माय फ्रेंड प्रसाद…
-पत्रकार हेमंत जोशी
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातून तेही एका सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या ब्राम्हणांच्या घरी जन्मलेल्या अत्यंत कमी शिकलेल्या तरुणाने आधी जळगाव नंतर मुंबई असा प्रवास करीत व्यवसायात स्थिरावणे माझ्यासाठी ते कठीण असे काम होते अशक्य असे स्वप्न सत्यात उतरविणे होते पण माणसे जोडत गेलो आणि उत्तम व्यावसायिक म्हणून झपाट्याने यशस्वी होत गेलो पुढे मुले झाली मुले मोठी झाली परदेशात शिकून आल्यानंतर दोन्ही मुलांनी देखील नोकरीत न जाता व्यवसायात उतरण्याचे ठरविले परमेशवर कृपेने त्या दोघांना पण यश मिळाले मात्र जेव्हा केव्हा अख्खे कुटुंब व्यवसायात उतरते असते तेव्हा त्या व्यवसायाची फळे जशी मधुर लागतात तीच फळे चाखता चाखता अनेकदा कडवट कठीणफळे देखील पचविण्याचे प्रसंग ओढवत असतात त्यात आम्ही पडलो बंडखोर पत्रकार त्यामुळे जसे मित्र मोठे तसे अवती भोवती असलेले छुपे शत्रू देखील तुम्हाला कायम आव्हान देणारे त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधगिरी बाळगून टाकावे लागते अगदी छोटीशी चूक देखील नाजूक अवयवाला चावणार्या मुंगी सारखी अस्वस्थ करून सोडणारी असते. अति मोह टाळावा लागतो पण त्याचवेळी व्यवसायाचे आयुष्याचे आर्थिक गणित चुकणार नाही विशेष म्हणजे श्रीमंतीच्या नादात एकत्र कुटुंब भरकटणार नाही याची मला सतत काळीज घ्यावी लागते….
जेव्हा केव्हा कठीण अडचणीचे प्रसंग अचानक उभे राहतात अशावेळी जिवलगांची एक फौज तुमच्या आसपास असावी लागते जी फौज मला सुदैवाने पाठीशी उभी करता आल्याने आणि अडचणीत धावून येणाऱ्या मित्रांची संख्या पुढे मुलांनी देखील वाढविल्याने जेव्हा केव्हा किंवा अनेकदा कठीण किंवा बरे वाईट प्रसंग अचानक उद्भवतात, आजपर्यंत आम्ही त्यातून सहीसलामत बाहेर पडलो कारण मित्र परिवार वेळोवेळी भरभक्कमपणे पाठीशी उभा होता. येथे याठिकाणी मित्रवर्य प्रसाद पाब्रेकर यांच्यावर लिहिण्यापूर्वी या अशा मित्रपरिवाराची आठवण झाली. प्रसाद लहान माणूस नाही उत्तम आणि मोठे उद्योगपती ते आहेत पाब्रेकर यांच्या विषयी यापूर्वी मी लिहिले आहे, एकेकाळी अत्यंत सामान्य स्थितीतले प्रसाद आधी खूप शिकले नंतर ते तयार कपड्याच्या व्यवसायात उतरले आणि जीन्स पॅण्ट तयार करण्यात जेव्हा ते खूप वाकबगार झाले पुढे त्यांनी या अनुभवाच्या भरवशावर जगप्रसिद्ध स्पायकर ब्रँड उभा केला आणि नातेवाईकांना सोबत घेऊन ते सारे श्रीमंत झाले खूप पुढे गेले. अलीकडे प्रसाद पाब्रेकर यांनी त्यांचा स्पायकर ब्रँड लंडनच्या एका व्यावसायिकाला विकला खरा पण प्रसाद यांनी पालघर येथे जीन्स तयार करण्याचा एवढा मोठा कारखाना उभा केला आहे कि जगभरातले विविध जीन्स उत्पादक प्रसाद यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर आपला माल तयार करून घेतात….
प्रसाद यांची धाकटी कन्या केतकी या व्यवसायात आलेली असली तरी त्यांची मोठी विवाहित कन्या मानसी उत्तम लेखिका आहे ती पुण्यात असते. अख्खे पाब्रेकर कुटुंबीय कायम जमिनीवर, गर्विष्ठ वृत्ती मला वाटते त्यांच्या रक्तातच नाही. एकमेकांना सांभाळून घेऊन पुढे जाण्याचे खानदानी संस्कार प्रसाद यांच्या ठायी असल्याने त्यांच्या सभोवताली असलेले जमलेले सारेच आपोआप आपापल्या क्षेत्रात खूप पुढे निघून गेले. आणि या चार ओळी त्यांच्यावर याचसाठी कि जेव्हा केव्हा अमुक एखादा क्लिष्ट किंवा कठीण प्रसंग आमच्यावर ओढवतो येतो तेव्हा सर्वात आधी मला आम्हाला आठवण होते ती प्रसाद पाब्रेकर यांची आणि त्यांना अशावेळी फोन केल्यानंतर कोणतीही टाळाटाळ त्यांच्याकडून नसते असतो तो मैत्रीचा हात हमखास पुढे. असे मित्र आहेत पाठीशी म्हणून कायम हिम्मत असते वाईट प्रवृत्ती विरुद्ध लढण्याची…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी