पुढला सिकंदर कोण ?
-हेमंत जोशी
विवाहाआधीच न चुकता कुठेही आणि केव्हाही सतत संभोग करणाऱ्या कामातून गेलेल्या एखाद्या तरुणाला जेव्हा प्रत्यक्षात त्याचे लग्न होते त्यादरम्यान त्याला एकच चिंता सतत सतावते कि शरीराचा नको तो अवयव बोथट झाल्याने मधुचंद्राच्या पहिल्या राती आपण यशस्वी होऊ अथवा आपला भांडाफोड होणार आहे, पहिल्याच दहा मिनिटात पाठ करून झोपण्याची वेळ आपल्यावर येणार तर नाही ना, हि ती चिंता जशी त्याला सतत भेडसावत असते ते तसेच काहीसे माझे झाले आहे म्हणजे मुंबई महापालिका निवडणुका अद्याप काहीशा दूर असतांना मी भाजपाच्या यशाविषयी त्या तरुणसारखा काहीसा साशंक आहे कारण शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांचीही जय्यत तयारी असताना वास्तवात कायम आधीच नियोजन करणारा भाजपा काहीसा गाफील आहे किंवा गाफील होता असे मला या दिवसात सतत वाटत राहते. देवेंद्र फडणवीस आज ना उद्या केंद्रात गेल्यानंतर राज्याचा फडणवीस कोण तर त्यावर माझ्या नजरेसमोर कायम आशिष शेलार या विरोधकांना पुरून उरणाऱ्या धाडसी नेत्याचे नाव असते. त्यापद्धतीने भाजपा लवकरात लवकर पाऊल उचलेल म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आशिष शेलार हेच प्रदेशाध्यक्ष असतील म्हणजे फडणवीस यांना जसे भाजपाने प्रदेशाध्यक्ष केले होते पद्धतीने पाटील यांच्यानंतर आशिष शेलार हेच त्यांची जागा घेतील. तत्पूर्वी मुंबई महापालिका निवडणुका मात्र यावेळी भाजपाला अतिशय कठीण जातील असे माझे ठाम मत आहे पण त्यातही फडणवीस आणि शेलार त्यांच्या मावळ्यांसहित महाविकास आघाडीला पुरून उरले तर एखाद्या बोथट तरुणाचा पहिल्याच दिवशी हनिमून यशस्वी ठरल्याचे मोठे समाधान मला मिळेल. हे तर आता महाविकासचे आपापसात नक्की ठाकले आहे कि अशा महत्वाच्या निवडणुकात शिवसेना आणि राष्ट्रवादी त्या एकत्र येऊन लढतील आणि काँग्रेस जरी अलिप्त लढली तरी निवडणूक निकालानंतर त्यांची महाआघाडी नक्की ठरलेली असेल किंवा यापुढे भाजपशी कायमचा पंगा घेत आणि काँग्रेसला देखील दूर करून राष्ट्रवादी व शिवसेना हि युती यशस्वी करण्याचे काही प्रयोग पवार आणि उद्धव राबवितांना दिसतात किंवा तीन तीन प्रमुख पक्ष एकत्र आल्यानंतर अतिशय स्ट्रॉंग हिंदू कार्ड म्हणजे शिवसेनेसारखे मिळमिळीत नव्हे खेळणाऱ्या भाजपाला या तिघांशी निवडणुका मग त्या कोणत्याही असो मुकाबला करणे म्हणजे पत्रकार नितीन सावंत याने पत्रकार उदय तानपाठक यास मांडीवर बसवून तीन तास एखादा चित्रपट बघण्यासारखे. मुंबईत भाजपाकडे जे नेते आहेत ते त्यांच्या परिसरात फारतर दादागिरी करून महाघाडीला मुंबईमहापालिका निवडणुकीत काही उमेदवारांना चारी मुंड्या चित करू शकतात म्हणजे मंगलप्रभात लोढा जरी मुंबई भाजपाध्यक्ष असले तरी फारतर ते दक्षिण मुंबईतल्या त्यांच्या विधान सभा पसरीसरात नक्की नेमका करिष्मा दाखवून मोकळे होतील, प्रसाद लाड माहीम माटुंगा परिसरात, प्रवीण दरेकर बोरिवली तसेच अमित साटम जुहू, पराग आळवणी पार्ले पूर्व भागात किंवा अतुल भातखळकर कांदिवलीतल्या त्यांच्या हुकूमाच्या परिसरात भाजपाचे हे असे स्थानिक नेते नक्की करिष्मा दाखवून काही उमेदवार निवडून आणतील, नगरसेवक फारतर निवडून आणायला उपयोगाचे ठरतील पण या स्थानिक नेत्यांच्या भरवशावर आम्ही मुंबई महापालिकेत आमची सत्ता आणू असे शेलार आणि फडणवीस यांनी स्टेटमेंट करणे म्हणजे सध्यातरी समीर चौगुले यास दाट केसांचा राजा म्हणण्यासारखे आहे. आणि अशा चित्र विचित्र परिसस्थितीत आमच्यासारख्या मंडळींना नैराश्य यासाठी येऊ लागलेले आहे कि महाविकास आघाडीने पुन्हा सत्तेत येणे म्हणजे मुंबई महापालिकेची पुनःपुन्हा रस्त्यावर उभी राहून धंदा घेणारी वेश्या करण्यासारखे. एखादीला नागडं करून अनेकांनी तिच्यावर बलात्कार करावा तशी आज या मुंबई महापालिकेची अवस्था आहे म्हणजे जो येतो तो बलात्कार करून जातो अशी पाकिसस्थानात बांधून ठेवलेल्या हिंदुस्थानी पळवून नेलेल्या असहाय्य तरुणी सारखी सत्तेतल्या बहुतेकांनी अवस्था करून ठेवलेली आहे. केवळ एखादा अकस्मात चमत्कार भाजपा सत्ता त्यातून आपलीकडे खेचून आणू शकते. आणि असा चमत्कार घडावा मुंबई महापालिकेत भाजपाला अच्छे दिन नक्की यावेत किमान एक संधी भाजपाला मिळावी मात्र भाजपाही इतरांप्रमाणे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर आणि प्रगतीवर बलात्कार करणारी निघाली तर मात्र समस्त मुंबईकरांनी डोक्यावर हात मारून घ्यावा. लढवय्ये आणि नेमके यश मिळविण्यात वाकबगार असलेले फडणवीस व शेलार काहीतरी चमत्कार घडवून आणतील अशा निदान अपेक्षा तरी करू या….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी