इकडली तिकडली वित्तंबातमी राज्याच्या राजकारणातली :
राज्याच्या राजकारणातला एका धाडसी महत्वाकांक्षी मस्तमौला राजकीय नेत्याचा मी नेमका शेजारी आहे, भावी खासदार दमदार मोहित कंबोज यांचा मी शेजारी आहे, अधून मधून बोलणे झाले कि त्यांच्याकडून राजकीय गमती जमती कळतात मात्र त्या लिखाणातून टाळायच्या असतात पण हेच मोहित महाशय त्यांच्या त्या नेत्यासाठी म्हणजे फडणवीसांसाठी काहीही करू शकतात एवढी निस्सीम भक्ती त्यांची फडणवीसांवर आहे, अर्ध्या रात्री कुठलीही रिस्क ते या आपल्या नेत्यासाठी घेऊ शकतात म्हणजे फडणवीस त्यांना पळ म्हणाले तर हे धावत सुटतील किंवा जागच्या जागी उभा राहा म्हाणाले तर मोहित जागच्या जागी लांबच लांब उड्या मारायला लागतील अर्थात या अशा हनुमंताची मोठी टोळी देवेंद्र फडणवीसांभोवताली कायमस्वरूपी आपोआप जागोजाग राज्याच्या कानाकोपऱ्यात उभी झालेली आहे, फार कमी नेत्यांच्या नशिबी भक्तांचे सुख असते, याउलट संधीसाधू मोठ्या प्रमाणात गोळा झालेले असतात. आता याच लहरी बिनधास्त बेधडक मोहित कंबोज यांच्या अफलातून डोक्यात एक कल्पना सुचली आहे म्हणजे जुहूला जेथे गौरी खानचे भले मोठे इंटेरियर डेकोरेशनचे कार्यालय आहे किंवा जेथे गायक सुरेश वाडकर हे सरकारला सतत वर्षानुवर्षे फसवून शासकीय जमिनीवर शाळा उभारून जनतेला लुबाडताहेत आणि सरकारला लुटताहेत किंवा आसपास जेथे आशा पारेख यांचा बंगला आहे किंवा जेथे किशोर कुमार यांचा बंगला आणि विराट कोहलीचे रेस्टोरंट आहे, जेथे अगदी जवळच हाच कोहली किंवा कतरिना कैफ किंवा विक्रांत जोशी राहतात त्याच जुहूच्या एकदम प्राईम लोकेशनला एक बंद पडलेला एका वादग्रस्त व्यक्तीचा पेट्रोल पम्प होता जो आता मोहित कंबोज यांनी विकत घेतलेला असून त्याठिकाणी कंबोज एखादे शॉपिंग सेंटर उभे करून त्यावर मोठी कमाई त्यांना त्यातून झाली असती पण या जागेवर तसे काहीही न करता हे महाशय स्वतः शिवभक्त असल्याने एक भव्य दिव्य असे शिव मंदिर त्या जागेवर लवकरच बांधणार आहेत, आम्ही हे असे एकमेकांचे आगळे वेगळे शेजारी, मोहित यांच्या या प्रकल्पाला शुभेच्छा !!
www.vikrantjoshi.com
यादिवसात माजी मंत्री किंवा माजी मुख्यमंत्री किंवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची अवस्था त्या मलाईका अरोरा किंवा ऐश्वर्या राय सारखी झालेली आहे म्हणजे अरबाज संगे संसार करताना एकाचवेळी अर्जुन कपूरच्या बाहुपाशात विसावून मोकळे व्हायचे कि खान यांच्या घरात राहायचे या द्विधा मनस्थितीत जशी एकेकाळी मलाईका अरोरा नेमकी अडकलेली किंवा यादिवसात घटस्फोट घ्यायचा कि न घेता वेगळे राहायचे अशा गोंधळी अवस्थेत जशी ऐश्वर्या सापडलेली नेमके ते तसेच गेल्या काही वर्षांपासून नेमका काळ सांगायचा झाल्यास गेल्या तीन वर्षांपासून या अशोक चव्हाण यांचा मलाईका अरोरा किंवा ऐश्वर्या रॉय झालेला आहे म्हणजे राहुल गांधी यांना फ्लायिंग किस द्यायचा कि भाजपा नेत्यांना विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना डोळा मारून काँग्रेसपासून विभक्त होऊन भाजपाच्या गळ्यात कायमस्वरूपी नेहमीसाठी वरमाला घालून लाजून मुरडून मोकळे व्हायचे या अशा द्विधा मनस्थितीत हेच अशोक चव्हाण देखील सापडले होते त्यांचा नेमका निर्णय होत नसल्याने दोन्हीकडे ते विश्वास गमावून बसण्याची मोठी शक्यता निर्माण झाली होती म्हणजे काँग्रेस नेत्यांना तर नेमके माहित होते किंवा आहे कि अशोक चव्हाणांचे लक्ष आता काँग्रेसवरून पूर्णता उडाले असून ते अनुक्रमे फडणवीस आणि भाजपाच्या दिलसे प्रेमात आकंठ बुडाले आहेत तरीही चव्हाण यांचा नेमका निर्णय होत नसल्याने त्यांच्याविषयीचा काँग्रेस अंतर्गत आदर आणि विश्वास कमी होत असताना तिकडे भाजपा देखील त्यांच्याकडे संशयाने पाहायला लागली होती मात्र प्राप्त नेमक्या माहितीनुसार अगदी शंभर टक्के भाजपामध्ये प्रवेशाची तयारी चव्हाणांची झालेली असून केवळ फडणवीसांच्या इशाऱ्याची ते आता वाट पाहताहेत, अशोक चव्हाण आपल्या असंख्य पाठिराख्यांसह मी आधीच सांगितल्या प्रमाणे भाजपावसी, हे वाक्य तुमच्या कानावर पडणार आहे, समजा चुकून अशोकराव आपल्या घेतलेल्या निर्णयापासून विचलित झाले तर म्हातारवयात बायकोने सोडले आणि प्रेयसीने झिडकारले अशा दयनीय अवस्थेत ते सापडतील, तसे घडू नये हि अपेक्षा….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी