राज्यातल्या राजकीय घडामोडी भानगडी आणि कुरघोडी…
-पत्रकार हेमंत जोशी
माझ्यातल्या प्रदीर्घ राजकीय पत्रकारितेतल्या अनुभवी माणसाला नरेंद्र पवार किंवा चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी बोटावर मोजण्या एवढे नेते यासाठी आवडतात कि पराजयाची किंवा सत्ता हातून गेल्याची काळजी खंत चिंता न करता जे नेते थेट दुसरे दिवसापासून कामाला लागतात म्हणजे बावनकुळे मंत्री होते तेव्हाही आणि आजही ते मंत्री नसतांना किंवा मधल्या काळात साधे आमदार नसतांना देखील सतत राजकीय प्रवाहात स्वतःला झोकून द्यायचे व्यस्त असतात असायचे तेच कल्याण डोंबिवलीच्या माजी आमदाराचे नरेंद्र पवार यांचे त्यांच्यावर भाजपाने अन्याय केला त्यानंतर पवारांनी अपक्ष विधान सभा लढवली त्यात ते पराभूत झाले पुन्हा भाजपमध्येच नरेंद्र सक्रिय झाले आणि आधीपेक्षाही अधिक दमाने खूप जोमाने कामाला लागले त्यातून आजही स्थानिक मतदारांना त्यांचे आमदार कोण नेमके नाव आठवत नाही नेमके नाव माहित नाही कारण त्यांना आजही वाटते कि त्यांचे आमदार नरेंद्र पवार हेच आहेत, नेते नेमके हे असेच असावेत थेट त्या शरद पवार यांच्यासारखे कि जे कायम जीवाची चिंता पर्वा न करता जीवघेणा आजार अंगावर पेलत पूर्वीच्याच उत्साहात काम करतात, राजकीय विरोधकांना नामोहरम करून सोडतात, 12 डिसेंबर म्हणजे शरद पवार 81 पूर्ण करून वयाच्या 82 मध्ये प्रवेश करताहेत, शरद पवारांना त्यांच्या वाढदिवसानिमीत्ते शुभेच्छा त्यांना आपण दीर्घायुष्य चिंतूया, अर्थात असे असले तरी माझे एक अत्यंत महत्वाचे पुढले वाक्य तुम्हीही आपल्या डायरीत नोंद करून ठेवा आणि वाक्य असे कि पुढल्या वाढदिवसाला शरद पवार राजकारणात दूरदूरपर्यंत व्यस्त नसतील ते शंभर टक्के त्यांच्या राजकीय व्यस्ततेतून सन्यास घेऊन किंवा निदान निवृत्ती पत्करून मोकळे होतील तत्पूर्वी शरद पवार साहेब अमेरिकेत जाऊन स्वतःवर इलाज करून मोकळे होतील त्यानंतर हळूहळू म्हणजे पुढल्या वर्षभरात ते मुख्य राजकीय प्रवाहातून बाजूला होतील म्हणून यादिवसात शरद पवार यांची मोठी धडपड सुरु आहे त्यांच्या एका अपयशावर यश मिळविण्याची. होय ! राजकीय निवृत्ती आधी काहीही करून कसेही करून त्यांना सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचे बघायचे आहे आणि येथेही परमेश्वराने पवारांच्या बाजूने कौल दिल्याचे दिसते आहे म्हणजे तिकडे महाआघाडी सत्तेत येऊन अडीच वर्षे तशीही पूर्ण होत आलेली आहेत त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पहिल्या दिवसापासून त्यांचे प्रकृती स्वास्थ्य आणि करोना महामारी अजिबात साथ देत नसल्याने ते देखील या पदावरून पायउतार होण्याचा सिरीयस विचार करताहेत पण त्यांच्या मनात इतक्यात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचे नाही त्याऐवजी तातडीने त्यांना धाकट्या चिरंजीवाला राजकारणाच्या शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे आहे…
माझ्या ओळखीचा परवेज नावाचा गृहस्थ नोकरीनिमित्ते दुबईला राहायचा, वर्षातून दोनदा केव्हातरी यायचा तो आला रे आला कि त्याची मुले हेच इतरांना सांगायची कि अब्बू आले आहेत सध्या, आम्हाला खेळवायला आणि आईला लोळवायला, महिनाभर राहून तो निघून जायचा आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या अब्दुलचे मग एवढे परवेजकडे येणे जाणे असायचे कि मुलांना वाटायचे त्यांचा बाबा अब्दुल आहे आणि परवेज केवळ त्यांच्या ओळखीचा आहे. काही महिन्यानंतर हे जर असेच पुढे देखील सुरु राहिले तर या राज्यातल्या जनतेचे अब्दुल आणि परवेज सारखे होईल म्हणजे मतदार किंवा जनता देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री ते आहेत अशी मनाची समजूत करून घेईल आणि उद्धव ठाकरे यांना जनता मुख्यमंत्री आहेत विसरून मोकळी होईल. उद्धव कमी नाहीत हे अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आलोय पण त्यांना करोना महामारी आणि स्वतःचे प्रकृतिस्वास्थ्य अजिबात साथ देत नसल्याने जेथे तेथे त्यांचे दुर्दैव आड येते आहे परिणामी हे राज्य किमान दहा वर्षे तरी चौफेर प्रगतीच्या बाबतीत मागे गेले आहे आणि हीच वस्तुस्थिती आहे. एखाद्या रूपवान तरुण स्त्रीचा तरुण पती जर सतत दवाखान्यात भरती असेल तर शेजारचा एखादा टग्या जसा त्याच्या घरी येऊन मजा मारून जातो तेच सध्या घडते आहे म्हणजे उद्धव यांना स्वतःबाबत अनेक मर्यादा असल्याने काही अतिशय टगे असलेले नेते म्हणा अधिकारी किंवा मंत्री म्हणा सत्तेत प्रचंड मजा मारून मोकळे होताहेत जे वातावरण अतिशय बुद्धिमान, राजकारणात वाक्बगार असलेल्या पण काही कारणांनी मजबूर ठरलेल्या उद्धव यांना देखील अस्वस्थ करून सोडते आहे म्हणून ते तोडगा शोधताहेत पण हवा तसा मनासारखा मार्ग त्यांना अजिबात गवसला नसल्याने त्यांच्या चिंतेत अधिकच भर नक्की पडलेली आहे. आम्हा मीडियाला देवेंद्र फडणवीस यांचे मीडिया प्रमुख केतन पाठक अगदी नियमित देवेंद्र यांच्या दैनंदिन कार्यक्रमाचे जे पत्रक पाठवतात, वाचता वाचता असे वाटत राहते कि या राज्याचे मुख्यमंत्री नेमके कोण आहेत म्हणजे महाआघाडी सत्तेत आहे कि एकमेव एकटे देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत एवढे ते एखाद्या सत्ताधाऱ्यासारखे किंवा एखाद्या लोकमान्य लोकप्रिय मुख्यमंत्र्यासारखे सार्वजनिक व राजकीय जीवनात व्यस्त असतात आणि हे चित्र राज्याच्या हिताच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही कारण राज्याची प्रगती साधतांना कायम सत्ताधारी व्यस्त असावेत आणि चांगली कामे करतांना दिसावेत पण नेमके उलटे घडते फार कमी मंत्री सकारात्मक कार्यात गुंतल्याचे दिसते इतर बहुतेक सारे केवळ व्यसनात किंवा पैसे मिळविण्यात तुडुंब डुबलेले दिसतात….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी