संदीप देशपांडे किंवा सापाला अर्धवट मारणे घातक डेंजर चुकीचे
समवयस्क थोराड वयाच्या पुरुषाला एखाद्या सुंदर स्त्रीने अंकल किंवा काका आबा म्हणून हाक मारणे जसे चुकीचे किंवा रस्त्यावर लघवी करतांना बूट किंवा चप्पल ओले होणे जसे वृद्ध झालात सांगते तसे एखाद्या लढवय्या नेत्याला म्हणजे अमुक एखाद्या लढाईत जो प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडतो एखाद्याचा आर्थिक किंवा राजकीय खात्मा करतो अशा नेत्याला किंवा पत्रकाराला अर्धवट मारून रस्त्यावर सोडून देणे जाणे हेही तसेच चुकीचे घातक किंवा एकदम डेंजर जी चूक अगदी अलीकडे मनसे नेते संदीप देशपांडे बाबत त्यांच्या जीवावर उठलेल्या राजकीय शत्रूंनी काही गुंडांमार्फत केली, मोठी चूक केली. माझ्यासारख्या पत्रकाराला किंवा संदीप देशपांडे सारख्या एकनिष्ठ कर्तव्यतत्पर लढाऊ जिद्दी मेहनती काटक निर्भय आजही निस्पृह असलेल्या लढवय्या सदाबहार नेत्याला किंवा माझ्यासारख्या, विक्रांत पाटील, कैलास म्हापदी सारख्या एखाद्या वाईटावर तुटून पडणाऱ्या काही पत्रकारांना असे अर्धवट मारून रस्त्यावर सोडून जाणे आम्हाला जिवंत ठेवणे केव्हाही एकदम अत्यंत चुकीचे म्हणजे एखाद्या सापाला अर्धवट मारून सोडून दिल्यानंतर कदाचित तो घाबरून त्या जागेवरून कायम खूप दूरवर निघून जाईल पण आमच्यासारख्या मूठभर लढण्यासाठी आणि मरण्यासाठी जन्मलेल्या राष्ट्रप्रेमी मंडळींना हे असे संदीप देशपांडे पद्धतीने अर्धवट मारून सोडून देणे मोठी चूक ठरते. पोलीस संरक्षण मिळावे म्हणून संदीप यांनीच हे नाटक घडवून आणले असावे असे आरोप करणाऱ्यांना त्यांनी पुढल्या क्षणी जोराची शाब्दिक थप्पड थोबाडात मसरून सांगतिले कि मला पोलीस संरक्षण अजिबात नको आणि ज्याने हे घडवून आणले त्याला देखील त्यांनी सांगतिले कि आता तुझे राजकरणातले उरले सुरले दिवस नक्की भरलेत…
www.vikrantjoshi.com
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर काहीच तासात भांडुप कनेक्शन पुढे आल्याने थेट संजय राऊत यांचे नाव जेव्हा पुढे आले तेव्हाच मी हे असे संजय राऊत यांनी करणे म्हणजे त्यांनी हल्ला घडवून आणणे नक्की अजिबात शक्य नाही असे मी अगदीच ठणकावून सांगितले आणि नेमके तेच घडले, संजय राऊत यांचा संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता, वरुण सरदेसाई यांचे नाव पुढे आले तसे पुरावे आता पोलिसांना सापडले आणि मी संदीप देशपांडे यांना फोन केला, या राज्यातल्या माझ्या काही आवडत्या नेत्यांपैकी देशपांडे एक, तसेही थेट राज किंवा अमित ठाकरे यांच्या जे सतत मागे पुढे असणारे कीर्ती शिंदे, राजेश उज्जैनकर, अमोल रोग्ये, महेश ओवे, निशांत गायकवाड बाळा नांदगावकर यांच्यासारखे काही मोजके नेते आहेत त्या सर्वात राज ठाकरे आणि एकंदर ठाकरे कुटुंबाला अतिशय जवळचे आपुलकीचे एकनिष्ठ प्रसंगी वार अंगावर घेणारे नेते म्हणजे अर्थात संदीप देशपांडे हल्ल्याने राज्यातली अख्खी मनसे संदीप यांच्यावरील हल्ल्याने मनापासून बिथरली संतापली चिडलेली आहे त्यामुळे संशयित वरुण सरदेसाई यांना आता यापुढे संदीप देशपांडे आणि मनसेचा राग सहन करण्यापलीकडे नेमके हाती काहीही उरलेले नाही. संदीप मला म्हणाले कि विशेषतः करोना काळात आणि आदित्य उद्धवजी त्याचवेळी नेमके सत्तेत असतांना वरुण सरदेसाई यांनी आणि अप्रत्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत युवा सेनेच्या त्यांच्या अतिशय जवळ असलेल्या युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नावाने असंख्य कंपन्या उघडून महापालिकेची सरकारची जी मोठी आर्थिक लूट सुरु केली ती सारी प्रकरणे मी चव्हाटयावर आणल्याने विशेषतः वरुण सरदेसाई किंवा तत्सम त्यांच्या शिवसेना नेत्यांच्या मोठ्या आर्थिक मुसक्या आवळल्या गेल्याने अशा बोगस कंपन्यांच्या गंभीर चौकशा सुरु झाल्याने त्यांचे मोठे पेमेंट्स रोखल्या गेल्याने, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी मातोश्रीच्या आशीर्वादाने जी मोठी आर्थिक लुटपाट केल्या गेली त्यावर चोहोबाजूंनी आता फार मोठे संकट ओढावल्याने ते सारे मनातून अस्वस्थ आणि माझ्यावर खूप चिडलेले असल्याची माझी आधीच माहिती होती जी खरी ठरली आणि एका बेसावध क्षणी मला एकट्याला रस्त्यावर गाठून माझ्यावर भ्याड हल्ला झाला. मला ज्यांच्यावर संशय होता त्यांची नावे मी लगेच उघड केली,पोलीस तपासात देखील फारसे वेगळे समोर आलेले नाही. पुन्हा तेच कि संदीप यांना त्यांचेवर हल्ला घडवून आलेल्यांनी नेमके अर्धवट काम केले, संदीप यांना जिवंत सोडले त्यामुळे यापूढे संदीप त्यांच्या या हल्लेखोर सूत्रधारांना इट का जवाब पत्थर से पण वेगळ्या पद्धतीने नक्की देऊन मोकळे होणार आहेत म्हणजे यापुढे मुंबई महापालिकेतील आणखी काही महत्वाचे आर्थिक घोटाळे संदीप काढून मोकळे होतील, वरुण सरदेसाई यांनी नको ती मोठी चूक केली…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी