नाही घटस्फोट पुन्हा गौप्य्स्फोट
—पत्रकार हेमंत जोशी
ज्यांची एकमेकांशी शारीरिक जवळीक आहे असते केवळ त्यांनाच विरह शब्द लागू पडतो असे नाही असे नसते असे नसावे ज्यांची मने मग ते एकमेकांचे मित्र असतील, गुरु शिष्य असतील, नातलग आप्त शेजारी गावातले शाळेतले एकत्र काम करणारे कुटुंब सदस्य थोडक्यात ज्यांचे आपापसात प्रेम आहे स्नेह जुळून आला आहे असे ते कोणतेही नाते असेल अगदी ते कुत्र्या मांजराशी पाळीव प्राण्यांशी जुळलेले नाते असेल थोडक्यात ज्यांची मने एकमेकांशी संलग्नी झालेली असतात जुळलेली असतात असे मिलनाशिवाय देखील विविध नात्यांतून जे एकमेकांच्या कळत नकळत जवळ आलेली असतात आणि कुठल्याशा निमित्ताने जेव्हा एकमेकांपासून दूर जातात तेव्हा विरहाची प्रक्रिया घडते असे निदान माझे तरी स्पष्ट मत आहे. प्रेम मग ते कोणत्याही नात्याने एकमेकांशी जुळले कि तुटू नाही तुटणारे नसावे त्यात विरह असलाच पाहिजे असेही नाही पण एकमेकांची आठवण काढत जगणे हेही नसे थोडके. ज्यांना मन असते विशेषतः जे भावनिक म्हणजे हळव्या मनाचे असतात त्यांच्यापासून काही दुष्ट स्वभावाची माणसे त्यांना अनेकदा फसवून किंवा लुबाडून दूर जातात पण माणूस मग तो हळव्या मनाचा असो कि दुष्ट वृत्तीचा कठोर मनोवृत्तीचा, दोघांचीही एकमेकांना तीव्रतेने जी आठवण येते त्यालाच विरह म्हणतात असे निदान मला तरी वाटते. प्रेमातल्या करुण रसात प्रीती नक्की विरहातून व्यक्त होत असते पण इतरही नात्यात एकमेकांची दूर गेल्यानंतर आठवण होत राहणे त्यालाही विरह म्हटल्यास वावगे ठरू नये असे माझे मत आहे. खूप वर्षांनी अगदी अलीकडे मी राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन अगदी सहज भेटलो, त्यांच्यात माझ्यात जयंत शाह निशिकांत देशपांडे सारखे असे काही कॉमन फ्रेंड्स आहेत कि ज्यांच्या माध्यमातून यादिवसात अशोकराव कसे आहेत, खुशाली कळत असते, केवळ त्यांच्या पुढे पुढे करून प्रेम व्यक्त होत नसते. प्रत्यक्ष भेटीत गप्पा झाल्या, गप्पांच्या ओघात मी त्यांना म्हणालो, तुमच्या वडिलांचे माझ्यावर उपकार आहेत. दिवंगत शंकरराव १९८७ दरम्यान मुख्यमंत्री असतांना मी कायमस्वरूपी राहण्यासाठी जेव्हा मुंबईला पत्रकारिता पुढे रेटण्यासाठी आलो, एक दिवस शंकररावांना त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेटून मुंबईत माझ्या राहण्याची निवासाची अडचण सांगितली. मी जळगाव जिल्ह्याचा काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असल्याने माझा त्यांच्याशी फार आधीपासून परिचय होता. तू राज्यमंत्री रोहिदास पाटलांना ओळखतो का त्यांना माझे नाव सांग आणि तुझी राहण्याची अडचण पण सांग, शंकराव आणखी काय म्हणाले तेही मुद्दाम अशोकरावांना सांगितले ते ऐकून त्यांना छान वाटले. रोहिदास पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने तेही मला अगदी जवळून ओळखायचे, त्यांना लगेच भेटलो आणि पुढल्या काहीच महिन्यात पाटलांनी या बामणाला वर्सोव्याला पत्रकारांच्या कोट्यातून एक छान सदनिका बहाल केली, ज्या सदनिकेचे पैसे देखील त्याकाळी असलेल्या सामंत आणि मोघे या दोन मंत्र्यांनी भरले कारण १९८७ दरम्यान माझे व्यवसायातून मोठे आर्थिक नुकसान झाल्याने माझे पैसे अडकले होते जे १९८८ मध्ये वसूल झाले आणि मला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले. चालायचेच, व्यवसाय करतांना मोठमोठाले फायदे तोटे होतच असतात आपण मात्र मातुन किंवा खचून जायचे नसते. काळ हेच त्यावर औषध असते. विरह मनात ठेवून जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तेव्हा मात्र मनातल्या भावना या अशा व्यक्त करायच्या असतात. कधी कधी तर पोलिसांसारखे आम्हाला वागावे लागते म्हणजे प्रेम भावना मनात ठेवून कर्तव्यकठोर होऊन लेखणी चालवावी लागते प्रसंगी सख्खा किंवा शेजारी जरी आडवा आला तरी. येथे रोहिदास पाटील किंवा शंकरराव चव्हाण दिघेंही कट्टर मराठा आणि मी तर बामन होतो तरीही ते दोघे माझ्या पाठीशी त्याकाळी उभे होते, म्हणून जेव्हा केव्हा अलीकडे राज्यातले राजे मराठे संकुचित होऊन आरक्षण मागतात मनाला खूप वेदना होतात, त्यावर मी लवकरच स्पष्टपणे माझी मते मांडणार आहेच…
काँग्रेस वर सांगितली आता भाजपाकडे वळतो त्याविषयी येथे एक गौप्य्स्फोट करतो. पुढेही वाचा तुम्हाला मजा येईल. वाचता वाचता तुम्ही स्वभोवताली मस्तपैकी गिरक्या घेऊन आणि त्या आनंदात बायकोची फिरकी घेऊन मोकळे व्हाल. सध्या माजी मंत्री गमतीदार नेता फिरकीपटू कार्यकर्ता चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तुम्हाला हे सांगणे फडणवीसांच्या पत्नी उत्तम गातात हे त्यांच्याबाबतीत अस्वस्थ होणाऱ्या सुप्रिया सुळे यांना सांगण्यासारखे किंवा पत्रकार अभय देशपांडे डोळ्यात पाणी आणून बायकोला कांदे चिरून देतो हे भाजीला गुमान फोडणी घालणाऱ्या त्याच्या मित्राला उदय तानपाठक यांना सांगण्यासारखे. गेल्या एक दोन महिन्यांपासून चंद्रकांत पाटील हे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होतील अशा बातम्या ज्या तुमच्या कानावर पडताहेत त्या बातम्यांना अजिबात अर्थ नाही म्हणजे चंद्रकांत हे पायउतार होणार नाहीत हाच गौप्य्स्फोट मला येथे याठिकाणी करायचा आहे. चंद्रकांत पाटील हेच पुढेही राज्यातल्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असतील राहतील हे येथे मला वारंवार पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगायचे आहे. आपल्याकडे पुड्या सोडणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे अमुक एक नेता पदावरून पायउतार होणार असल्याची बातमी सोडून द्यायची आणि पुढले काही दिवस त्यांच्यानंतर कोण त्यावर विनाकारण विषय चघळत ठेवायचा त्यात विविध बातम्या देणार्या म्हणजे अनेक पुड्या सोडणाऱ्या वाहिन्यांचा आणि वृत्तपत्रात काम करणाऱ्या काही आगाऊ पत्रकारांचा हमखास सहभाग असतो आणि ज्यांची असे भाट हुजरेगिरी करण्यात आघाडीवर असतात त्यांची नावे पुढे करून ते मोकळे होतात. चंद्रकांत पाटील पायउतार होतील मग त्यांची जागा कोण घेतील त्यावर आमच्यातले आंधळे भाट विविध नावे सांगून मोकळे पण झाले कोणी आशिष शेलार यांचे नाव पुढे केले तर काही अडाणी मंडळींनी चंद्रकांत बावनकुळे यांचेही नाव पुढे रेटले, अनेकांनी माझ्या गावातल्या आमदाराची म्हणजे संजय कुटे यांच्या नावाची तर एवढी री ओढली कि मला वाटले संजय त्यांचा जावई आहे कि काय ? काहींना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा उमाळा आला तर अनेकांनी त्यांच्या सोयीनुसार विविध नावे पुढे केली. इतर एखादा भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून खूप यशस्वी ठरेल आणी चंद्रकांत पाटील हे फेल्युअर ठरले आहेत असे म्हणणे म्हणजे हेलनला अजिबात डान्स येत नाही हे आदेश भाऊजींनी म्हणण्यासारखे. हेच म्हणणे मुळात खूप चुकीचे आहे जे त्यांच्या केवळ बावळट दिसण्याला भुलले आहेत त्यांना मग चंद्रकांत पाटील काय ताकदीचा नेता आहे हे नक्की माहित नाही, फडणवीस मोदी शाह हे वेडे नाहीत जे कायम सेक्सी चंद्रकांत पाटलांना चिटकून बिलगून असतात, या महत्वाच्या म्होरक्यांना चंद्रकांत पाटलांची लो प्रोफाइल राहून काड्या करण्याची विरोधकांना संपवून भाजपाला युक्तीने शक्तिशाली बनविण्याची ताकद माहित आहे म्हणून या अशा भाजपातल्या बड्या नेत्यांना कधीही वाटणार नाही कि या नारदाला बदलावे आणि तयाच्या जागी कच्चे लिंबू संजय कुटे आणून ठेवावे. बावनकुळे मुनगंटीवार किंवा शेलार हे असे नेते नक्की बॅड चॉईस नाहीत पण हि ती वेळ नाही कि चंद्रकांत पाटलांना घालवावे व त्या जागी इतर एखाद्याला आणावे. पण लगेच आलेली ती वेळ नाही कि आधी पॉट दुखले आणि दुसरे दिवशी लगेच पिरियड्स आलेत. नाय नो नेव्हर, आणखी काही काळ भाजपा प्रदेशाध्यक्ष पद दुसऱ्या एखाद्या प्रभावी नेत्याच्या हाती सोपविण्यास वेळ द्यावा लागणार आहे हे निश्चित आहे आणि चंद्रकांत पाटलांना काहीच जमत नाही म्हणून दुसरा एखादा पुढे करणे हे भाजपाला आज नक्की परवडणारे नाही. तो फक्त दिसतो बावळा पण त्याच्या अंतरीच्या नाना कला आणि कळा फक्त नेमक्या राजकीय जाणकारांनाच माहित आहेत माणूस लै तिकडमबाज आहे तुम्हाला म्हणून सांगून ठेवतो. इतरही आशिष शेलार यांच्यासारखे काही कसे चंद्रकांत पाटलांच्या तोडीचे त्यावर नक्की तुम्हाला मी वेगळी अशी माहिती देणार आहेच…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी