विरोधकांना घाम फडणविसांना सलाम…
14 में रोजी मुख्यमंत्र्यांची सेनाप्रमुख म्हणूनच सभा झाली आणि 15 मेंला गोरेगाव येथे जी सभा माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली ती सभा म्हणजे उद्धव यांच्या सभेला जाहीर उत्तर नव्हते तर हि सभा मुंबईतल्या समस्त उत्तर भारतीयांसमोर होती जी खूप आधीपासूनच ठरलेली होती.मैत्रिणीसंगे रोमान्स सुरु असतांना ध्यानी मनी नसतांना अचानक बायकोने माहेराहून परतावे आणि आपल्याकडल्या किल्लीने घराचे दार उघडून थेट बेडरूम मध्ये शिरावे म्हणाल तर हे असे फडणवीसांच्या सभेचे झाले, त्यांनी अचानक दुसरेच दिवशी सभा घेऊन ठाकरेंना आणि समस्त विरोधकांना धो धो धुतले. अत्यंत महत्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे समस्त अभ्यासू उत्तरभारतीयांसमोर केलेले भाषण एवढे प्रभावी तडफदार दमदार आक्रमक माहितीपूर्ण जोशात जोरात जोमात व उत्साहात होते कि या राज्यातला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक हिंदू उत्तर भारतीय फडणवीसमय तर झालाच पण समस्त मुंबईकरांची मने देवेंद्र यांनी जिंकली आणि हेही सिद्ध केले की ते एकमेव राज्यातले यापुढे मान्यवर लोकमान्य नेते असतील. देवेंद्र जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच मी लिहिले होते कि ते मुख्यमंत्री आहेत म्हणून किंवा ते माझ्या विदर्भाचे आहेत म्हणून किंवा ते ब्राम्हण आहेत म्हणून किंवा त्यांच्या वडिलांना आणि आज त्यांना मी जवळून ओळखतो म्हणून ते मला भावले आवडले असे अजिबात नाहीत तर भविष्यात अमुक नेता नेमका कसा असेल हे माझ्या लगेच लक्षात येते आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते एक दिवस फार पुढे निघून जातील हे माझ्या तेव्हाच लक्षात आल्याने मला देवेंद्र मनापासून व मनातून भावले आवडले, तेच मी कायम उद्धव बाबत नेमके तेच सांगत आलोय कि उद्धव यांना अजिबात कमी लेखू नका पण यावेळी उद्धव बाबत माझा अंदाज साफ चुकला आहे ज्यांना मी मेरिट स्टुडंट समाजत होतो ते उद्धव यावेळच्या परीक्षेत अनेक विषयात थेट नापास झालेले आहेत…
आपण चुकलो आपला सत्तेत जाण्याचा निर्णय चुकला यावेळी आपला इगो आड आला किंवा शरद पवारांच्या जाळ्यात आपण आणि काँग्रेस अलगद अडकलो हे उद्धव यांच्या लक्षात आले आहे पण तोपर्यंत उशीर झाला आहे वेळ निघून गेली आहे जणू कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर एखाद्याचे तेही उफाड्या तरुणीशी लग्न लावून दिले आहे. उद्धव यांनी अलिकडल्या त्यांच्या जाहीर सभेत परखड हिंदुत्वाची नक्की जाहीर आणि उघड भूमिका घेतली पण तोपर्यंत राज्यातल्या समस्त मतदारांच्या हे लक्षात आलेले होते कि उद्धव प्रसंगी एखाद्या फायद्यासाठी मुसलमानांचे लांगुलचालन करू शकतात आणि मराठी किंवा हिंदू शिवसैनिकांपासून अगदी सहज फारकत घेऊन मोकळे होतात होऊ शकतात नेमके ते या राज्यात फडणवीस किंवा भाजपाबाबत अजिबात घडले नाही कारण ते व्यक्तिगत स्वार्थासाठी राज्यातले जे हिंदुस्थानावर प्रेम करणारे मुसलमान नाहीत त्यांच्यासमोर अजिबात झुकणारे नाहीत झुकले नाहीत त्यामुळे राज्यातला मतदार मग तो मराठी असेल किंवा महाराष्ट्राबाहेरचा हिंदू, फडणवीसांच्या 15 तारखेच्या भाषणावर लुब्ध झाला फडणवीसमय झाला. मित्रांनो, मी भाजपाचा नाही किंवा अन्य कोणत्याही वेगळ्या विचारांच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मी कडवा हिंदू आहे आणि जे नेते राज्यातल्या हिंदूंच्या भल्याचा विचार करतात ते मला मनापासून आवडतात म्हणून जेव्हा उद्धव हिंदू भूमिके बाबत कडवे होते तेव्हा ते मला मनापासून आवडायचे मध्यंतरी अडीच तीन वर्षे ते पवारांच्या मुस्लिम धार्जिण्या भूमिकेशी काहीसे एकरूप झाले म्हणून माझ्या किंवा प्रत्येक मराठी किंवा हिंदूंच्या मनातून उतरले. त्यांना आमच्या मनात पूर्वीचे स्थान निर्माण करायला यापुढे मोठा कालावधी लागणार आहे आणि हेच कडवे सत्य आहे. देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर भारतीयांसमोर केलेले भाषण म्हणजे एका उत्तम प्रगल्भ आक्रमक बुद्धिमान अनुभवी भाजपा नेत्याचे त्याचवेळी एका कडव्या संघ स्वयंसेवकांचे ते पेटून उठणारे भाषण ठरले फडणवीसांनी उभ्या राज्याला जनतेला मनापासून जिंकले….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी