राज्याचे राजकारण : आज कि ताजा खबर
पुढल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झालेली आहे त्यात राजकीय निवृत्तीचे वेध लागलेले असल्याने यादिवसात आपले कुटुंब आणि आपल्या राष्ट्रवादी पक्षाची खुंटी बळकट करण्यात जर शरद पवार गुंतलेले असतील विविध प्रयोग करण्यात जर ते व्यस्त असतील विचार करीत असतील अनेकांशी चर्चा करतांना दिसत असतील कधी नरेंद्र मोदी यांना पप्पी किंवा उद्धव ठाकरे यांना प्यार भरी झप्पी देत असतील किंवा राहुल गांधी यांच्याकडे पाहून डोळे मिचकावत असतील किंवा देशातल्या अन्य मान्यवर ताकदवान नेत्यांना आलिंगन देण्यात धन्यता मानत असतील तर त्यात वावगे ते काय किंवा पवारांचा तो एखाद्या कॉलेज कुमारासारखा सुरुवातीपासूनच स्वभाव असल्याने म्हणजे एखादा चतुर कॉलेज कुमार जसा एकाचवेळी चार मुलींना फिरवून शेवटी वेगळ्याच गावाकडल्या मुलीशी तेही आई वडिलांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करून मोकळा होतो अगदी त्याच पद्धतीने जर राजकीय निवृत्ती जवळ आलेली असतांना पवार कुटुंब सदस्य विशेषतः सुप्रिया आणि राष्ट्रवादी यांची पुढली राजकीय सोय लावण्यासाठी नेमका मार्ग शोधण्यात पवार गुंतून असतील तर ते एखाद्याला अंधारात ठेवून गुप्त राजकीय हालचाली करण्यात डावपेच खेळतांना एखाद्याला जर त्यांची हालचाल संशयास्पद वाटली तर उगाच अस्वस्थ होण्याचे कारण नाही किंवा पवारांना दोष देण्यातही फारसा अर्थ नाही कारण अन्य कोणत्याही कुठल्याही नेत्याने नेमके हेच केले असते किंवा अगदी बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मृत्यूची चाहूल लागताच मैत्रीचा दोस्तीचा युतीचा खुंटा भाजपासोबत अधिक बळकट केला होता जो चुकीच्या सल्ल्याने म्हणजे बावळट अर्धवट राजकीय सल्लागारांचे ऐकून आणि अपरिपकव निर्णय घेऊन पुढे अलीकडे उद्धव यांनी पायावर मोठा धोंडा पाडून घेऊन स्वतःला विनाकारण जखमी आणि त्यांच्या शिवसनेचे अस्तित्वच मोठया भयावहसंकटात टाकून राजकीय पोरकटपणा विनाकारण करून ठेवलेला आहे…
www.vikrantjoshi.com
शरद पवार हे या दिवसातले या राज्यातले कमंडलू आहेत आणि हे कमंडलू नक्की नेमका मोठा निर्णय घेऊन कोणत्याही एका बाजूने निवृत्तीपूर्वी झुकलेले असेल म्हणजे हेच शरद पवार ज्यांना दोन्ही मार्ग खुले आहेत त्यामुळे ते एकतर काँग्रेस आणि उद्धव यांच्यासोबत सध्याची युती कायम ठेवून पुढल्या निवडणुका लढवतील किंवा भाजपा आणि शिंदे सेना यांच्यासोबत आघाडी करून सध्याच्या युतीला ठेंगा दाखवून वाकुल्या दाखवून पाठ करून धोका देऊन मोकळे होतील आणि पवारांच्या एकंदर हालचाली तसेच मोदी यांच्याशी ज्या पद्धतीने बोलणी सुरु आहेत त्यावरून राष्ट्रवादी भाजपा आणि शिंदे यांची शिवसेना हि अशीच आघाडी करून ते मोकळे होतील हीच अशीच दाट शक्यता आहे. प्रथितयश नेत्या कन्या सुप्रिया आणि जन्माला घातलेली राष्ट्रवादी याच शरद पवारांना मोदी नि भाजपचा संगतीने अधिक सेफ खूप सुरक्षित वाटत असावी किंवा वाटत असल्याने जर कोणत्याही क्षणी भाजपा राष्ट्रवादी आठवले वंचित आणि शिंदे शिवसेना हे सारे आघाडी करून एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे ठाकले तर पवारांच्या या दिवसातल्या नेमक्या संशयास्पद हालचालींना प्रत्यक्ष उतरविले गेले असे म्हणणे अधिक उचित ठरेल. चंचल व बिनभरवंशाचे अजितदादा आणि राजकीय अनुभवात आजही खूपसे तोकडे रोहित पवार त्यात अभिनयात बलराज सहानी यांचा खुपसा अपयशी ठरलेला परीक्षित पद्धतीने शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांचा राजकीय प्रवास नक्कीच पवारांना स्वतःला अस्वस्थ करून सोडतो त्यावर ते तातडीने कायमचा राजकीय तोडगा काढण्यात धडपडताहेत हेच एकमेव मोठे किंवा खळबळजनक सत्य मी तुमच्यासमोर मांडले आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे महत्वाकांक्षी जिद्दी मेहनती रोहित पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्याही पावलावर पाऊल ठेवत केवळ मराठा या समीकरणात न गुंतून पडता विविध क्षेत्रात विविध राजकीय वर्तुळात मैत्रीचा हात पुढे करीत, मी शरद पवार नि अजितदादा यांच्या खूप पावले पुढे, पद्धतीचे राजकारण करून खेळून मोकळे व्हावे त्यातून त्यांचे राजकीय भवितव्य उज्वल नक्की ठरेल…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी