फडणवीसांचा वांदा मोदींनी वापरला त्यांचा खांदा…
उर्वरित महाराष्ट्र संस्कारहीन आहे असे मी म्हणणार नाही, अजिबात तसे बोलणार नाही कोणालाही असे सांगणार नाही पण आमच्या विदर्भातले उच्च हिंदू संस्कार आणि हिंदू रूढी आजही चांगल्या पद्धतीने संपूर्ण विदर्भात जपले जातात अर्थात अपवाद त्या नाना पटोले यांच्यासारखे जगभर असतात तो भाग वेगळा. माझी उच्चशिक्षित असलेली आई मला नेहमी सांगायची कि नात्यात मैत्रीत नवरा बायकोमध्ये असलेली नाती किंबहुना कोणतीही मैत्री हि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायची असते आणि नवरा बायकोनी एकतर मरायचे असते किंवा नांदायचे असते. मी तिने सांगितलेला हा उपदेश आयुष्यभर पाळला मग नाते ते कुठलेही असले तरी, म्हणजे एकवेळ तर आयुष्यात अशी होती कि आहे तो डिस्टरब संसार मोडायचा आणि ज्या नटीला मी आवडत होतो तिच्याशी लग्न करून मोकळे व्हायचे पण आईचे शब्द कानात सतत रुंजत असल्याने कधी नात्यात बेईमानी करण्याची हिम्मत त्या उत्तम संस्कारांनी निदान मला तरी आमच्या या घरात देवाने करू दिलेली नाही थोडक्यात विदर्भातल्या या उत्तम अशा संस्कारांना आजही अजिबात तोड नाही ज्याची फार मोठी किंमत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज मोजताहेत. फडणवीस यांच्यातले संघ संस्कार आणि आईवडिलांकडून त्यांना मिळालेले विचार व संस्कार आजही ते त्यापासून दूर जात नाहीत त्यामुळेच त्यांना अलीकडे गेल्या दोन अडीच वर्षांपासून राजकारणात मोठी किंमत मोजावी लागते आहे. फडणवीस हे असे कट्टर स्वयंसेवक कि ते एकटे जरी उरले तरी रा. स्व. सोडणार नाहीत. संघ म्हणजे केवळ संघ भाजपा किंवा त्यांच्या असंख्य फांद्या म्हणजे कडवे हिंदुत्व असे मला म्हणायचे नाही किंवा कधीही सांगायचे नसते पण शिवसेनेने या विचारांपासून काहीशी फारकत अलीकडे घेतल्याने कदाचित उद्या तशी वेळ आपल्यावर म्हणण्याची येऊ शकते कि होय, संघ भाजपा म्हणजे केवळ हिंदुत्व. येथे अत्यंत महत्वाचा मुद्दा उत्तम संस्कारांचा आणि संघात असे संस्कार मना मनावर रुजवले जात असतात कि सकाळी किंवा संध्याकाळी जर तुम्ही संघ शाखेवर नेहमीप्रमाणे भगवा फडकवायला गेला आणि तेथे एकटे जरी असलात तरी एकट्याने का होईना भगवा फडकवूनच घरी परतायचे नेमके तेच विचार त्या फडणवीसांच्या मनावर रुजविले असल्याने त्यांना हे माहित आहे कि दिल्लीतल्या एक दोन महत्वाच्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या शिवसेनेचे महत्व संपवायचे आहे होते त्यासाठी त्यांनी मोठ्या खुबीने फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांचा खांदा वापरला ज्याची काही चांगली फळे फडणवीसांना सुरुवातीला नक्की चाखायला मिळाली म्हणजे ते त्यांच्या भाजपाचे आधी प्रदेशाध्यक्ष झाले त्यानंतर थेट पाच वर्षे त्यांना मुख्यमंत्रीपद देखील उपभोगता आले मात्र पुढे शिवसेना संपवायच्या नादात दिल्लीतल्या या नेत्यांनी शिवसेना संपविण्याची स्वप्ने बघता बघता राज्यातली भाजपा आणि फडणवीस यांचे धाडसी नेतृत्वच अडचणीत आणले कारण दिल्लीतल्या दिग्गज भाजपा नेत्यांना आणि येथे या राज्यातल्या त्यांच्या नेत्यांना देखील हे माहित नव्हते कि उद्धव ठाकरे वरकरणी शामळू किंवा बावळट दिसत असले तरी ते प्रत्यक्षात कसे बेरकी आणि आक्रमक आहेत कि त्यांच्यासमोर प्रसंगी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार देखील फिके पडले महत्वाचे म्हणजे उद्धव यांची राजकीय ताकद आणि मस्ती जी शरद पवार यांनी ओळखली दुर्दैवाने ती ताकद ती शक्ती थेट नरेंद्र मोदी यांना देखील ओळखता न आल्याने त्यांनी अनुक्रमे राज्यातल्या भाजपाचे आणि उद्याचा अटलबिहारी ठरू पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे निदान आज तरी फार मोठे राजकीय नुकसान करून ठेवले आहे आणि तीच वस्तुस्थिती आहे…
क्रमश: हेमंत जोशी