राज्यातली बौद्ध चळवळ मनातली नेमकी मळमळ :
एखादा ब्राम्हण संघ स्वयंसेवक स्वतःशी आणि समाजाशी कसा किती प्रामाणीक असू शकतो त्यावर मला एक प्रसंग आठवला. लिमये आडनावाचा माझा मित्र एकदा पुण्यातल्या एका पंचतारांकित हॉटेलात माझ्या संगे स्विमिंग पूल मध्ये उतरला, पोहताना त्याने अचानक जानवे काही क्षण कानात अडकवले, स्विमिंग पूलमध्ये इतर स्त्री पुरुष जे करतात तेच त्याने केले, त्याने लघवी करून पुन्हा पोहायला सुरुवात केली, बहुतांश संघ स्वयंसेवक आपल्या तत्वांशी विचारांशी तडजोड न करता विचारांवर ठाम असतात म्हणून त्यांच्यातल्या तयार झालेल्या नेत्यांनी देशातली काँग्रेस उलथवून टाकली आणि जगात भारताचे नाव बघता बघता उज्वल केले, हिंदुस्थानाला दणाणून सोडले. बाबासाहेबांना देखील चळवळीतून बौद्धांनी याच पद्धतीने विविध क्षेत्रात पुढे जावे नाव कमवावे श्रीमंत व्हावे असे कायम वाटत असे कारण सरकारी नोकऱ्या मिळविताना मर्यादा असल्याने अख्खा बौद्ध समाज केवळ नोकरीच्या भरंवशावर पुढे जाणे अजिबात शक्य नाही हे दूरदर्शी बुद्धिमान बाबासाहेबांनी अगदी सुरुवातीला ताडले असल्याने त्यांनी हा प्रयोग आपल्या घरापासून सुरु केला म्हणजे पोटच्या पोराला प्रकाश आंबेडकर यांच्या पिताश्रींना यशवंतराव यांना व्यवसाय थाटून दिला होता, दुर्दैवाने जे नेमके ब्राम्हणांनी समाजासाठी ज्यापद्धतीने योगदान दिले त्यात बौद्ध कमी पडले श्रीमंतांनी आपल्या बांधवांना व्यवसायात उभे करतांना फारसे सहकार्य केल्याचे दिसत नाही त्यामुळे नोकरीच्या भरवशावर वाट पाहणारा बौद्ध समाज असे चित्र उभे राहिले…
www.vikrantjoshi.com
1990 दरम्यान मी शरद पवार आणि रामदास आठवले एकमेकांच्या सतत संपर्कात असल्याने जेव्हा शरद पवार यांनी पर्यायी उत्तम दलित नेतृत्व उभे करण्यासाठी धडपड्या चळवळ्या रामदास आठवले यांना आपल्या मंत्री मंडळात घेऊन समाजकल्याण खात्याची जबाबदारी आठवलेंवर सोपवली त्यामागे बौद्धांना नोकरीव्यतिरिक्त व्यवसायात उभे राहण्यासाठी पवारांनी हे मोठे पाऊल उचलले होते, केवळ नोकरी एके नोकरीच्या मागे न लागता तुम्ही बांधवांना समाजकल्याण खात्याच्या माध्यमातून आर्थिक ताकद देऊन त्यांना विविध लहान मोठ्या व्यवसायात उद्योग धंद्यात चालना द्या उभे करा असे पवारांनी आठवलेंना एकदा नव्हे अनेकदा निक्षून सांगितले अर्थात तेव्हापासून आठवलेंच्या रूपात बौद्धांना मितभाषी सतत सहकार्य करणारे उत्तम नेतृत्व आजतागायत नक्की मिळाले, आठवले स्वतः श्रीमंत झाले पण बौद्ध मात्र नेत्यांच्या किंवा जातीच्या भरवशावर किंवा सरकारी आर्थिक मदतीवर अजिबात मोठे झाले नाही, मिलिंद कांबळे अजित माने सुनील खोब्रागडे भाई गांगुर्डे नितीन तायडे पद्धतीचे यशस्वी व्यावसायिक स्वतःच्या धडपडींवर कर्तृत्वावर मेहनतीवर पुढे गेले, आजतागायत राज्याचे समाज कल्याण खाते हे दलालांचे अधिकाऱ्यांचे मंत्र्यांचे कंत्राटदारांचे केवळ चरण्याचे आणि भ्रष्टाचाराचे फार मोठे कुरण असं मी येथे स्पष्टपणे सांगतो. बाबासाहेबांनी रा. स्व. संघाची नक्कल केली असं मी अजिबात सांगणार नाही पण त्यांनी नोकरी व्यतिरिक्त बौद्धांनी पुढे जाण्यासाठी ज्यापद्धतीने काही संस्था उभ्या केल्या, व्यवसायात पुढे जाण्यावर अनेकदा त्यांनी बौद्धांना मार्गदर्शन केले त्या विचारांना आजतागायत बौद्धांनी फारसे उचलून धरले नाही…
गेल्या तीन ते चार दशकात बौद्धांमध्ये तेच ते चार दोन नेत्यांची नावे वगळता बौद्धेतर लोकात जसे प्रत्येक समाजात ज्ञातींमधून अनेक नेते नव्याने तयार झाले ते येथे अजिबात घडले नाही, रा. सु गवई रामदास आठवले प्रकाश आंबडेकर एकनाथ गायकवाड वर्ष गायकवाड राजा ढाले नामदेव ढसाळ जोगेंद्र कवाडे नासिकराव तिरपुडे चंद्रकांत हंडोरे नितीन राऊत दादासाहेब रुपवते जनार्दन चांदुरकर एन एम कांबळे इत्यादी चार दोन नेत्यांच्या पुढे बौद्ध समाजाला मनापासून पुढे नेण्यात भूमिका बजावणारा कणखर नेता तयार झाला नाही हे या समाजाचे फार मोठे दुर्दैव आहे किंबहुना बाबासाहेबांच्या पिढीत त्यावेळेचे बौद्ध धर्मीय समाज जसा येथे हे या राज्यात एकमेकांना सहकार्य करतांना आघाडीवर असायचा, बाबासाहेबांच्या पश्चात एकमेकांना घेऊन चालणारा एकमेकांसाठी धावून जाणारा बौद्ध, हळूहळू लोप पावत गेला आणि बहुसंख्य संकुचित विचारांच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांनी व्यवसायिकांनी केवळ व्यक्तिगत फायद्याचा विचार केला. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांची दलित पँथर जरी बाळासाहेबांच्या शिवसेना पद्धतीने किमान या राज्यात ताकदीने उभी राहिली असती तर जसे शिवसेनेत काम करणाऱ्यांची जशी आर्थिक आणि सत्तेतली ताकद फोफावत गेली तेच चित्र दलित पँथर मधून जर नवनवे नेतृत्व उभे राहिले असते तरीही बहुसंख्य बौद्धांचे नक्की चौफेर भले झाले असते पण 1972 ची दलित पँथर फुटली आणि पुढे झपाट्याने रोडावत गेली, आज हे नाव देखील बौद्धांना दुर्दैवाने आठवत नाही. मीडियाचे देखील तेच म्हणजे 1990 नंतर जसे झपाट्याने ब्राम्हणेतर समाजातले बहुसंख्य तरुण मीडियात येऊन त्यांनी ज्या खुबीने समाजाची बाजू उचलून धरली, नाही म्हणायला बौद्धांमध्ये सदानंद शिंदे मधू कांबळे रक्षित सोनावणे बंधुराज लोणे दिवाकर शेजवळ सुभाष शिर्के युवराज मोहिते भगवान निळे बाबा गाडे सुनील गायकवाड अशी काही बोटावर मोजण्याएवढी नावे मीडिया क्षेत्रात नक्की पुढे आली पण पत्रकारितेतली बौद्धांची वेगळी ओळख निर्माण करण्यात या पद्धतीचे जे तरुण मोठ्या प्रमाणावर पुढे यायला हवे होते तसे अजिबात घडले नाही किंबहुना मीडिया क्षेत्रातले असे काही लबाड मी बघितले ज्यांना आपली जात लपविण्यात मोठा अभिमान वाटतो. बौद्ध समाजात जर आक्रमक वैचारिक समाज सेवेचा वारसा घेऊन पुढे जाणारे रक्षित सोनावणे पद्धतीचे प्रामाणिक पत्रकार उभे राहिले तरीही समाजाला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, आवाज उठविणारी मीडिया बौद्धांची मोठी गरज आहे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी