अजितदादांच्या नेम त्यावर शिंदे यांचा गेम
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या विरोधात जाईल आणि एकनाथ शिंदे त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतील त्यानंतर दिल्लीत भाजपा श्रेष्ठींना जाऊन भेटलेले अजित पवार मुख्यमंत्री होतील थोडक्यात शरद पवार यांच्या केवळ सांगण्यावरूनच अजितदादा हे घडवून आणताहेत त्यामुळे नजीकच्या काळात राष्ट्रवादी व भाजपा यासह युती होईल आणि एकनाथ शिंदे यांना अर्थात वाऱ्यावर सोडले जाईल, पद्धतीच्या बातम्या सर्हास विविध मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होताहेत ज्या बातम्यांना वास्तवात कोणताही आधार नाही असे अजिबात घडणार नाही काहीही घडलेले नाही. त्यामुळे माझा हा लेख हे लिखाण तुम्ही पुरावा म्हणून जपून ठेवा आणि इतर मीडियातल्या कुठल्याही कोणत्याही बातम्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका. माझी जी माहिती आहे किंवा मी यादिवसात ज्या राजकीय क्षेत्राशी संबंधित काही कायदे तज्ज्ञांशी बोललो आहे त्याप्रमाणे यादिवसात कोणत्याही क्षणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होऊन, आमदारांच्या बाबतीत पात्र अपात्रतेचा निर्णय न्यायधीश मंडळी विधान सभा अध्यक्षांवर सोडून मोकळे होतील त्यामुळे आमदार अपात्र ठरून एकनाथ शिन्दे यांचे मुख्यमंत्री पद जाईल हा अंदाज यादिवसात विविध प्रसिद्धी माध्यमांनी काढणे म्हणजे जयंत पाटलांना दिवस गेलेत किंवा मलायका अरोरा हेमंत टकले यांच्या प्रेमात पडली वेडी झाली हे असे म्हणण्यासारखे आहे…
www.vikrantjoshi.com
ज्यावर मीडियाने आग्रह धरायला हवा किंवा राज्य सरकारला धारेवर धरायला हवे त्या मंत्री मंडळ बदल आणि विस्ताराबाबत अर्धवट मीडिया मात्र मूग गिळून बसलेली आहे आणि मंत्री मंडळ विस्तार अजूनही न करणे विशेषतः राज्यातल्या महिला आमदार सदस्यांना अद्याप मंत्री मंडळात स्थान न देणे याची नक्की फार मोठी किंमत शिंदे आणि फडणवीस आणि त्यांच्या सरकारला नजीकच्या काळात मोजावी लागणार आहे, तिकडे राज्यातले विरोधक विशेषतः उद्धव ठाकरे यांची जनसामान्यात वाढणारी वाढलेली लोकप्रियता आणि त्यांना सततची मिळणारी विनाकारण सहानुभूती आणि त्याचवेळी शिंदे फडणवीस यांचे हे तोकडे सरकार, काल पर्वा नाही म्हणायला अमित शाह यांच्याकडे शिंदे आणि फडणवीसांनी हा मंत्री मंडळ विस्ताराचा विषय काढून देखील शाह यांनी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे, त्यातून शिंदे यांच्या शिवसेनेतली आणि राज्य भाजपा नेत्यांची आमदारांची वाढणारी प्रचंड वाढलेली अस्वस्थता त्याचा मोठं उद्रेक झाल्यास निदान मला तरी अजिबात आश्चर्य वाटणार नाही कारण यादिवसात कोणताही आमदार हि नाराजी अजिबात लपवितांना दिसत नाही, या दोन्ही पक्षांचे आमदार अत्यंत निराश आहेत अस्वस्थ आहेत नाराज आहेत रागावले आहेत अशांत आहेत म्हणून त्यांच्या या रागाचा कोणत्याही क्षणी भडका उडू शकतो अशी माझी पक्की माहिती आहे…
विविध मंडळांवरील नियुक्त्या आणि मंत्रिमंडळ विस्तार शिंदे फडणवीस यांच्या सरकारची मोठी गरज आहे कारण या दोन्हीकडल्या नेत्यांशी आमदारांशी विरोधक सहानुभूती मिळवीत संधान साधू लागलेले आहेत जे शिंदे शिवसेनेला आणि राज्य भाजपाला पुढल्या होणाऱ्या निवडणुकीत मोठा दगा फटका त्यातून नक्की बसू शकतो. जणू एकनाथ शिंदे मोस्ट फेल्युअर मुख्यमंत्री आहेत त्यामुळे अजित पवार यांना तातडीने भाजपा जवळ करू बघते आहे हा जो मीडिया या दिवसात मोठ्या खुबीने अपप्रचार करते आहे जाणूनबुजून शिंदे सेना आणि भाजपा मध्ये देखील अशांतता निर्माण करण्याचा जो केविलवाणा प्रकार करते आहे त्यावर मीडिया कशी नालायक असू शकते हेच म्हणणे उचित ठरेल. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादी युती हि भाजपाला संघाला अजिबात परवडणारी आणि शोभणारी नाही त्यातून शंभर टक्के राज्यातल्या भाजपा आणि संघाची मोठी नाचक्की होईल त्याउलट अख्या संघ स्वयंसेवकांना आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला भाजप आणि शिंदे सेना युती उद्धव ठाकरे यांच्याशी यापूर्वी असलेल्या युतीपेक्षा देखील कितीतरी अधिक पटीने भावलेली आवडलेली आहे त्यातून चाणाक्ष संघ आणि भाजपावाले शिंदे यांच्याशी त्यांच्या शिवसेनेशी काडीमोड घेऊन थेट शरद पवार किंवा बिनभरवश्याच्या चलाख व संधीसाधू अजित पवार यांच्याशी युती करून सत्तेत बसतील अशी शक्यता देखील दूरदूरपर्यंत नाही, भाजपचे मोदी किंवा अमित शहा आणि फडणवीस असा आततायी विचार करून स्वतःच्या पायावर मोठा धोंडा नक्की मारून घेणार नाहीत, उगाच अफवा आणि थाफांवर अजिबात विश्वास ठेवू नका…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी