विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…
एखाद्या महामारीत एखाद्या महापुरात एखादे संपूर्ण गाव उध्वस्त व्हावे किंवा ऐन उमेदीत एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष जावा आणि अख्खे कुटुंब उध्वस्त होऊन क्षणार्धात रस्त्यावर यावे तसे या राज्याचे आणि या राज्यातील राजकारणाचे नेमके झाले आहे, ज्यांच्या हाती अख्खे राज्य सोपवलेले असते असा जवळपास एकही मान्यवर या राज्यात उरलेला नाही ज्याला आपल्या या मागे पडलेल्या झपाट्याने मागे पडत जाणार्या महाराष्ट्राचे भले व्हावे असे वाटते, जो सत्तेजवळ आहे त्याला वाट्यात हिस्सा हवा आहे आणि प्रत्येक भांडण केवळ वाट्यावरून होते आहे, जेव्हा एखाद्या कुटुंबात वाटे आणि हिस्स्यांवरून आपापसात भांडणे लागतात असे कुटुंब त्यानंतर उध्वस्त व्हायला फारसा वेळ लागत नसतो, या राज्याचे नेमके आज मितीला तेच झाले आहे, एकनाथ आणि देवेंद्र सरकारात देखील फारसे वेगळे वातावरण नाही, जे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बाहेर पडले आणि जे भाजपा सदस्य आहेत वरून अपक्षाची संख्या देखील मोठी आहे त्यातील प्रत्येक आमदाराला आता मंत्री किंवा किमान राज्यमंत्री व्हायचे आहे विशेष म्हणजे जे विधान परिषद सदस्य आहेत त्यांना देखील केवळ मंत्री होण्यातच आता इंटरेस्ट उरला आहे, मंत्रीमंडळ विस्तार साधारणतः आणखी दोन टप्प्यात होणार आहे विशेष म्हणजे मंत्री मंडळ विस्ताराबरोबर विविध महत्वाच्या महामंडळावरील नियुक्त्या देखील लगेच केल्या जाणार आहेत, अत्यंत अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे कोणत्याही विधान सभा किंवा विधान परिषद सदस्याला राज्याच्या देशाच्या समाजाच्या जनतेच्या लोकांच्या हितासाठी अजिबात सत्तेत येण्यात रस नाही इंटरेस्ट नाही, ज्याला त्याला केवळ स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे फक्त आर्थिक भले करण्यासाठीच सत्तेत येऊन बसायचे आहे, ज्या भूमिकेवर दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात रस घेतो त्या समाजाच्या राज्याच्या लोकांच्या भल्यासाठी चुकून माकून एखादा सोडल्यास ज्याला त्याला आणखी आणखी श्रीमंत होण्यासाठी मंत्री मंडळात स्थान हवे आहे किंवा ते जमले नाही तर लुबाडण्यासाठी एखादे चांगले मंडळ हाताशी हवे आहे…
राज्यातल्या, आपल्या या महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाची अवस्था अनेकदा लग्न करून देखील आयुष्यात एकट्या राहणाऱ्या अनेक नटींसारखी किंवा चंचल तरुणींसारखी झालेली आहे, एकदा का पहिले लग्न संसार सुरु होताच मोडले कि पुढे देखील जसे काहींच्या संपूर्ण आयुष्यात सतत घटस्फोट किंवा वैधव्य नशिबी येते तसे राज्यातल्या जवळपास साऱ्याच प्रमुख राजकीय पक्षांची बिकट कठीण अपमानित अवस्था झालेली आहे. राज्यातल्या शिवसेना आणि काँग्रेसला तर आपले अस्तित्व तरी टिकून ठेवायला हवे या अत्यंत वाईट अवस्थेत ते दोघे या दिवसात कसातरी आपापला पक्ष पुढे रेटतांना दिसताहेत. वाचकहो, ऑपरेशन एकनाथ ह्याची साधरणतः दीड वर्षांपूर्वी खर्या अर्थाने सुरुवात झाली, सुरुवातीचे काही महत्वाचे डावपेच आखून देखील सरकार पडत नाही हे फडणवीसांच्या लक्षात आले होते शिवाय जो तो अगदी मुख्यमंत्री उद्धव सहित केवळ पैसे संपत्ती मिळविण्याच्या पाठी पडला आहे हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले होते,लबाड अजित पवार यांनी जो दगा त्यांना ऐनवेळी दिला त्याचे दुःख त्यांनी मनात ठेवले, शिवाय भाजपाचे भवितव्य उज्वल करणे, मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती, महाआघाडी सरकारात एकनाथ शिंदे आणि इतरही अनेक, सत्तेत असून देखील दुर्लक्षित व अपमानित होत असल्याने त्यांच्या साऱ्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे हे एव्हाना फडणवीसांच्या नक्की लक्षात आलेले होते, अगदीच एक किंवा दोन सवंगड्यांना विश्वासात आणि हाताशी घेऊन फडणवीसांनी ऑपरेशन एकनाथची जय्यत तयारी सुरु केली, विशेष म्हणजे या दीड वर्षात ज्या मंत्र्यांना किंवा आमदारांना शिंदे किंवा फडणवीस विश्वासात घेऊन कसे बाहेर पडायचे त्यावर समजावून सांगायचे त्यांचे मन वळवायचे, व्हायचे काय त्यातले काही त्यावर म्हणजे बाहेर पडण्यावर कुटुंब किंवा जवळच्या मित्रांना विश्वासात घेऊन सांगायचे, अनेकदा ऑपरेशन एकनाथ लीक होऊन पवार आणि उद्धव सावध होतात कि काय अशी भीती काळजी या दोघांना अनेकदा वाटायची, पण उद्धवजी आणि शरद पवार विशेषतः आमदार व शिवसेना अजिबात एवढ्या मोठ्या प्रमाणावर फुटणार नाही त्यावर ओव्हर कॉन्फिडण्ट राहिले जे नेमके फडणवीस व शिंदे यांच्या नेमके पथ्यावर पडले आणि ऑपरेशन शिंदे एकदाचे यशस्वी झाले….
आता अत्यंत महत्वाचे सांगतो, नेमका कोणत्या पक्षाला हात घालायचा हा मोठा चॉईस देवेंद्र फडणवीसांना होता कारण काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील अनेक आमदार आधीच त्यांच्या गळाला लागलेले होते पण भाजपा श्रेष्ठींशी अर्थात विश्वासात घेऊन बोलणी केल्यानंतर, या राज्यातल्या शिवसेनेला दणका देण्याचे ठरले आणि फडणवीस क्षणाचीही उसंत न घेता कामाला लागले, कौतुक असे कि फडणवीस आणि शिंदे यांनी ज्या युक्तीने सेनेच्या प्रत्येक आमदाराला विश्वासात घेऊन उद्धव यांच्या सेनेतून बाहेर आणले त्यावर करावे तेवढे कौतुक कमी, नाही म्हणायला त्यातल्या दोघांनी हा फोडाफोडीचा इत्यंभूत प्रकार उद्धव यांच्या कानावर घालण्याचा दोन तीन वेळा प्रयत्न केला पण उद्धव ना भेटायला तयार होते मग बोलणे तर फार दूरचे, थोडक्यात उद्धव यांची बेफिकीर वृत्ती, त्यांच्या सभोवती जमलेले स्वार्थी व्यसनी उद्धट बेधुंद लोभी नातेवाईक आणि नेते, उद्धव यांचे सततचे दुर्लक्ष म्हणजे आई वडिलांचे दुर्लक्ष झाल्यानंतर पोटची मुले जशी झपाट्याने चुकीच्या मार्गाला लागतात ते तसेच, हुबेहूब उद्धव यांचे झाले आणि बघता बघता राज्यातली शिवसेना सुपडासाफ झाली, आज जे काय चार दोन उद्धव यांच्या जवळपास वावरतांना दिसतात किंवा आम्ही बघा तुमचे कसे लॉयलिस्ट, ते देखील केवळ माहिती घेण्यासाठी त्यांच्या आसपास फिरतांना दिसताहेत एवढी मोठी फूट आज उद्धव यांच्या वागण्याने उभ्या शिवसेनेत पडलेली आहे. केवळ दोन चार अपवाद वगळता बाहेर पडतांना एकानेही शिंदे यांच्यावर मोठ्या अटी किंवा शर्ती लादल्या नाहीत एवढे हे आमदार विशेषतः मंत्री किंवा राज्यमंत्री उद्धव यांच्या कारभाराला आणि राष्ट्रवादीच्या एकांगी पैसे खाण्याला त्यांच्या मुस्लिम धार्जिण्या भूमिकेला कंटाळले होते संतापलेले होते शेवटी तेच घडले, ऑपरेशन एकनाथ जवळपास एकट्या देवेंद्र फडणवीसांनी यशस्वी केले यश मिळविले…
अपूर्ण : हेमंत जोशी