनिल तटकरे अशा रीतीने एकत्र आले आणि एकाच दगडात पवारांनी दोन पक्षी मारले, म्हणजे सुनील व अनिल दोघांना कायमस्वरूपी एकमेकांपासून वेगळे केले आणि अजित पवार व सुनील तटकरे दोघांसाठी रोहा माणगावमध्ये तगडा प्रतिस्पर्धी उभा केला ज्याची सुनील तटकरे समोर राजकीय ताकद नक्की कमी आहे पण दादागिरीत अनिल व त्यांचे चिरंजीव माजी आमदार अवधूत तटकरे हे सुनील, अनिकेत व आदिती तटकरे पेक्षा कितीतरी अधिक प्रबळ आहेत, असे म्हणतात, अख्खे गाव विरोधात असले तरी फारसे बिघडत नाही पण एका घराचे दोन तुकडे पडणे, त्यासारखी मोठी डोकेदुखी नाही आणि या पद्धतीची डोकेदुखी निर्माण करण्यात शरद पवार यांचा हात धरणारा जगात दुसरा कोणीही नाही. आणखी एक गौप्य्स्फोट करतो फक्त याठिकाणी फार खोलात जाऊन माहिती देत नाही पण याच शरद पवारांनी म्हणे आता सुनील तटकरे यांच्याही एकत्र कुटुंबात फूट घडवून आणायची आहे, सुनील आणि अनिकेत एका बाजूला आणि आदिती दुसऱ्या बाजूला, हे घडवून आणण्यात काकांची चाचपणी नक्की सुरु आहे, यश मिळू शकते…
www.vikrantjoshi.com
दुसरा किस्सा तर अधिक गमतीशीर. गेल्या महिन्या दोन महिन्यांपासून अजित पवार अतिशय अस्वस्थ होते, किंबहुना आपण उगाच काकांना सोडले, हे देखील त्यांनी खाजगीत बोलून दाखविले होते कारण दादांच्या कानावर आले होते कि काका आपल्याला मोठा दगाफटका करण्याच्या तयारीत आहेत, नेमके काय घडणार आहे, हे दादांच्या लक्षात येत नव्हते पण कोठूनतरी सुनेत्रा वहिनींच्या कानावर बातमी पडली कि काका लवकरच दादा आणि बंधू श्रीनिवास यादोघांत मोठा राजकीय स्फोट घडवून आणताहेत, वहिनींनी लगेच हि बातमी दादांच्या कानावर घातली, त्यानंतर त्वरेने अजितदादांनी श्रीनिवास यांना विश्वासात घेत विचारले कि नेमके काय घडते आहे त्यावर विशेष आढेवेढे न घेता युगेंद्र राजकारणात उतरण्यास उत्सुक आहे आणि तुम्हाला त्यास सत्तेच्या राजकारणात समाविष्ट करण्यात अनेक अडचणी असल्याने आम्ही शरद काकांना सहकार्य करण्याचे जवळपास नक्की केले आहे आणि हे ऐकून घरफोडी करण्यात अट्टल असलेल्या काकांचा हा डाव त्याक्षणी अजित पवारांना अतिशय अस्वस्थ करून गेला किंबहुना हेच काका जर आणखी काही वर्षे राजकारणात सहीसलामत जगले तर ते जय आणि पार्थ या दोघात देखील नक्की अगदी माझ्या हयातीत फूट पाडून मोकळे होतील, हि चिंता देखील अजितदादा यांनी सुनील तटकरे यांच्याकडे व्यक्त केली. जय आणि पार्थ हवे त्या पद्धतीने अद्याप राजकारणात किंवा खाजगी आयुष्यात स्थिरावत नसल्याने आधीच काहीसे चिंतीत असलेले अजित पवार अजिबात इच्छा नसताना क्लीन इमेज असल्याने सुनेत्रा पवारांना येणाऱ्या लोकसभेला इंट्रोड्युस करताहेत त्यात आता हि नवीन डोकेदुखी, अर्थात नेमकी चूक अजित पवार यांची, त्यांनी राजकीय दृष्ट्या आजतागायत कधीही त्या श्रीनिवास आणि कुटुंबाचा विचारच केला नाही, सारे काही माझ्याच वाट्याला, श्रीनिवास यांची नेमकी अस्वस्थता नाराजी काकांनी हेरली आणि दादांना हा आणखी मोठा झटका बसला. अजित पवारांनी सतत अति राजकीय महत्वाकांक्षेपोटी घरातल्या इतरांचा कधी विचारच केला नाही म्हणजे आप्पासाहेब पवारांच्या नातवाला देखील दादांनी कायम असेच पाण्यात बघितले जो पुढे शरद पवार यांना विश्वासात घेत आपणहून राजकारणात आला आणि आमदार झाला, अजितदादांच्या मदती शिवाय आणि सुप्रिया सुळे यांना विश्वासात घेत राजकीय दृष्ट्या फार लवकर स्थिरावला. आणि आता युगेंद्र श्रीनिवास पवार यांची एंट्री, पवार घराण्यात पडलेली हि मोठी फूट, अजित पवारांना सावध करणारी जमिनीवर आणणारी आणि शरद पवार यांना त्यांनी केलेल्या कर्मांची फळे भोगायला लावणारी, नेमके हेच घडले आहे…
अपूर्ण : हेमंत जोशी