सध्या मी काय करतो : पत्रकार हेमंत जोशी
मी सध्या एवढा मोकळा आहे कि घरात मुंग्या जरी वाट चुकल्या तर त्यांनाही मार्गदर्शन करतो. अजितदादांचे वेगवेगळे फोटो अपलोड करून त्यांच्या बारीक मिश्या बारकाईने न्याहाळतो. समोरच्या गच्चीवर मानेकाका त्यांच्या बायकोचे विविध टोलेजंग अंतर्वस्त्र वाळत घालायला आलेत कि शीळ वाजवून मुद्दाम त्यांना डिवचतो. कुकरची शिटी तिसऱ्यांदा वाजली रे वाजली कि गुमान गॅस बंद करायला जागेवरून उठतो. घरातल्यांची नजर चुकवून शेजारच्या मोकळ्या स्वभावाच्या शहा भाभींकडे गप्पा मारायला जातो. खूप खूप वेळ स्वतःचा चेहरा आरशात न्याहाळत बसतो. आमटी फोडणीला घालतो, संध्याकाळी पिठले भात करून वाढतो. वा करोना काय दिवस आणलेत ना आमच्यावर. खिडकीच्या फटीतून कित्येक तास समोरचे घर न्याहाळतो. महत्वाचे म्हणजे मोठ्या संख्यने माझे लेखक कवी कवियत्री पत्रकार फेसबुक फ्रेंड्स आहेत, पूर्वी त्यांच्या लिखाणावर केवळ नजर टाकून त्यांना खुश करण्यासाठी मी अभिप्राय देत असे किंवा लाईक करीत असे, आता तसे नाही, लिखाण मग ते कितीही जुलमी अत्याचारी असो आता मी ते अतिशय सावकाश वाचतो नंतरच अभिप्राय देतो…
अभिनेता अरुण कदमच्या सुपुत्रीने तिचे अपलोड केलेले फोटो तर बघतोच पण अरुण कदमची त्याच्या मुलीसारखी दिसणारी शोभणारी पत्नी वैशालीने देखील टाकलेले फोटो बघून लाईक करतो, पूर्वी मात्र तसे नव्हते. पत्रकार अभय देशपांडेचे सध्या केवढे हाल आहेत, सारखा भाज्या चिरण्यात मग्न असतो, मग त्याच्या फोटोकडे बघितले कि अक्षरश: रडायला होते किंवा पत्रकार विवेक भावसार जेव्हा म्हणतो कि थांब पोळी उलथवून येतो तेव्हाही मन भरून येते. पत्रकार उदय तानपाठक तर त्याने केलेल्या स्वयंपाकाचे असे वर्णन करतो कि हा नेमका पत्रकार आहे कि चार घरी स्वयंपाकाला जाणाऱ्या मावशी आहेत, नेमके लक्षातच येत नाही. पुण्यातले मित्र घरातच कोंडून आहेत, त्यांचे मला फोनवरून हमखास हेच सांगणे असते कि बाहेर पडून करोना होणे एकवेळ परवडेल पण पुणेरी बायकोचे टोमणे खाणे नको. पुरुषांचे सध्या खऱ्या अर्थाने हाल सुरु आहेत म्हणजे खटल्याच्या घरात असलेल्या बाईसारखे दिवसभर काम करायचे आणि रात्री बायकोने आशाळभूत नजरेने बघितल्यानंतर जर कमी पडलो तर संशयावरून, मैत्रिणींवरून टोमणे ऐकायचे. आम्हा पुरुषांचा जीव अक्षरश: मेटाकुटीला आलाय…
आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो, तुम्हाला त्या मुद्दयांवर आलेला खरा अनुभव सांगायचा आहे. विशेषतः आम्हा उतावीळ पुरुषांना हा अनुभव येतो, बायकांच्या बाबतीत असे खचित घडत असावे कारण त्या बऱ्यापैकी सावध असतात आणि उतावीळ नसतात. आम्हा पुरुषांचे मात्र तसे नसते म्हणजे दिसली बाई कि आली लाळ तोंडात, असेच बहुतेक पुरुषांच्या बाबतीत असते. विशेषतः फेसबुकचे फॅड वाढल्यानंतर आम्हा पुरुषांच्या बाबतीत अनेकदा असे घडते आहे कि बहुसंख्य स्त्रिया मेकअप करून आणि फोटो ट्रिक्स वापरून स्वतःचे असे काही फोटो अपलोड करतात कि बघणार्याला वाटावे कि एखादी माधुरी मधुबाला त्यांच्यासमोर फिकी ठरावी पण प्रत्यक्षात तसे बहुतेकवेळा नसते. टाकलेले फोटो तद्दन फसवे असतात आणि पुरुष आपली फजिती आणि फसवणूकही करवून घेतात. नाव सांगत नाही पण माझा एक सरकारी अधिकारी मित्र फेसबुकवरून झालेल्या ओळखीतून फोटोत जाम सुंदर आणि सेक्सी दिसणाऱ्या फ्रेंडला मुद्दाम सुटी टाकून छानपैकी ड्रेसअप होऊन भेटायला गेला आणि प्रत्यक्षात ब्रेस्ट कँसर झालेल्या त्या जख्खड म्हातारीला बघून हॉटेलच्या रूममध्ये जागेवरच कोसळला. मला माहित आहे कि असा एकही पुरुष नसावा कि ज्याची या पद्धतीने फजिती झालेली नाही. अलीकडे अतिशय बेधुंद जीवन जगणाऱ्या विशेषतः शहरी तरुण स्त्रियांच्या मुलींच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे असते अन्यथा मोठ्या संकटाला अनेकांना सामोरे जावे लागते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी