शिवभोजन स्वाहा : भुजबळाय नमः
-पत्रकार हेमंत जोशी
माझ्या माहीमच्या ऑफिस इमारतीमध्ये काम करणारी मोलकरीण मला कोरोना बंदी काळात एक दिवस म्हणाली, तिच्या शेजारी एक तरुणी राहते तिला लहान बाळ आणि घरात म्हातारे सासू सासरे आहेत नवरा कोरोना झाल्याने गेला तिला आर्थिक विवंचना आहे तुमच्याकडून काही सहकार्य मिळेल का, ती तरुण स्त्री देखील त्यादिवशी तेथे आलेली होती, मी त्या तान्हे बाळ सोबत घेऊन आलेल्या त्या तरुणीला खुणेने माझ्याकडे बोलावले आणि खिशातून जेवढे काढणे शक्य होते तिच्या हातात दिले वरून सांगितले देखील कि काहीही सहकार्य लागले कि माझी आठवण कर त्यानंतर काही दिवसांपूर्वी ती मोलकरीण पुन्हा लिफ्ट मध्ये भेटल्यावर तिला त्या विधवा तरुणीबद्दल विचारल्यावर ती म्हणाली भाऊ तिच्या बाळाला सासू सासरे सांभाळतात आणि हि एका पार्लर मध्ये मसाज करायला जाते आता तिचे छान सुरु आहे, क्षणभर माझ्या छातीत चर्रर्र झाले मी काय समजायचे ते समजलो. सततचा करोनाचा उच्छाद, अनेक घरातल्या स्त्रियांच्या हातून कधी कधी तर अगदी नवऱ्याला किंवा घरातल्यांना सांगून हे बँकॉक पद्धतीचे वर्तन घडते आहे, अत्यंत कठीण असा हा आर्थिक मंदी आलेला काळ आहे त्यामुळे एखाद्या कुटुंबाला या दिवसात आर्थिक सहकार्य करतांना त्या घरातल्या तरुण स्त्रियांवर वाईट नजर ठेवून काहीही करू नका अन्यथा एक दिवस तुमच्याही घरी हे घडेल कारण परमेश्वर हिशोब चुकता करण्यात मोठा निष्णात आहे…
आर्थिक दृष्ट्या आपल्या या राज्यात बहुतेक कुटुंब व्यवस्था मोठ्या आर्थिक संकटात विवंचनेत असतांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री श्रीमान छगन भुजबळ प्रसंगी तुरुंगात जाऊनही सुधारायला तयार नाहीत, ते आजही अद्याप भ्रष्टाचारातुन बाहेर पडायला तयार नाहीत याचे राहून राहून आश्चर्य वाटते. ऐन कोरोना काळात त्या शिवभोजन थाळीत नेमका कसा घोळ या भुजबळ आणि कंपूने संपूर्ण राज्यात घातला आहे त्यावर मी याच ठिकाणी लिहिल्याचे तुम्हाला स्मरणात असेल त्यानंतर वर्षभराने झी वाहिनीने काही क्षण त्यावर पुरावे मांडले आणि पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात थेट देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर पुरावे देऊन सभागृहात भाषण केले पण बेश्रमाच्या ढुंगणावर झाड उगवले तर तो सावली झाली म्हणतो यापद्धतीने त्यानंतरही अगदी सर्हास म्हणजे कोणालाही न घाबरता शिवभोजन थाळीत दरदिवशी राज्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सुरु आहे.कोरोना काळात कधी मोफत तर कधी केवळ दहा रुपयात राज्यातल्या गरिबांना जेवण द्यायचे महाआघाडी सरकारने ठरविले आणि त्यावेळेचे अत्यंत बुद्धिमान असे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सचिव श्री महेश पाठक यांनी हि योजना कशी राबवायची त्यावर उत्तम योजना तयार केली त्यानंतर मात्र याच महेश पाठक यांची बदली केल्या गेली आणि हळूच पाठक यांच्या जागी भुजबळ यांचे खास वादग्रस्त विलास पाटील यांची नेमणूक करण्यात आली त्यानंतर अतिशय झपाट्याने नको ते नेमके घडले म्हणजे स्वतः छगन भुजबळ त्यांचा भ्रष्ट खाजगी सचिव संतोषसिंग परदेशी आणि विलास पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून आणि शिवसैनिकाना बाजूला सारून समता परिषदेच्या काही लांडग्यांना हाताशी धरून या योजनेवर या प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाण्याची वृत्ती ठेवणाऱ्यांनी मोठा ताव मारला आजही दरदिवशी मोठा ताव मारल्या जातो आहे, शासनाचे कोट्यवधी रुपये भ्रष्टाचारात सामील असणाऱ्यांच्या घरात जाताहेत बदनाम उद्धव ठाकरे होताहेत गरिबांच्या तोंडचा घास हि बदमाश मंडळी काढून घेताहेत शरद पवारांना भुजबळांच्या या पराक्रमाचे कौतुक वाटते आहे आणि अनेक गरिबांवर कसे बँकॉक पद्धतीचे जगणे आले आहे ते बघून अंग शहारते आहे….
खळबळजनक पुढल्या भागात : हेमंत जोशी