संघ आत बाहेर कसा येथे नेमके वाचा :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आत किंवा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला महत्व असू शकते म्हणजे संघ स्वयंसेवकांमध्ये प्रणव मुखर्जी पद्धतीचे अनेक बाहेरचे नेते कौतुकाने बोलण्याचा किंवा आदर मानसन्मानाचा विषय ठरू असू शकतात म्हणजे संघाला आवडणाऱ्या अगदी वेगळ्या विचाराच्या थोर व्यक्तीला हेच संघवाले थेट नागपुरात विजया दशमी उत्सवाला आमंत्रित करून अगदी सरसंघचालक यांच्या शेजारी बसून त्यांचे विचार कान देऊन ऐकतात पण हेच संघातले कधीही अमुक एखाद्या व्यक्तीला त्यांच्यातल्या प्रमुखाला थेट सरसंघचालकांना देखील पुजताना तुम्हाला कधीही आढळणार नाहीत कारण संघात त्यांचा पवित्र असा भगवा ध्वज हाच त्यांचा गुरु त्यासमोर उभे राहून अगदी शिस्तीत संघवाले प्रणाम करून मोकळे होतात, देशात जागोजाग हेच संघवाले तुम्हाला कधीही डॉ हेडगेवार गोळवलकर गुरुजी किंवा तत्सम कोणत्याही मान्यवरांचे पुतळे उभारताना किंवा अगदी संघस्थानवर व्यक्ती पूजन करतांना तुम्हाला चुकूनही दिसणार नाहीत. संघात शिस्तीला आणि त्यागाला अनन्यसाधारण महत्व आहे म्हणजे संघाशी बांधिलकी जपणार्या जगातल्या प्रत्येक स्वयंसेवकाने आयुष्यात त्यागी त्यागपूर्ण कर्तव्य निदान एकदातरी बहुतेक कित्येकदा पार पाडलेले असते ज्याचा संघस्वयंसेवक कधीही कुठेही गाजावाजा करतांना दिसणार नाहीत, संघवाल्यांचा प्रमुख किंवा गुरु म्हणजे भगवा ध्वज त्यामुळे आमचे आजवरचे अमुक तमुक नेते ज्यांच्यामुळे संघ घडला वाढला अशी त्यांची कधीही भाषा नसते अगदी मोहन भागवत किंवा संघ वर्तुळात थेट मोदी गडकरी किंवा फडणवीस देखील स्वतःचा उल्लेख केवळ स्वयंसेवक म्हणून करतात आणि संघस्थानवर किंवा त्यांच्या बैठकीत ते सारेच्या सारे एकमेकांशी केवळ स्वयंसेवक म्हणून बोलतात त्यापद्धतीने वागतात त्यामुळे एखाद्या नवोदिताला संघ वर्तुळात वावरतांना नेमका कोण मोठा आणि कुठला अगदी सामान्य स्वयंसेवक ओळखणे कदापिही शक्य नसते…
www.vikrantjoshi.com
संघात केवळ हिंदुत्व महत्वाचे त्यामुळे अगदी एखाद्या वाल्मिकी समाजाच्या स्वयंसेवकाच्या हातून पाणी घेतांना किंवा आग्रह करून वाढतांना घरात अगदी कायम सोवळ्यात वावरणारा ब्राम्हण देखील ताटात वाढून घेतो किंवा माझे गावात पूजा सांगणारे पण अतिशय कट्टर स्वयंसेवक वडील दरवर्षी गावाबाहेरच्या मातंग वाड्यात देवीची स्थापना करून दहाही दिवस त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने भाग घ्यायचे, जात पात न मानण्याची सवय आम्हाला त्यांनीच लावल्याने माझे अनेक मित्र मला हेमंत जोशी पाटील किंवा हेमंत जोशी गायकवाड असा माझा गमतीने उल्लेख करतात ज्याचा मला राजकीय पत्रकारिता करताना प्रचंड उपयोग आणि फायदा देखील झाला. बौद्ध शीख जैन किंवा पाक धार्जिण्या काही मुसलमानांव्यतिरिक्त इतर धर्मियांना संघाने कधीही द्वेषाने बघितल्याचे किंवा स्वयंसेवकांची मने कलुषित करतांना मला आठवत नाही किंबहुना त्यांना कायम आपल्यातलेच एक ते मानत असल्याने जर उद्या याच संघाने हिंदूंशी साधर्म्य असणाऱ्या या हिंदुतर लोकांच्या भल्यासाठी काही वेगळे करून दाखवले तर मला त्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही किंबहुना संघाच्या मुशीतून तयार झालेल्या भारतिय जनता पक्षात सतत या पद्धतीच्या वेगळ्या धर्मियांना खूप खूप अनन्यसाधारण महत्व दिल्या जाते ज्यातून भाजपाला देशात आणि विविध राज्यात सत्ता मिळविताना फार मोठी मदत होते, रामदास आठवले प्रकाश आंबेडकर पद्धतीच्या हिंदुतर नेत्यांना कार्यकर्त्यांना कुठेही कमी न लेखता त्यांना योग्य संधी द्या असा आग्रह संघ स्वयंसेवक असलेल्या भाजपा नेत्यांचा त्यांच्या श्रेष्ठींकडे असतो किंबहुना या अशा समानव्यामुळेच जगातले हिंदुत्व अधिक बळकट झाल्याचे चित्र आज तुम्हाला नक्की बघायला मिळते आहे. हिंदू नाहीत पण आधी आपण हिंदूच होतो याची आठवण किंवा जाणीव असल्याने ज्यांना स्वतःच्या धर्माव्यतिरिक्त हिंदू धर्माविषयी आदर किंवा प्रेम असते ज्याचा राष्ट्र बळकटीला अतिशय उपयोग होतो नेमके संघ भाजपने हे ओळखून सत्तेत त्यांना कायम जवळ घेतले आहे…
क्रमश: हेमंत जोशी