फडतूस आणि काडतूस
आपल्या या राज्याच्या राजकारणात थेट नरेंद्र मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून कोणताही अंतिम निर्णय घेतात नाही म्हणायला प्रसंगी दुसर्या फळीतले त्यांच्या पक्षातले या राज्यातले जे इतर बोटावर मोजण्याएवढे नेते आहेत त्यांच्याशी देखील किंवा संघ प्रमुखांशी किंवा तत्सम तोडीच्या संघ पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली जाते पण अंतिम निर्णय हे तिघेच घेतात निर्णय घेतांना अमुक एखादी आखणी करतांना सुनील देशपांडे बावनकुळे शेलार तावडे गडकरी चंद्रकांत दादा मुनगंटीवार इत्यादी संघ किंवा भाजपा पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी देखील त्यांना विश्वासात घेऊन नक्की चर्चा केली जाते विशेष म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भातले असे पाचवे नेते आहेत ज्यांची भाजपाच्या प्रदशाध्यक्ष पदी वर्णी लागलेली आहे विशेष म्हणजे यापूर्वीचे विदर्भातून आलेले अनुक्रमे पांडुरंग फुंडकर नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस हे चौघेही संघ परिवारातून पुढे भाजपामध्ये वाहून घेतलेले नेते पण बावनकुळे यांचा स्वतःच्या नेतृत्वाचा उत्तम करिश्मा असा कि ते संघाचे स्वयंसेवक नसून देखील म्हणजे बावनकुळे यांना संघाचा फारसा सखोल अभ्यास नसतांना देखील संघ आणि भाजपा परिवाराने त्यांच्या मेहनती वृत्तीवर आणि लॉयल्टीवर खुश होऊन फिदा होऊन विश्वास टाकला आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष करून ज्यांना संघ आणि भाजपा नेमके माहित आहेत त्या साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला…
www.vikrantjoshi.com
उद्धव ठाकरे केवळ नैराश्येपोटी फडणवीस यांना फडतूस गृहमंत्री म्हणाले आणि त्यावर जी बावनकुळे यांनी अतिशय तिखट बेसावध चिडून संतापून आणि फडणवीस यांच्यावर असलेल्या अति प्रेमापोटी प्रतिक्रिया दिली तशी प्रतिक्रिया मुंडे यांच्यासारख्या बेधक किंवा अन्य कुठल्याही कोणत्याही माजी प्रदेशाध्यक्षाने ते प्रदेशाध्यक्ष असतांना त्या त्या वेळी अशी उलट प्रतिक्रिया दिली नसती नेमका हाच फरक संघ स्वयंसेवक असल्यात आणि नसल्यात असतो.अर्थात सुद्न्य भाजपा आणि संघाला बावनकुळे यांच्याकडून यापद्धतीच्या प्रतिक्रिया नक्की अपेक्षित असल्याने त्यातून बावनकुळे यांचे होईल ते कौतुकच म्हणजे त्यांना संघ भाजपातून बोलणी खावी लागतील असे नक्की घडणार नाही घडलेले नाही. आता अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो ज्याची अतिशय गंभीर आणि सखोल चर्चा या दोन तीन दिवसात नागपूरच्या संघ मुख्यालयात मुंबईच्या भाजपा मुख्यालयात आणि थेट दिल्लीत अगदी मोदी शाह आणि तेथल्या कार्यालयासहित सवर्त्र झाली करण्यात आली. उद्धव ठाकरे फडणवीस यांना ज्या खालच्या पातळीवर येऊन फडतूस म्हणाले ते अत्यंत चुकीचे घडले, उद्धव यांनी असे उदगार काढून स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतलेली आहे अन्यथा बाळासाहेबांचा मुलगा आणि बाळासाहेबांचे कुटुंब सदस्य या नजरेतून भावनेतून कायम संघ आणि भाजपा नेते अगदी मोदी शाह फडणवीस गडकरी सहित उद्धव आदित्य रश्मी यांच्याकडे कायम सतत बघत असल्याने त्यांच्याविषयीची अनेक अतिशय गंभीर पुरावे भाजपाकडे असूनही या ठाकरे कुटुंबाला अद्याप म्हणावे तसे अडचणीत आणल्या गेले नव्हते किंबहुना तशा आशयाच्या सूचना मोदी आणि शाह यांनी साऱ्यांना देणं ठेवलेल्या आहेत होत्या….
मात्र उद्धव यांनी अलीकडे अतिशय खालच्या पातळीवर येऊन पातळी सोडून फडणवीस यांना फडतूस गृहमंत्री म्हटले खरे पण त्यामुळे पहिल्यांदा संघ आणि भाजपा अख्खा परिवार अगदी मनापासून उद्धव ठाकरे यांच्यावर चिडलेला असून यापुढे उद्धव यांना या वक्तव्याची नक्की अगदी शंभर टक्के फरार मोठी किंमत मोजावी लागणार आहे किंवा मला अगदी मनापासून वाटते कि उद्धव यांनी आत्ताच्या आता उठावे आणि फडणवीस यांच्या त्या वक्तव्यावर जाहीर माफी मागून मोकळे व्हावे मात्र हे असे जर घडले नाही तर संघ आणि भाजपाची बदला घेण्याची जी स्लो पॉयझन पद्धत आहे त्या पद्धतीला जर उद्धव नजीकच्या काळात बळी पडले नाही तर मी पत्रकारिता सोडून अगदी नियमित संजय राऊत यांची माझया हाताने तेल मॉलिश तेही नित्य नियमाने करेन, क्षमा न करता येणारी चूक उद्धव यांनी केलेली आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी