द एन्ड करायचा का काँग्रेसला ?
महाराष्ट्रातली एकेकाळची प्रभावी जबरदस्त भारदस्त इंदिरेची काँग्रेस बघता बघता कशी संपली म्हणजे तिला संपवले कि ती आपणहून संपली, मतदारांनी तिला घालवले कि ती आपणहून बाजूला झाली, सतत चुका करत गेली म्हणून संपली कि राज्यातल्या विरोधी चतुर नेत्यांनी तिला संपविले त्यावर तुमची स्वतःची वेगवेगळी मते नक्की असू शकतील. एक मात्र नक्की राज्यातल्या काँग्रेसचा भगवान दादा झाला आहे, एकेकाळी भगवान तेही हिंदी चित्रपट सृष्टीतले खऱ्या अर्थाने दादा होते पण त्यांचा वाईट काळ जसा माझ्यासारख्या अनेकांनी त्या दादरच्या चाळीत बघितला सेम तेच हुबेहूब राज्यातल्या, महाराष्ट्रातल्या काँग्रेसने आपल्या हाताने वाटोळे करवून घेतले आहे. राजवाड्यात कित्येक वर्षे, वर्षानुवर्षे वास्तव्याला असलेली काँग्रेस थेट आज धारावीत राहायला आल्यासारखी वाटते, अजूनही काँग्रेसचे राज्यातले नामचीन नेते आणि गांधी परिवारातले सोनिया राहुल इत्यादी या राज्याच्या ध्येय धोरणात बदल करायला तयार नाहीत म्हणजे हे तर असे झाले कि एखादा कामुक पुरुष गुप्त रोग जडल्यानंतर देखील वेश्यागमन करायला थांबत नाही. विदर्भातला मतदार मागल्या विधान सभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे इंदिरा गांधी यांच्या आठवणीत या काँग्रेसच्या मदतीला धावून आला नसता तर त्याच विधानसभा निवडणुकीत राज्यातली काँग्रेस सुपडा साफ झाली असती. महत्वाचे म्हणजे विदर्भातले जे प्रभावी नेते काँग्रेससाठी धावून गेले त्यांनी इमान राखून आमदार म्हणून ते निवडून आले त्याच आमदारांची मंत्री मंडळात अवहेलना केली जाते, विदर्भातले काँग्रेस आमदार म्हणजे अडाणी बेवकुफ अक्कलशून्य या पद्धतीने महाआघाडीच्या सारेच मंत्री राज्यमंत्री अगदी मुख्यमंत्री उद्धव यांच्यासहित त्यांच्याकडे बघतात, सतत दुर्लक्ष करणारी हाडतूड करणारी वाईट वागणूक विदर्भातल्या या आमदारांना सतत मिळत असल्याने त्यांना विरोधकांनी केवळ गोंजरायचा अवकाश, उरले सुरले हेही काँग्रेस मधून नक्की बाहेर पडतील किंबहुना भाजपापेक्षा पवारमय होऊन मोकळे होतील, माझे बोलणे खोटे वाटत असल्यास अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके किंवा त्यांच्या चालबाज चाणाक्ष चतुर नवऱ्याला म्हणजे संजय खोडके यांना विश्वासात घेऊन विचारा, आपण कसे दिल्लीतल्या दिशाहीन नेतृत्वाला आणि राज्यातल्या केवळ स्वतःचा विचार करणाऱ्या नेत्यांना, मंत्र्यांना कंटाळलो विटलो त्रासलो वैतागलो हे संजय त्या दिलीपकुमार सारखा रडका अभिनय करीत तुम्हाला नक्की सांगतील…
माझ्या ओळखीतली एक तरुणी होती तिचे आधी गोविंदाशी लग्न झाले पण घटस्फोट झाला नंतर तिने शेजारच्या चाळीतल्या राम्याशी लग्न केले पण पुढे तिला जी मुले झाली ती राम्याची नव्हे तर गोविंदा पासून झाली कारण, जरी त्याच्याशी तिने घटस्फोट घेतला असला तरी तिचे ते पहिले प्रेम असल्याने राम्या बाहेर पडला रे पडला कि ती थेट गोविदाच्या खोलीत शिरायची आणि महिन्याभरात वांत्या करायला लागायची, संजय खोडके यांचे नेमके तेच झालेले आहे म्हणजे दुसरे लग्न जरी काँग्रेसशी तरी त्यांचे पाहिले प्रेम त्यांना सामान्य कुवतीचा ते श्रीमंत करण्यात राष्ट्रवादी,पवार, अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल इत्यादी असल्याने खोडके दाम्पत्य म्हणे इंदिरेत कमी राष्ट्रवादी च्या अंगणात अधिक रमतात तेथेच कायम झिम्मा फुगडी खेळून मोकळे होतात विशेष म्हणजे संजय खोडके खडसे कुटुंबाप्रमाणे आजही राष्ट्रवादीत आहेत आणि त्यांच्या मुलांची आई म्हणजे पत्नी सुलभा या काँग्रेस ची उमेदवारी घेऊन आमदार झाल्या आहेत, निवडून आल्या आहेत आणि हे असे या दिवसात राज्यातल्या काँग्रेसमध्ये अनेकांचे झालेले आहे, काँग्रेसचे प्रतिनिधी नेते किंवा कार्यकर्ते अमुक एखादे काम घेऊन गेले तरी कोणताही शासकीय अधिकारी त्यास नकार देतो कारण तशा त्या त्या खात्यांना राष्ट्रवादी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांच्या त्यांना सख्त सूचना आहेत आणि नेमकी सहकार गृह वित्त पाटबंधारे इत्यादी महत्वाची मालामाल करून देणारी खाती राष्ट्रवादीकडे आहेत. खासदार बाळू धानोरकरला तर पहिल्या प्रेयसीची म्हणजे शिवसेनेची एवढी आठवण येते कि ते कित्येकदा सेनेच्या सेना नेत्यांच्या आठवणीत ते धाय मोकलून रडतात. भाजपाला विदर्भातला हा काँग्रेसचा विधान सभेला मिळालेला विजय मनापासून बोचलेला आहे नेमकि तीच अवस्था राष्ट्रवादीची किंवा शरद पवारांची आहे आणि धर्मगुरू जसे दुःखावर फुंकर मारून आणि आर्थिक मानसिक ताकद देऊन धर्मांतर घडवून आणतात ते तसे या दिवसात शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपाचे मिशन काँग्रेस खूप जोरात सुरु आहे म्हणजे हनिमूनच्या दिवसात कातावलेला कामुक नवरा जसा संपूर्ण ताकदीनिशी खोलीत शिरतो तेच या तिन्ही प्रभावी राजकीय पक्षांचे झालेले आहे, ताकद एकवटून ते राज्यातल्या उरल्या सुरल्या काँग्रेसच्या प्रभावी नेत्यांना विशेषतः यावेळी निवडून आलेल्या आमदारांना पुढल्या निवडणुकीसाठी आमच्याकडे या, असा गळ टाकून आहेत आणि त्याची मोठी हानी नक्की काँग्रेसला यावेळी यासाठी बसणार आहे कि ते अनेक बहुतेक नालायक मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्यायला ते तयार नाहीत, बहुसंख्य नाराज आमदारांचे साधे गार्हाणे देखील ऐकुन घ्याला कोणी वाली पुढे आला नाही पुढे येत नाही. काँग्रेसमध्ये आधी देखील नेमके तेच घडायचे म्हणजे तेच ते थोबाडं पुढे असायचे, मंत्री व्हायचे याही वेळी अजिबात वेगळी परिसस्थिती नाही, होलसेल दुकानदारांना काँग्रेसने मंत्री केले असल्याने किंवा के सी पाडावी यांच्यासारख्या अकार्यक्षम आमदारांना नामदार म्हणून संधी दिली गेल्याने नजीकच्या काळात राज्यातल्या काँग्रेसचे अधिक आणि मोठे वाटोळे होणार आहे नेमके हेच सत्य आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी