धोक्याची घंटा मोक्याची सूचना…
–पत्रकार हेमंत जोशी
काही नेत्यांकडे अवतारी पुरुष म्हणूनही बघितल्या जाते म्हणजे राजकारणात असे काही अवतारी नेते हमखास चमत्कार घडवून आणू शकतात असा जनतेचा त्यांच्यावर विश्वास असतो विशेषतः इंदिरा गांधी यांच्याकडे तर त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्या अवतारी नेत्या आहेत पद्धतीने हमखास बघितल्या पाहिल्या जायचे तेच नरेंद्र मोदी यांच्याही बाबतीत बघितले जाते ते तर साक्षात अवतारी पुरुषच आहेत पद्धतीने त्यांची इमेज तयार केल्या गेली जी प्रचंड यशस्वी ठरली कारण इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांना यश मिळत गेले ते देखील राजकारणात यशश्वी ठरत गेले. आपल्या या राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे देखील कायम म्हणजे त्यांच्या अगदी अखेरच्या श्वासापर्यंत अवतारी पुरुष देवपण लाभलेला नेता पद्धतीने विशेषतः देशातल्या आणि राज्यातल्या जनतेने बघितले त्यांच्यासारखे आणखीही काही या राज्यात आहेत किंवा होते अर्थात बाळासाहेब ठाकरे यांची जागा मात्र अद्याप कोणालाही घेता आलेली नाही, शरद पवार देखील केवळ या राज्यात कोणताही चमत्कार ऐनवेळी घडवून आणू शकतात अशी त्यांची देखील प्रतिमा बनलेली आहे पण पवारांनी ज्या पद्धतीची बहुसंख्य वाईट माणसे नेता म्हणून स्वतः भोवताली उभी केली त्यातून त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी अवतारी पुरुष किंवा नेता म्हणून आपली इमेज आपली प्रतिमा कधीही उभी करता आलेली नाही, करता पण येणार नाही फारतर त्यांच्याकडे फिल्मी नेत्यांपद्धतीने नेहमी बघितल्या जाते विशेष म्हणजे त्यांच्यासभोवताली जमलेली त्यांची माणसे देखील कायम त्यांच्याकडे आजतागायत संशयाने बघत आलेली आहेत. शरद पवार हे भाजपासाठी किमान या राज्यात तरी धोक्याची घंटा आहेत त्यांनी पुढल्या धोक्याची सूचना पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत विशेषतः भाजपाला देऊन ठेवल्या आहेत, तुमचा मोठा पराभव येणाऱ्या विधान सभेला नक्की होऊ शकतो हि ती धोक्याची सूचना या निवडणुका निमित्ते पवारांनी राज्यातल्या भाजपाला दिलेली आहे…
नेमके कोण खरे सांगते आहे म्हणजे राज्यातल्या महाआघाडीचे नेते खरे बोलताहेत कि देवेंद्र फडणवीस वस्तुस्थिती सांगताहेत कि पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत नेमके भाजपाला बहुमत मिळाले आहे कि राज्यात महाआघाडीने बाजी मारलेली आहे आणि या गोंधळात राज्यातली जनता आहे त्यांना नेमका विजय कोणाचा हेच कळत नाही पण या निवडणुकांमागची यशस्विता नेमकी कोणाची त्यावर मला येथे नेमके तुम्हाला सांगायचे आहे. नगर पंचायत निवडणुकांमध्ये आम्ही तिघेही वेगवेगळे लढलो पण निकालानंतर एकत्र आलो आहोत नेमका हा अतिशय महत्वाचा संदेश या निमित्ते विशेषतः महाआघाडीने एकाचवेळी भाजपाला आणि त्यांना मानणार्या कार्यकार्त्यांना मतदारांना दिलेला आहे. भलेही आज राज्यात नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर असेल म्हणजे त्यांची निवडून आलेली संख्या 415 च्या आसपास नक्की असेल पण जे मागल्या विधान सभा निवडणुकीला झाले तेच यावेळी प्रत्येक नगर पंचायत निवडणुकांमध्ये देखील घडले आहे म्हणजे आम्हा तिघांची निवडून आलेली संख्या भाजपापेक्षा कितीतरी अधिक पटाने मोठी असल्याने याच भाजपाला हेच चित्र येणाऱ्या विधान विधान सभा निवडणुकीत देखील नक्की बघायला मिळणार असल्याने पुढली विधान सभा हि या राज्यात विशेषत: भाजपा साठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी फार मोठे आव्हान नक्की ठरणार आहे. कारण हाच महाआघाडीचा फॉर्म्युला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकात वापरल्या जाणार असल्याने हि कोंडी सोडविण्याची मोठी समस्यां आता राज्यातल्या भाजपासमोर आहे, विशेष म्हणजे असे अनेक नेते असतात कि ज्यांना फार काळ सत्तेपासून दूर राहणे शक्य नसते त्यामुळे मी जे काही महिन्यांपूर्वी सांगितले होते ते घडण्याची नजीकच्या काळात दाट मोठी शक्यता आहे, भाजपामध्ये सध्या असलेले खडसे छाप काही महत्वाचे नेते महाआघाडीच्या विशेषतः राष्ट्रवादीच्या व शिवसेनेच्या गळाला लागण्याची फार मोठी शक्यता निर्माण झालेली आहे म्हणून भाजपाला हि धोक्याची सूचना आणि शेवटची मोक्याची संधी आहे त्यांना वेगवेगळ्या राजकीय क्लुप्त्या लढवून बलाढ्या झालेल्या माआघाडीला मोठे तोंड द्यायचे आहे….
अपूर्ण : हेमंत जोशी