भाग दुसरा : पवार घराण्यातील सत्ता
स्पर्धा व सत्ता संघर्ष…
बारामतीच्या धोंडूकाका लेलेंचा अंतिम काळ अंतिम टप्प्यात आला नि यमराज त्यांच्या घरी पोहोचले, अंतिम इच्छा कोणती ते लेलेंना विचारते झाले, त्यावर चतुर लेले म्हणाले, मला माझ्या वर्गमित्राला म्हणजे शरद पवारांना पंतप्रधान झालेले बघायचे आहे त्यावर यमराजांना मोठ्यांदा हसायला झाले, हसतच यमराज लेलेंना म्हणाले, म्हणजे तुला अमर व्हायचे आहे तर..गंमतीचा भाग सोडा पण पवारांना यासाठी पंतप्रधान होण्याचा मार्ग खडतर अशक्य ठरला कारण त्यांना राजकारणातले सारे काही जमले पण राज्यात आणि संपूर्ण देशातल्या हिंदूंचा विश्वास त्यांना संपादन करता आला नाही आणि एखादा नेता जेव्हा संपूर्ण समाजाचा अख्य्या समूहाचा विश्वास संपादन करण्यात अयशस्वी ठरतो तसेच देशात ठिकठिकाणी जातीपातीच्या व अत्यंत वाईट सवंगड्यांच्या भरवशावर सत्ता संपादन करण्यासाठी कायम पुढे कायम सरसावलेला असतो त्याच्या या क्लुप्त्या व युक्त्या त्याला क्षणिक भलेही यश मिळवून देत असतील पण नेमके इप्सित साध्य करण्यात मात्र हे नेते नक्की अयशस्वी ठरतात कारण त्यांनी मोठ्या प्रमाणावर सभोवताली जमा होणाऱ्या व मनापासून साथ व साद देणार्या हिंदूंचा विश्वास कायमस्वरूपी गमावलेला असतो, नेमका हाच फरक शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात असल्याने पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत आणि अजिबात होणारही नाहीत ज्याचे मला व्यक्तीश: आणि राज्यातल्या समस्त मराठींना अगदी मनापासून वाईट वाटते. गाजणाऱ्या बारामतीच्या पवार घराण्यातील छुपी सत्ता स्पर्धा व त्यासाठी या घराण्यातील अनेकांना इच्छुकांना जो संघर्ष केवळ शरद पवार यांच्यामुळे करावा लागला किंवा अजूनही करावा लागणार आहे त्यावर मला पुण्यातल्याच एका माझ्या ओळखीच्या कुटुंबाची आठवण झाली. येथे आडनाव तेवढे बदलले आहे. पगारिया आडनावाचे एक अत्यंत यशस्वी एकेकाळी कोचिंग क्लासेस घेणारे ज्यांच्याकडे देशातले दररोज जवळपास एक हजार विद्यार्थी शिकून जायचे त्यामुळे पगारिया यांचे त्यातून रग्गड उत्पन्न, त्यांना दोन्ही मुले, वयस्क पगारिया कडक शिस्तीचे निर्व्यसनी मात्र कमालीचे कंजूष त्यांच्या या शिस्तीत मदत करणाऱ्या दोन्ही मुलांचे संसार सुरु झाले तरी दोघांनाही बापापुढे व्यसनांची धमाल तोपर्यंत करता न आलेली, त्यामुळे वयस्क बाप जाण्याची ते जणू वाट पाहत होते, जसा बाप गेला तसा त्या दोघांनीही हा व्यवसाय सांभाळला पण जिंदगीची सारी हौस आणि ऐश त्यांनी पूर्ण करून घेतली कारण त्यांना आता आकाश मोकळे झाले होते. का कोण जाणे पण शरद पवार यांचे बारामती घराणे हा विषय लिहितांना मला पगारिया यासाठी आठवले कि मनाने शरदराव कितीही कणखर असले तरी आज ना उद्या त्यांचा सिनियर पगारिया झाल्यानंतर पवारांच्या घराण्यातील सत्ता संघर्ष त्या दोन मुलांसारखा नक्की उफाळून वर येणार आहे कारण आजच अगदी उघड पवार घराण्यातील तीन वेगवेगळे कुटुंब सत्ता हासील करण्यात ती स्वतःकडे ठेवण्यात अतिशय खुबीने गुंतलेले आहेत त्यातले पहिले स्वतः शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया, पवारांना जशी पंतप्रधान न झाल्याची मोठी खंत आहे तशी त्यांना सुप्रियाला अद्याप राज्याचा साधा मुख्यमंत्री करू शकलेलो नाही याची अधिक खंत आहे दुसरे अजित पवार आणि पार्थ पवार आणि तिसरे अत्यंत महत्वाचे म्हणजे रोहित पवार आणि रोहित यांचे दूरदर्शी चतुर आई वडील सुनंदा आणि राजेंद्र पवार. पवारांच्या पश्चात हे तिघे एकत्र कायम असावेत असे प्रयत्न पवारांनी फार आधीपासून करायला हवे होते पण अजितदादांना मोठे करण्याच्या नादात जेव्हा अजितदादा हेच शरदराव यांच्या डोक्यावर बसले त्यानंतर पवारांनी सुप्रिया यांना अमेरिकेतून बोलावून घेतले आणि समाजकारण पुढे करून पुढे मोठ्या खुबीने सुप्रिया यांना राजकारणातच ओढले घातले, खरे कौतुक सुनंदा राजेंद्र आणि दिवंगत आप्प्पासाहेब पवार यांचे, त्यांनी शरद पवार यांच्यासमोर लो प्रोफाइल राहून खुबीने संपूर्ण राज्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे जाण्याचा म्हणजे बारामतीतून बाहेर पडून मुंबईत जाण्याचा जो सल्ला दिला आणि रोहित यांनी मानला ज्यातून त्यांच्या भविष्यात मोठा नेता होण्याची नांदी रुजली, शरदराव यांच्या ते लक्षात येऊनही त्यांना रोहित यांचा आप्पासाहेब करता आला नाही आणि यापुढे करताही येणार नाही कारण रोहित अत्यंत खुबीने वाघाच्या गुहेत शिरून आप्पासाहेबांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यात गुंतलेला आहे. मी जे आज लिहितो आहे तेच पुढे घडणार आहे जरी त्यातले काही लिखाण काहींना बोचणारे असले तरी सत्य मांडतांना माझे हात थरथरले नाहीत…
क्रमश: हेमंत जोशी