बापरे बाप ! जे मी ऐकले ते तुम्हाला समजले का ?
—पत्रकार हेमंत जोशी
केवळ वयस्कांसाठी असलेल्या एका चावट चुटक्याने या लेखाची लिखाणाची सुरुवात करतो. एक नवविवाहित जोडपे आगगाडीने मधुचंद्रासाठी निघाले होते, वरच्या बर्थवर लाडे लाडे ते एकमेकांशी गप्पा मारत होते. प्रिये, मला बुवा गुलाबजाम हवाय नवरा म्हणाला. म्हणजे ? नवरीने विचारले. मॅडम, याचा अर्थ मला पहिला मुलगा हवाय, नवरा अधिकच लाडात येत म्हणाला. त्यावर नवरी म्हणाली, अजिबात नाही, मला जिलेबी हवी म्हणजे पहिली मुलगी हवी. त्यांच्या या रोमँटिक गप्पांकडे कान देऊन ऐकणारे टिपिकल सदाशिवपेठी गोखलेकाका शेवटी न राहवून म्हणालेच, गुलाबजाम होऊ द्या कि जिलेबी, पाक मात्र खाली सांडू देऊ नका हो, तशी तुमचे प्रात्यक्षिक ऐकून बघून माझ्याही तोन्डापर्यंत केव्हाच लाळ पोहोचली आहे, पण आमच्या ठमीचे पुढल्या महिन्यात लग्न आहे निदान त्यात गडबड नको, उगाच हिची पाळी टाळायला नको….
आपण स्वतःचा विचार करतांना स्वतःला हे अधून मधून विचारायलाच हवे कि मी इतरांना जखमा करणारा किंवा विनाकारण जखमी करणारा आहे कि एखाद्याला झालेल्या जखमांवर फुंकर मारणारा किंवा मलमपट्टी करणारा आहे. प्रेमात, नात्यात, वागण्यात, बोलण्यात, व्यवहारात थोडक्यात अत्र तंत्र सर्वत्र केव्हाही कुठेही तुम्ही आम्ही वागण्या बोलण्यातून समोरच्याला जखम होईल असे शक्यतो वागू बोलू नये. स्वतःचा स्वार्थ काढून घ्यायचा नंतर मदत करणाऱ्यालाच जखमी करून निघून जायचे हे असे नीच हलकट वागणे क्षणिक सुखावणारे नक्की असते पण जेव्हा हिशेब चुकते कारायची वेळ येते तेव्हा मी असे का वागलो हा पश्चाताप करून काहीही उपयोगाचे नसते. कोरोनामुळे दिवस कठीण आहेत अद्याप कोरोना नक्की संपलेला नाही, अनेकांना नोकऱ्या नाहीत कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत काहींचे छोटे मोठे उद्योग बुडाले आहेत लोकांकडे पैसे नसल्याने आणि आधीच्या सवयी जडलेल्या असल्याने विशेषतः व्यसने पूर्ण करण्यासाठी किंवा खर्चासाठी लागणाऱ्या पैशांसाठी विशेषतः समाजातले बदमाश तरुण स्त्री पुरुष तुमच्या खिशातून पैसे काढण्यासाठी कोणत्याही थराला जाताहेत, त्यांना ना पोलिसांची भीती वाटते ना अनैतिक वागण्याची. या दिवसात माझ्या ओळखीतली एक सुखवस्तू घरातली विशीतली तरुणी ज्या ठिकाणी नोकरीला होती तेथे तिच्या बॉसने आधी तिला आर्थिक लुटले नंतर तिचे शरीर उपभोगले वरून तिला ड्रग्सचे व्यसन लावून तो मोकळा झाला. आज ती मुलगी अडीच महिन्यांची गरोदर आहे म्हणजे मोठ्या संकटाला ती फेस करते आहे, आपल्या मुलाबाळांना या कठीण दिवसात अशा बदमाश मंडळींपासून चार हात लांब ठेवा प्लिज…
आपले कोणी काहीही बिघडवू शकत नाही या गुर्मीतून विशेषतः महाराष्ट्र देखील रसातळाला जातो आहे हे सत्य आहे म्हणजे अनिल देशमुख प्रकारांत त्यांचे खाजगी सचिव संजीव पलांडे हे गेल्या एक महिन्यापासून तुरुंगात आहेत, वास्तविक पलांडे गजाआड झाल्यानंतर सचिव व प्रशासकीय अधिकारी वीर यांनी त्यांना केवळ ४८ तासांच्या आत सरकारी नोकरीतून निलंबित करणे अत्यावश्यक होते पण अद्याप पलांडे यांना नोकरीतून निलंबित करण्यात आलेले नाही, विचारले तर वीर म्हणे खाजगीत बोलतांना सांगतात कि सुप्रिया ताईंचे सांगणे आहे कि पलांडे यांना काहीही झाले तरी निलंबित करू नका आणि वीर यांना पुढल्या काही दिवसात सरकारी सेवेतून निवृत्त व्हायचे असल्याने कदाचित एक्स्टेंशन मिळविण्यास त्यांना सुप्रिया यांची मोठी मदत होऊ शकते त्या उपकारातून बहुदा वीर हि बदनामी अंगावर घेऊन मोकळे झाले आहेत, वास्तविक त्यांच्याकडे संजीव पलांडे यांना अटक झाल्यानंतर त्यांना नीलम्बित करण्याचा रिपोर्ट म्हणे लगेच आलेला होता जो कदाचित या अशा दबावापोटी वीर यांनी परत काही कारण शोधून पाठवून दिला असावा. या पद्धतीने जर वाईट माणसे एकमेकांना वाचविण्यासाठी धडपडत असतील तर महाराष्ट्राचा पाकिस्थान होण्यास आता केवळ काही वर्षे बाकी आहेत आणि ज्याची मोठी किंमत पलांडे पद्धतीचे अधिकाऱ्यांची पुढची पिढी मोजून नक्की मोकळी होईल हे माझे वाक्य आज या ठिकाणी तुम्ही नमूद करून मोकळे व्हा. जात पात सत्ता धर्म ओळखी दादागिरी फसवेगिरी लुच्चेगिरी यातून या अशा पलांडे छाप महाराष्ट्रातल्या काही बदमाश मंडळींना त्या त्या वेळी नक्की विकृत आनंद मिळतो पण एक दिवस शंभर टक्के परमेश्वराची काठी अशी बसते कि केलेल्या पापांची ती काठी त्यावेळी सारी किंमस्त वसूल करून मोकळी होते. जामीन मिळविण्यासाठी मेडिकल ग्राउंडवर संजीव पलांडे सर्वप्रकारचे कायदेशीर व ओळखीतून प्रयत्न करतो आहे आणि या पापी दुनियेत त्याला चुकून जर जामीन मिळाला तर तो बाहेर तर येईलच पण वीर यांची मोठी मदत झाल्याने तो लगेचच पुन्हा पैसे खाण्यासाठी नोकरीत रुजू होईल, जे अनिल देशमुख प्रकरणी लढा देताहेत त्यांचा मात्र सिंहासन सिनेमातला निळू फुले होईल थोडक्यात लढणारे वेडे होतील…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी