भय्यू महाराज : हत्या कि आत्महत्या ?
-पत्रकार हेमंत जोशी
म्हणाल तर भय्यू महाराज किंवा राज्यातली लबाड बुवाबाजी किंवा लुटारू डाकू बुवा बाबाहा गंभीर विषय तसा खूपच व्यापक आहे किंवा येऊ तशी कशी मी नांदायला, सारख्या लांबलेल्या कंटाळवाण्या मालिकांसारखा गचाळ देखील आहे त्यामुळे या विषयावर येथे फार चर्चा नको पण नेमके काय घडते काय घडले बुवांच्या बाबतीत काय काय घडत असते हे मात्र येथे जसेच्या तसे मी नक्की मांडणार आहे. स्वीटू आणि ओम या दोन ठोकळ्यांच्या लाभलेल्या मालिकेसारखा भय्यू महाराज हा देखील असाच रटाळ आणि भंगार विषय पण सर्वसामान्य भक्त मंडळी या अशा बुवांच्या नादी लागून जो वेळ आणि पैसा खर्च करतात त्यांच्या डोक्यात लख्ख उजेड पाडण्यासाठी मी अधूनमधून बुवाबाजी या विषयाला हात घालत असतो पण खरे किंवा अगदी मनातले सांगू का मला देखील या नालायक बुवांवर लिहितांना भीती वाटत असते, भीती या असल्या फसव्या बुवांची कधीच वाटत नाही खरी भीती त्यांच्या भक्तांची वाटत असते कारण हे भक्त अशा विविध बुवांकडे देव म्हणून बघत असतात आणि दिवसातले कित्येक तास या बुवांच्या भक्ती करण्यात हे भक्त खूप खूप वेळ घालवत असल्याने त्या बुवांना अजिबात नाही पण भक्तांमध्ये केलेल्या भक्तीमधून एकप्रकारचे देवपण निर्माण होत असल्याने त्यांच्या नालायक बाबा बुवांवर जेव्हा मी आडवी तिडवी टीका करतो मला अशावेळी त्यांच्या भक्तांच्या शापाची मनातून मनापासून यासाठी भीती वाटत राहते कि हे भोळे भक्त हृदयातून जर मला किंवा माझ्या कुटुंबाला शाप देऊन बसलेत तर त्याचे वाईट परिणाम मला आम्हाला भोगावे लागणार आहेत. हा लेख लिहीत असतांना बातमी कानावर पडली कि इतर अनेक संशयित मोठ्या खुबीने सुटले आणि भय्यू महाराज यांचा जवळचा साथीदार पापातला भागीदार विनायक, महाराजांची मैत्रीण पलक पुराणिक आणि वाहन चालक शरद देशमुख या तिघांना केवळ सहा वर्षांची सजा इंदोर न्यायालयाने ठोठावलेली आहे, हे तिघे अडकले हेही नसे थोडके मात्र इतर अनेक सुटले त्याचे मनापासून वाईट वाटते कारण भरकटलेला भय्यू महाराज आमचा यार होता मित्र होता आणि चूक त्यांची अधिक होती ज्यातून त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आणि बघता बघता हे कुटुंब उध्वस्त झाले अर्थात या संकटाची झळ भविष्यात आमच्या या मित्राच्या सुस्वरूप आणि निराधार कन्येस म्हणजे कुहू हिला बसू नये असे अगदी सतत मनापासून वाटत राहते…
माझ्या आणि भय्यू महाराजांच्या आयुष्यात फार भेटी झाल्या असे नाही पण आम्ही एकमेकांचे चाहते आणि मित्र असल्याने ज्या भेटी झाल्या त्या अतिशय महत्वाच्या होत्या त्यापैकी त्यांची माझी पहिली भेट इंदोरला आजचा प्रहार या संघटनेचा अध्यक्ष माझा जवळचा मित्र अनिल गावंडे याने घालून दिलेली होती कारण भय्यू महाराजांच्या भानगडी माझ्या त्यावेळी कानावर पडल्याने मी त्यांच्या भानगडी बाहेर काढणार आहे हे अनिल यास कळले होते विशेष म्हणजे अनिल त्यावेळी इंदोरच्या आश्रमात नशीब आजमवायला म्हणून वास्तव्याला होता, तेथून तो लवकरच बाहेर पडला अन्यथा तो देखील पुढे एखादा बाबा बुवा झाला असता. मी टीकात्मक लिखाण करू नये कारण महाराज आमच्या विदर्भासाठी फायद्याचे आहेत हे अनिल याने मला पटवून दिल्याने केवळ चर्चाकरण्यासाठी म्हणून मी त्यांना इंदोरला भेटायला गेलो होतो. त्यावेळी जे मी त्यांना जो सल्ला दिला होता तो त्याचवेळी त्यांनी ऐकला असता तर आज हि कठीण वेळ या कुटुंबावर आली नसती पण महाराजांनी मी त्यांना वेळोवेळी दिलेला सल्ला ऐकला नाही, विविध वाईट सवयींना त्यांनी सोडले नाही आणि त्यांनी स्वतःचा मोठा घात करवून घेतला. अगदी पहिल्या भेटीत मी त्यांना म्हणालो होतो कि आमच्या महाराष्ट्रातला कोणताही विशिष्ट समाज पाठीशी नसताना अत्यंत खुबीने वागून नाणिजचा नरेंद्र आणि मुंबईचा अनिरुद्ध नाव आणि पैसा प्रचंड कमावून मोकळे होताहेत आणि येथे तुमच्या पाठीशी आमच्या राज्यातल्या बहुजन समाज, सारे बलाढ्य देशमुख आणि संपूर्ण विदर्भ आहे त्या पाठिंब्याचा हरकत नाही स्वतःसाठी नक्की फायदा करून घ्या पण त्याचवेळी जर थोडे उदार मन ठेवून आणि व्यसनांपासून दूर राहिलात तर आज मिळालेले देवपण कायम टिकेल आणि तुम्हाला या इतर म्हणजे नरेंद्र अनिरुद्ध किंवा अन्य अनेक लबाड बुवांसारखे मजेत आयुष्य घालविता येईल पण ज्यांनी त्यांना समजावून सांगितले अशांना त्यांनी दूर ठेवले दूर ढकलले आणि वाईट संगतीला लागून भय्यू महाराजांनी विनाकारण स्वतःचे कुटुंब उध्वस्त करून घेतले जी कळकळ आम्हाला त्यांच्याविषयी होती तेच सांगणे त्यांच्या एकमेव अधिकृत पत्नीचे म्हणजे दिवंगत माधवी देशमुख यांचे देखील त्यांना सतत सांगणे असे, तुम्ही असे भक्तांना उल्लू बनवून त्यांच्या असहाय्य्यतेचा गैरफायदा घेऊ नका, चांगले वागा, ज्याचा मोठा फायदा आपल्या कुटुंबाला नक्की होईल पण आधी आवडत्या नंतर नंतर नावडत्या झालेल्या ठरलेल्या माधवी वहिनींचे त्यांना उपदेश देणे अजिबात आवडत नव्हते आणि भय्यू महाराज मग मोठ्या खुबीने त्यांच्यापासून दूर गेले म्हणजे मोठ्या युक्तीने त्यांनी माधवी यांना कुहूच्या शिक्षणासाठी पुण्यात पाठवून दिले आणि तेथपासून भय्यू महाराजांचा मोठा ह्रास झपाट्याने सुरु झाला म्हणजे महाराजांनी पैसे खूप मिळविले अगदी मनासारखे पण त्यांचे हे पैसे लुबाडणेच त्यांच्या अंगलटआले, अनेक बदमाश मोठ्या खुबीने त्यांच्या सभोवताली जमा झाले त्यातले केवळ तीन लटकले इतर सारे सुटले पण नुकसान फक्त मागे राहिलेल्या कुहूचे झाले त्या आयुषीचे अजिबात नाही….
अपूर्ण : हेमंत जोशी