राज्यपाल जातील नवे मंत्री राज्यमंत्री येतील
अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ते परदेशात असतानाचा सूटाबुटातला फोटो बघितला आणि भारताबाहेर विशेषतः पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या विवाहित दाक्षिणात्य तरुणींची आठवण झाली म्हणजे त्या कशा पाश्चिमात्य फॅशनेबल कपडे घालूनही आपले हिंदुत्व टिकवतात म्हणजे कपाळावर भले मोठे कुंकू आणि गळ्यात लांबलचक मंगळसूत्र घालून वावरतात ते तसे काहीसे शिंदे त्या सुटाबुटात दिसले किंवा पूर्वी कसा नवरदेव त्याच्या लग्नात एकदा आणि शेवटचा अखेरचा सूट घालून अवघडल्यासरखा वावरायचा तसे हुबेहूब शिंदे काहीसे खूपसे गोंधळल्यासारखे अवघडल्यासारखे दिसत वाटत होते. राजकारणात, प्रेम प्रकरणात, व्यवसायात केव्हा काय होईल सांगता येत नाही विशेषतः राज्याच्या राजकारणात आम्ही सतत संबंधितांशी संपर्कात असतो माहिती घेतो आणि तुम्हाला जशीच्या तशी सांगतो. पुढले पंधरा दिवस राज्याच्या राजकारणात अनेक विविध खूप खूप बहुसंख्य घडामोडींचे आणि हालचालींचे आहे. राज्यातून राज्यपाल कोषारी यांची गच्छंती नक्की आहे पण तत्पूर्वी ते त्या बारा आमदारांच्या नियुक्त्या नक्की करून मोकळे होतील त्यानंतर महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळतील असे दिसते. तसेच मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल देखील या पंधरवड्यात अपेक्षित आहेत. विशेष म्हणजे या दिवसात उभा अख्खा सारा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांना वर दिल्लीत घेण्याच्या ज्या बातम्या किंवा हालचाली कानावर पडताहेत, ऐकून अस्वस्थ अशांत आहे कारण काहीही झाले तरी फडणवीसांचे सत्तेतून किंवा राज्याबाहेर थेट दिल्लीत जाणे, या राज्याला अजिबात परवडणारे नाही त्यातूनच एकप्रकारची असुरक्षितता विशेषतः हिंदू आणि मराठी लोकांच्या हृदयात दाटून आलेली आहे, असे अजिबात घडता कामा नये हेच ज्याला त्याला प्रत्येकाला वाटते आहे….
www.vikrantjoshi.com
सलग सतत तेही 43 वर्षे राजकीय क्षेत्रातली पत्रकारिता करतांना अनेक विविध माणसे नेते अधिकारी अनुभवले, ज्यांना सिनेमा सेक्स आणि राजकारण या विषयातील अजिबात समजत किंवा जमत नाही नेमके तेच मराठी कायम सतत राजकारण सिनेमा आणि सेक्स यापैकी कोणत्यातरी एका विषयावर नक्की निश्चित कायम सतत सारखे बोलत असतात बोलत राहतात त्यामुळे ज्यांचा राजकारणाशी अजिबात किंवा दुरांनव्यये किंवा दुरून दुरून संबंध येत नाही किंवा नसतो असे नातेवाईक मित्र आप्तेष्ट इत्यादी जेव्हा केव्हा महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलायला सुरुवात करतात मी तेथून काढता पाय घेतो याचा अर्थ मी त्यातला स्वतः तद्न्य अभ्यासू समजतो असे अजिबात नाही किंवा नसते पण ज्यांना राज्याच्या राजकारणातले काहीही माहित नसतांना उगाचच अगाध ज्ञान पाजळणार्या अनेकांची बहुतेकांची मला किंवा येते आणि राग देखील येतो. पण केवळ बोलघेवड्या स्वभावातून आयुष्यात काहीही न करता या पद्धतीची इतरांची फसवणूक करून आर्थिक मिळकत करणारे थापाडे, संख्या खूप मोठी असते आहे आणि या अशा थापाड्यांपासून तुम्ही सारे सावध राहा अशी सूचना व विनंती मी तुम्हाला करू इच्छितो. विशेषतः बहुतेक थापाडे म्हणजे गंडविणारे हे बाईलवेडे व दारुडे असतात ज्यांच्या थापांना अनेक तरुण मुली किंवा स्त्रिया देखील फसतात आणि आपले अमूल्य शरीर देऊन बसतात. आजतागायत राज्याच्या राजकारणात मी जे थापाडे बघितले अनुभवले पण ज्यांचा अगदी जवळून अभ्यास केला असे राज्यात माझ्या परिचयातलेजवळपास अकरा आहेत त्यातली एक तर महिला देखील आहे. या अकरा पैकी पाच चक्क ब्राम्हण आहेत आणि या पाचही थापाड्यांनी केवळ सतत थापा मारून आजतागायत आपले व आपल्या कुटुंबाचे व्यवस्थित पॉट भरले आहे. एकतर हे असे थापाडे मोठ्या खुबीने अनेक विविध मान्यवर मोठ्या बड्या मंडळींबरोबर स्वतःचे मोठ्या खुबीने फोटो काढून घेतात आणि असे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करून, मी कसा मोठा किंवा माझ्या कशा ओळखी हि वातावरण निर्मिती करून, आण मी तुझे काम करून देतो, सांगून पैसे उकळतात, पुढे ज्यांचे पैसे घेतलेले असतात त्यांचे काम होणे दूर वरून अशा गरजूंची गरिबांची अनेकदा बहुतेकवेळा आर्थिक फसवणूक व लुबाडणूक होतांना मी बघितलेली आहे म्हणून जेव्हा केव्हा आपण एखादे काम एखाद्याला सान्गतो तो कितपत प्रभावी आहे याची आधी खात्री करून त्यावर विश्वास ठेवणे कितपत योग्य हे ठरवत चला, म्हणजे माझ्या ओळखीचा एक पुणेरी भामटा ज्याची कष्टाळू पत्नी टिफिनच्या भरवशावर घराचा उदरनिर्वाह चालविते, हा भामटा मात्र जेव्हा केव्हा पुण्यात गेल्यानंतर भेटतो, त्याच्या कोणत्याही गप्पा एक कोटीच्या खाली नसतात आणि जवळपास सारेच भामटे किंवा थापाडे याच पद्धतीने इम्प्रेस करून सामान्यांना नक्की लुटणारे,लुबाडणारे ओरबाडणारे गंडविणारे असतात हे कायम सतत लक्षात असू द्या….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी