मधुकररावांचा भडासपूर्ण भावे प्रयोग :
प्रत्येक मोठ्या माणसाला एक उजवा हात म्हणून ओळखल्या जाणारा कोणीतरी नक्की असतो, असे उजवे हात बहुतेकवेळा नाकापेक्षा मोती जड किंवा चहापेक्षा किटली गरम पद्धतीचे असतात, फार कमी उजवे हात आपल्या बॉसच्या भल्यासाठी राबताना झटतांना दिसतात बहुतेक उजवे हात स्वतःचेच अतिप्रचंड भले करून मोकळे होतात. उद्धव यांचं उजवे हात मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे यांचे उजवे हात वादग्रस्त सचिन जोशी, गिरीश महाजनांचा उजवा हात रामेश्वर, गौतम अदानी यांचे उजवे हात यशस्वी व्यावसायिक प्रशांत निलावार किंवा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उजवा हात रवी शेंडगे अर्थात असे प्रत्येकच यशस्वी बड्या मंडळींना हमखास एक उजवा हात असतो, धूर्त सचिन जोशी ऐवजी एकनाथ शिंदे यांचा उजवा हात गुजराथ मधून थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात घुसलेला किंवा घुसवलेला आनंद माडिया म्हणून ओळखल्या जावा त्यासाठी लबाड अजय अशर याने बरेच प्रयत्न केले पण ते अलीकडे त्याच्याच अंगलट आले, एवढे कि या आनंद माडिया यास आधी मुख्यमंत्री कार्यालयातून हाकलण्यात आले त्यानंतर त्याला थेट गुजराथ मध्ये पळवून का लावण्यात आले, जरा नेमकी माहिती घ्या, अंगावर शहारे येतील. येथे त्या राणेंच्या उजव्या हातामुळे म्हणजे रवी शेंडगे यांच्यामुळे मला पुन्हा एकवार पत्रकार मधुकर भावे यांची आठवण झाली. भावे यांच्यामुळे आजतागायत जी अनेक असंख्य वृत्तपत्रे विधवा झालीत त्यांची नावे मी तुम्हाला याआधीच सांगितलेली आहेत पण त्यात आणखी काही वृत्तपत्रांचा उल्लेख राहिला म्हणून अनेकांनी फोनवरून माझ्याकडे संताप व्यक्त केला त्यातलेच आणखी एक वृत्तपत्र नारायण राणे यांनी काढलेले प्रहार हे दैनिक. त्याकाळी म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर किंवा राणे राज्याचे महसूल मंत्री असतांना त्यांनी केवळ एकमेव उद्देशाने हे दैनिक काढले, दरदिवशी त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर सामना दैनिकातून टीका केली जायची आणि या टीकेस जसेच्या तसे प्रत्युत्तर देण्यासाठी ‘ प्रहार ‘ काढण्यात आला, पण हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही मात्र उद्देश सफल झाला, सामना दैनिकाची राणेंवर टीका करतांना धार नक्कीच बोथट झाली, पुन्हा तेच, मधुकर भावे म्हणजे दुसरे निखिल वागळे, लोकमत वगळता इतर कुठेही ते कधी टिकलेच नाहीत, महाराष्ट्र टाइम्स असो कि प्रहार, भावे यांना हे असे सतत सर्वत्र बाहेर काढल्या गेले….
www.vikrantjoshi.com
येथे रवी शेडगे यांचा उल्लेख यासाठी कि प्रहार दैनिक काढण्याआधी जे जाहिरात घेण्यासाठी रवी शेडगे यांना मस्का मारायचे पुढे जेव्हा शेडगे यांनी जाहिरातींसाठी हात पसरले तेव्हा हीच मंडळी त्यांना पाहून तोंड फिरवून घ्यायला लागली, थोडक्यात माकडाकडून चाळे करवून घेण्यासाठी माणूस डोंबारीच हवा. येथे पुन्हा मला मधुकर भावेंविषयी काहीतरी सांगायचे आहे. अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली आणि जन्माने हिंदू आणि ब्राम्हण असूनही आयुष्यभर ज्या राजकीय पक्षाची सतत कायम मधुकर भावे यांनी बिना पाण्याने हजामत केली ती भाजपा अशोक चव्हाण यांनी नेमकी जवळ केल्याने भावे यांनी अशोकरावांची देखील भादरून ठेवली, नको त्या शब्दातून चव्हाणांवर नको तेवढी भडास काढली. काँग्रेस संपते आहे हे लक्षात येताच जसे भावे यांनी कधी नव्हे ते अगदी तेलाने त्या शरद पवार यांची मॉलिश मसाज करायला सुरुवात केली आणि हा माणूस मसाज मस्त करतो हे पवार यांच्या लक्षात येताच एरवी कायम ज्या मधुकर भावे यांच्याशी ज्या पवारांनी अगदी उघड सतत राग केला त्याच पवारांनी मग या भावे यांना त्यांचा योग्य ‘ भाव ‘ दिला आणि आपल्या दरबारी आणखी एका खुशमस्कऱ्याला सामावून घेतले. तुम्हाला मी विधान परिषदेवर घेतो आहे, एवढा निरोप त्या देवेंद्र फडणवीसांकडून मधुकर भावेंना जाऊ द्या, बघा हेच भावे त्या शरद पवारांवर कसे घसरतात ते. असे घडले नाही तर मी नाव बदलवून घेईन, हेमंत ऐवजी वाह्यात निखिल लिहायला सुरुवात करिन. डोक्यावरचे नक्कीच नियंत्रण गेले असावे बहुतेक कारण भावे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी चक्क रक्तपिपासूं आपल्या लेखात म्हटले आहे, नेमके रक्तपिपासू कोण, काँग्रेस कि त्यांनी ज्या देवेंद्रकडे दीर्घकाळ नोकरी केले ते खानदान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली, काढायची तेवढी भडास त्यांच्यावर काढा पण रक्तपिपासू या शब्दाशी अर्थाअर्थी अजिबात संबंध नसतांना नालायक मधुकर भावे थेट देवेंद फडणवीसांना रक्तपिपासून लिहून मोकळे होतात, वास्तविक या टीकेला एखाद्याने न्यायालयात खेचून या भावे यांची चड्डी काढून त्यांना थेट लोकांसमोर नागडे करायला हवे. भावे याचा सरळ अर्थ असा कि तुम्हाला वेड लागलेले असावे….
अपूर्ण : हेमंत जोशी