भाग दुसरा : शिवभोजन स्वाहा भुजबळाय नम:
-पत्रकार हेमंत जोशी
सरकार मग ते कोणतेही असो त्यातले बहुतेक सारे मंत्री आणि राज्यमंत्री हे खादाडच असतात,कमी जास्त हाच काय तो फरक म्हणजे एखादी कॉल गर्ल असते आणि एखादी रस्त्यावर उभी राहून सतत धंदा घेणारी, एवढाच काय तो फरक असतो, खाणे त्यांचे यांचे सेम असते, कितीही त्यांना टोचून बोला, डाकूंच्या ढुंगणावर उगवलेल्या झाडाची त्यांना अजिबात लाज नसते. एक चुटका जो तुमच्याही ऐकण्यात आलेला असेल. एका शाळेत विद्यार्थ्यांचे फोटो काढायचे असतात म्हणून हेड मास्तर फोटोग्राफरशी घासाघीस करत असतात, शाळेत 1600 मुले आहेत प्रत्येक फोटोचे मी तुला 20 नाही 10 रुपये देईन, शेवटी हो ना करता करता चतुर फोटोग्राफर हो म्हणतो तेव्हा हेडमास्तर शिक्षक वृंदांना विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 30 रुपये जमा करायला सांगतात त्यावर सार्या टीचर्स विद्यार्थ्यांना घरून प्रत्येकी 50 रुपये आणायला सांगतात पुढे मुले हाच आकडा फुगवून घरून 100 रुपये जमा करतात, आणि केवढी हि पालकांची लूट असे नवऱ्यांना ठसक्यात सांगून बायका 200 रुपये उकळतात अशाप्रकारे 10 रूपयांच्या मालावर 200 रुपये लुटले जातात विशेष म्हणजे फोटोग्राफर देखील फायद्यात असतोच, वाचकहो, हे असेच अगदी सर्हास ज्यांच्या हाती ज्यावेळी सत्ता असते त्यांच्याकडून सरकारला जनतेला याच पद्धतीने लुटल्या जाते त्यात कधी वर्षा गायकवाड असेल तर कधी डॉ. विजय गावित म्हणजे चेहरे तेवढे बदलतात येणाऱ्या मंत्र्याची अधिकाऱ्यांची दलालांची व्यापाऱ्यांची साऱ्यांची वृत्ती लुटण्याचीच असते. वास्तविक शिव भोजन थाळीचे सारे अधिकार सुरुवातीला त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते त्यांचे त्यावर नियंत्रण होते पण काहीच दिवसात भुजबळ परदेशी पाटील आणि कंपूच्या ते लक्षात आले कि शासन गरिबांना जेवू घालण्यासाठी मोठी सबसिडी देते आहे पण आपल्या पदरात काही पडतनाही विशेष म्हणजे स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्याने ज्यांना शिवभोजन थाळ्यांचे कंत्राट दिले आहेत त्या आपल्या कार्यकर्त्यांना देखील त्यातून फारशी काळी कमाई होत नसल्याने वरपर्यंत हिस्सा हवा तसा पोहोचत नाही मग एक शक्कल अन्न आणि नागरी पुरवठा खात्याकडून आणि मंत्र्यांकडून लढविल्या गेली आणि एक दिवस अचानक शिवभोजन थाळीचे अधिकार स्थानिक जिल्हाधिकारी यांच्याकडून काढून घेण्यात आले आणि मंत्र्यांनी ते आपल्याकडे घेतले तेव्हापासून भ्रष्ट व बोगस शिवभोजन योजना या राज्यात मोठ्या प्रमाणात राबवू जाऊ लागली, गरिबांना थाळी नाही कारण सारे पैसे खादाडांच्या खिशात जाऊ लागले जाताहेत. पद्धत तीच 10 रुपयांचा फोटो 200 रुपयांना पण प्रचंड पैसे खर्च करूनही कोरोना काळात गरिबांच्या पोटात अन्न काही जात नाही इतर सत्तेतले सारे डाकू त्यावर ताव मारून मोकळे होताहेत…
अफवा पसरविणारे केवळ विरोधक असतात असे अजिबात नाही नसते त्यामुळे अनेकदा विशेषतः सोशल मीडियावर नेत्यांची मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची जी बदनामी केली जाते किंवा अफवा पसरविली जाते त्यात केवळ विरोधक किंवा यावेळी भाजपावाले सामील आहेत असतात असे अजिबात नसते, जसे अलीकडे आठ दहा दिवसात अफवा पसरविली गेली कि उद्धव ठाकरे यांना पॅरालिसिस झाला आहे जी शुद्ध लोणकढी थाप होती अर्थात हि अफवा मोठ्या प्रमाणावर पसरते आहे उद्धव यांच्या ते लक्षात आले असावे म्हणून त्यांनी वाहिन्यांवर येऊन भाषण दिले आणि त्यांना सिद्ध करावे लागले कि पॅरालिसिस झालेला नाही. पण एक मात्र खरे आहे कि महाआघाडी सत्तेत आल्यानंतर ती कोणालाही अजिबात फारशी फळलेली दिसत नाही म्हणजे एकतर कोरोना महामारीचे ती सत्तेत आल्या आल्या आलेले महासंकट आणि काहीसे आजारी किंवा किरकोळ प्रकृतीचे मुख्यमंत्री, रणांगणावर सुसाट सुटलेल्या रथाचे सारथ्य करायला कोणी नसावे तसे आज या राज्याचे झाले आहे. मोठ्या खुबीने उद्धव यांना उल्लू बनवून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हे राज्य रसातळाला नेण्याची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरु आहे. शिवभोजन थाळीची झुणका भाकर होता कामा नये म्हणजे सरकारी जमिनी आणि सरकारी तिजोरी लाटण्यासाठी लुटण्यासाठी शिवभोजन थाळी छगन भुजबळ किंवा महाआघाडी सरकारने जन्माला घातली हे चित्र प्रत्यक्षात उतरता कामा नये. एक फोटो अनेक दिवस वापरायचा वास्तवात गरिबांच्या पोटात थाळी नाहीच हे जे काय अत्यंत वाईट सतत दार दिवशी घडते आहे त्यावर भुजबळांना जाब विचारणे गरजेचे आहे. तुरुंगातून जामिनावर सुटून आलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रीपद हाच फॉर्म्युला तुम्ही अनिल देशमुख यांच्याही बाबतीतीत वापरणार असल्याने जनता शरद पवार यांच्या या वागण्याला धास्तावली आहे म्हणजे जे ओवाळून टाकलेले जे तुरुंगात जाऊन आलेले किंवा जे गुन्हेगार त्यांना पवार मोठे करतात हे चित्र सामान्य चांगल्या जनतेला चिंतेत टाकणारे आहे. शिव भोजन थाळीच्या भ्रष्ट कारभारावर देवेंद्र फडणवीस यांनी शासनाला फैलावर घेऊन सुद्धा यातला काळा बाजार आजही अजिबात थांबलेला नाही. भोजन माफियांचा भुजबळ यांच्या आशीर्वादाने डल्ला मारणे दरदिवशी सुरु आहे त्यात तिसरी लाट पुन्हा पुन्हा फोफावल्याने उद्धव यांनी गरिबांच्या पोटात दशरदिवशी शिवभोजन थाळी जाईल असे कडक निर्णय घेऊन मोकळे व्हावे त्यासाठी त्या कुंटे यांच्या डोक्यात म्हणे सुपीक योजना तयार आहे ज्याला भुजबळांचा मात्र विरोध आहे. शिव भोजन थाळीचे अधिकार पुन्हा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना द्या आणि शिवभोजन योजना निष्कलंक राबविण्याची त्यांना सूचना द्या उद्धवजी. असे या राज्यात जवळपास 1550 शिवभोजन थाळी केंद्र आहेत पण नियमाने जेवण दिले जाते असे दुर्दैवाने एकही केंद्राकडे बोट दाखविणे अशक्य आहे कारण प्रत्येक केंद्र अन्न माफियांनी वेढले आहे. जनता कोरोना महामारीत कंगाल आहे त्यांना आणखी रस्त्यावर आणू नका दोन घास त्यांना पोटभर खायला द्या….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी